-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

    super 30 group ची वाबळेवाडी शाळेला भेट

    महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे एक आदर्श व स्वप्नातील शाळा अभ्यास दौरा सर्वांना समृद्ध करणारा अनुभव
    अभ्यासदौरा अनुभव लेखन
    *प्रस्तावना *
                           बदतल्या शिक्षण पद्धतीनुसार जि.प.शाळेत दिले जाणारे शिक्षण दर्जेदार व २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जातांना मुलांच्या अंगात २१० शतकातील कौशल्य विकसित व्हावेत या विशाल दृष्टीकोनातून मा. डॉ.झनकर मॅडम शिक्षणाधिकारी नाशिक जि.प.यांनी पाऊले उचलले असून जिल्ह्तातील शिक्षकांचा super 30 group स्थापन केला असून या गटातील शिक्षकांच्या मार्फत इतर शिक्षकांना प्रेरित करण्याचे कार्य सध्या सुरु आहे.
                          नाशिक जिल्ह्याचा रंचो केशव गावित ह्यांच्या हिवाळी शाळेत सुरु असणारी शिक्षण पद्धत आम्ही अनुभवत आहोतच.एक शिक्षकाने मनात आणल्यावर कोणतीही भौतिक सुविधा नसतांना रोजंदारीसाठी सतत स्थलांतर करणाऱ्या पालकांची मुलांना शाळेत 2 वेळेचे भोजन सुविधा निर्माण मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थांची खरी प्रगती काय असते ? हे दाखवून देणारी शाळा,अशिक्षित पालक मुळे शिक्षणाचा प्रवाह खंडित होतो हा पारंपारिक समज खंडित करणारी ३६५ दिवस सुरु  असणारी आदर्श शाळा आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे त्याच बरोबर MIB या शिक्षण पद्धतीचा अनुभव देणाऱ्या आंतरराष्ट्रीय शाळा आपल्या जिल्ह्यात उदयास आल्या असून भोयेगाव,कळवण या सारख्या शाळा आपला वेगळा ठसा नाशिकमध्ये उमटवत आहेत. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतच राज्यातील इतर शाळेत चालू असलेले प्रयोग पाहून त्या प्रमाणे सर्व शाळा दर्जेदार शिक्षण देऊन राज्यात आपल्या  नाशिकचा झेंडा उंचावत राहण्याचा संकल्प super30 group ने केलेला आहे.
    असफलता एक चुनौती है , इसे स्वीकार करो ,
    क्या कमी रह गई, देखो और सुधार करो .
    जब तक ना सफल हो , नींद चैन को त्यागो तुम ,
    संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम.
    कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती,
    कोशिश करने वालों की हार नहीं होती

    लहरों से डरकर नौका पार नहीं होती
    कोशिश करने वालों की हार नहीं होती
    ही हरिवंश रॉय बच्चन ची काव्यपंक्ती चपखल लागू होणाऱ्या परिवर्तनाचा शिल्पकार श्री.दत्तात्रय वारे [प्राथमिक शिक्षक] या अवलीयास भेटण्याची संधी मा.डॉ.झनकर मॅडम यांनी उपलब्ध करून दिली
    याचा आढावा यात घेण्यात आलेला आहे.
    अभ्यास दौऱ्याचे उद्दिष्ट्ये
    १. शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेणे.
    २. शालेय कामकाज व जबाबदारीचे वाटप याविषयी माहिती मिळवणे.
    ३. लोकसहभाग व त्यातून केलेला शाळेचा विकास समजून घेणे.
    ४. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रम, अध्ययन अध्यापनाच्या नवीन तंत्रांचा अभ्यास करणे.
    ५. विषय निहाय अध्ययन पद्धती व उपक्रम या विषयीचा दृष्टीकोन अभ्यासणे. 
    ६. सर्व जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार व कौशल्य विकासाचे शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण करण्यासाठी दिशा मिळणे.
    ७. चांगल्या शाळेबरोबर समन्वय साधने.
    ८. भविष्यातील टेक्निकची ओळख व वापर करण्याची क्षमता कशी विकसित करता येते हे समजून घेणे.

    १. अभ्यास दौऱ्यातून मी काय शिकलो ?
    “दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाहीआत ज्योत ही हवीच.”
    एक सामान्य शिक्षकाने आपल्या मनाशी ठरवले तर काय बदल घडू शकतो हे मला या अभ्यास दौऱ्यातून शिकायला भेटले
    १] शाळेचा पट का कमी होत आहे ? याचे उत्तर मला मिळाले.
    शिक्षक आपल्या कामाचा बाऊ करून मला वेगळे करण्यास वेळच मिळत नाही  हि सबब सांगत आपल्या कामापासून लांब पाळतात तेथूनच अधोगतीस सुरवात होते.
    2] जीवनात आव्हान हे यशाची पायरी समजून काम केलं तर काहीही अशक्य नाही.
    २०१२ मध्ये तेव्हा ते चा पट फक्त 32 होता. तर २०१९ साली १ ते ९ शाळेचा पट ६०० आहे हे सहज शक्य झालेले नाही. एक दुर्लक्षित शाळा दत्तात्रय वारे सरांनी महाराष्ट्रात नावारूपास आणली. हे करतांना वारे सरांनी प्रथम  पालकांना आपल्या मुलांना नेमके कसे शिक्षण हवे याची जाणीव करून दिली. त्याचा परिणाम पालकांना २१ व्या शतकातील आव्हान समजले व आपले सर्वस्व शाळेसाठी देण्यास पालक तयार झाले.
    यावरूनच जो पर्यंत पालकांना आपल्या मुलांना कोणते शिक्षण हवे आहे? याची जाणीव पालकांना आपण करून देत नाहीत तो पर्यंत पालक सहभाग मिळणे शक्य नाही याची जाणीव मला झाली.
    ३] मुलांना शिकण्यासाठी विविध पद्धती शोधण्याची संकल्पना मला शिकायला मिळाली.
    ४] मातृभाषे बरोबरच शाळेत संस्कृतजपानीज,फ्रेंच,आदी भाषा शिकवल्या जातात हे समजले.
    ५] विषय मित्र वर्ग मित्र या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाला.
    ६] शाळेत प्रत्येक घटकप्रत्येक विषय व प्रत्येक कौशल्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कसे  शिकवले जावेत याची दिशा मिळाली.
    ७] विद्यार्थ्यांचे कला गुण ओळखून कौशल्यानुसार शिक्षण देण्याची प्रेरणा मला येथून मिळाली.
    ८]  शाळाबाह्य कामेऑनलाइन कामे  अशी कामे असतात आणि मग त्यातून शिक्षक शाळेची प्रगती कशी करणार?  अशिक्षित पालक यामुळे शिक्षणाविषयी अनास्था असते ? पालक सभेला पालकाच येत नाहीत ? गरीब कुटुंबातील व मागासवर्गीय कुटुंबातील मुले यांच्या बौद्धिक विकासाला मर्यादा येतात हा गैरसमज अशा व  अनेक शंकांचे निरसन या अभ्यास दौऱ्यातून झाले.
    ९] नेहमी सकारात्मक  विचार डोळ्यासमोर ठेऊनप्रत्येक काम हे विद्यार्थाना शैक्षणिक विकास करण्यासाठी महत्वपूर्ण आहे याची जाणीव या अभ्यासदौऱ्यातून झाली.

    2.  मी काय पाहिले


    आल्हाददायी व प्रसन्न वातावरण असलेल्या काचेच्या खोल्या 





    शाळेच्या दर्शनी भागातच लावलेला फलक 

























    ३. मी काय अनुभवले
    या अभ्यासदौऱ्यातून मला आलेला अनुभव
    १] पालकांना व ग्रामस्थांना आपले विझन पटवून दिले तर पालक शाळेसाठी सर्वस्व अर्पण करायलातयार होतात. याची प्रचितीज्या गावात एकराचे कोट्यावधी किंमत असतांना सतीष साबळे यांनी आपली दीड एकर जमीन शाळेसाठी दिली आहे .
    वाडीची लोकसंख्या पाच सहाशे असतांना शाळेतील मुलांची संख्या ६०० आहे म्हणजे परिसरातील ४०० ते ५०० मुले या शाळेत शिकायला येतात
    2] शाळेचा स्वीडन देशाशी या शाळेचा  टाय अप झालेला आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीला फाटा देत विदयार्थ्याच्या सुप्त शक्तीला वाव दिला जात आहे.
    ३] ३ वर्षापासून ची मुले शाळेत येतात व शाळेत मुलांना शिकवण्यासाठी गावातील अनेक पालक निरपेक्ष हेतूने सहभागी होतात.
    ४] शाळेला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सव्वा लाख लिटरच्या तीन टाक्या तयार केल्या असून पावसाचे शुद्ध पाणी मुलांना पिण्यास मिळावे व पाण्याची नासाळी थांबण्यात आली आहे.
    ५] मुलांच्या विविध कृती पहिल्या यातून मुले सांकेतिक भाषेत कसे व्यक्त होतात? , मुले वर्गमित्र व विषय मित्र पद्धतीने कसे शिकतात ? हे अनुभवले
    ६] शाळेत प्रत्येक विषयाला स्वतंत्र कक्ष आहेत
    ७] Trnikling,  coding language like C,C++, JAVA, तसेच 3D printer, lazer cutting, यासाठी प्रयोगशाळा, रेकॉर्डिंग रूम,संगणक कक्ष  advanced learning साठी गावकऱ्यांच्या मदतीने विशेष शिक्षकांची नेमणूक केली आहे त्यांचे वेतन ग्रामस्थ करतात.
    ८] वर्गाच्या भिंती, विषयाच्या भिंती बाजूला करून कृतीयुक्त व स्वानुभवातून शिक्षण देण्याची पद्धतीचा अवलंब या शाळेत असल्याचे अनुभवले.
    ९] विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाची आवड लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक क्षेताची आवड असलेला वेदांत मला भेटला. स्वत:चा प्रयत्नाने ५ भाषेवर प्रभुत्व मिळवलेली सानिया मला भेटली जिच्या गटाने रोबोट स्पर्धेत आपल्या कौशल्याचा साहिय्याने देशात ठसा उमटवला आहे जिचे स्वप्न एरो स्पेस इंजिनीअरिंगचे आहे हे टी सहज प्राप्त करेल हा आत्मविश्वास तिच्या बोलीतून उमटला.
    १०] Theme based learning शिक्षण पद्धतीचा स्विकार केलेली शाळा मला अनुभवण्यास मिळाली.



    ४. मी माझ्यात कोणता बदल करू शकतो ?
    या अभ्यासदौऱ्यातून मी खालील संकल्प केले आहेत.
    १] पालकांची सभा आयोजित करून प्रत्यक्ष कार्यवाहीची कल्पना देईल.
    2] पालकांना २१ व्या शतकातील आव्हान व कौशल्याची जाणीव करून देईल.
    ३] शाळेत विषय मित्र हि संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणण्याचा प्रयत्न करेल.
    ४] वर्गात वर्गमित्र तयार करून अप्रगत मुलांना माहे मार्च अखेर प्रगत करण्याचा प्रयत्न करेल.
    ५] विद्यार्थ्यांना ज्ञान निर्मितीची संधी प्राप्त करून देईल त्यासाठी वर्गरचना व शिकवण्याचे नियोजन करेल.


    ५. मी माझ्या शाळेत व सहकारी शिक्षक यांच्यात काय बदल घडवू शकतो.
    १] सहकारी शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करेल
    2] सहकारी शिक्षकांना विषय मित्र संकल्पना समजावून सांगेल व त्याची अमलबजावणी साठी आग्रह राहील.
    ३] सहकारी शिक्षकांच्या सहाकार्याने पालक जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करेल.
    ४] वर्गाचा पाठ्यक्रम १/३ वेळेत कसा पूर्ण करता येईल याचे नियोजन करेल.
    ५] भाषिक विकासासाठी  सर्वांचा कल्पना संकलित करून  त्यातून एक वेगळ्या पद्धतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल.
    ६] बहुविध बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने उपक्रमाचे नियोजन व साहित्य निर्मिती करेल.
    ७] शाळेचे बाह्यांग व अंतरंग विद्यार्थींना आकर्षित करण्यासाठी चर्चा व नियोजन करण्यात येईल.


    ६.  मी शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग कसा वाढवू शकतो.
    १] पालक सभेत माझे नाविन्यपूर्ण उपक्रम व साहित्यांची मांडणी करून मुलांना साहित्य हाताळण्याचे कौशल्य कसे विकसित केले आहे याची माहिती देईल.व प्रत्यक्ष विध्यार्थी साहित्य हाताळतील यावरून शाळेचे प्रयोग उपक्रम पालकापर्यंत पोहचतील व पालक स्वत: शाळेसाठी योगदान द्यायला तयार होतील
    2] मी माझ्या शाळेसाठी काय करू शकतो या विषयावर स्पर्धा आयोजित करून पालकांना यात सहभागी करून घेईल.
    ३] सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून
    ४] शालेय नियोजनात पालकांना महत्वाचे स्थान देऊन

    ७.  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी मला भावलेले उपक्रम.
    Trnikling,  coding language like C,C++, JAVA, तसेच 3D printer, lazer cutting, यासाठी प्रयोगशाळा, रेकॉर्डिंग रूम,संगणक कक्ष विद्यार्थीना इयत्ता ६ वी पासून देण्यात येणारे २१ व्या शतकातील कौशल्यावर आधारित दिले जाणारे शिक्षणाचे उपक्रम मला खूपच आवडले. स्वप्नातील संकल्पना प्रत्यक्ष शाळेत साकारलेली अनुभवली.

    ८. माझ्या शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी इतर कोणकोणत्या घटकांचा सहभाग घेऊ शकतो.
    माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना मी नेमके काय देऊ शकतो याचा वेध घेण्यासाठीच मी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला होता. या अभ्यासादौर्यातून मला माझ्या उपक्रमांना नेमकी दिशा मिळाली पालकांचा अध्ययन अध्यापन उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग मी करेल, बहुविध बुद्धिमत्ता विकासासाठी विद्यार्थांना आव्हानात्मक प्रश्नांच्या साहिय्याने उपक्रमांचे आयोजन करेल.

    ९. मी समजावून घेतलेला एक उपक्रम (प्रत्येकाने किमान एक उपक्रम सविस्तर समजून घ्यावा)  
    वर्ग मित्र व विषयमित्र उपक्रम





     या उपक्रमात मुलंच मुलांचे शिक्षक असतात.
    जो घटक एखाद्या विद्यार्थ्यास चांगला समजला तो विध्यार्थी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वत: समजावून सांगतो.
    या उपक्रमाची प्रचीती मला अनुभवण्यास मिळाली इ ९ वी ची मुले एकत्र बसून त्यांचातील १ विद्यार्थी इतरांना १० वीच्या MATH विषयाचे प्रश्न समजून सांगण्यात व्यस्त होते.
     इयत्ता 2 रीच्या वर्गातील मुलांनी आपले अभ्यास गट तयार के;केलेले मला त्यांचाशी केलेल्या चर्चेतून समजले. प्रेम नावाचा विद्यार्थी इतरांना शिकण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो हे त्यांच्या चर्चेतून समजून घेतले.

    हा अभ्यास दौरा माझ्यासाठी एक नवी पहाट घेऊन आला असून नावोपक्रमचा सूर्योदय झाल्याची प्रचीती मला आली
                          या  या अभ्यासदौऱ्यासाठी मला मा. डॉ झनकर मॅडम शिक्षणाधिकारी नाशिक,मा.भास्कर कनोज गटशिक्षणाधिकारी दिंडोरी,मा.सुभाष पगार बीट विस्तार अधिकारी कोशिंबे बीट,मा.अशोकराव गांगुर्डे केंद्रप्रमुख लखमापूर यांनी संधी उपलब्ध करून दिले व माझ्या प्रत्येक उपक्रमास भरभरून साथ देणारे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांचे मनापासून धन्यवाद!