-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    २१ व्या शतकातील आवाहनांना सामोरे जातांना शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देणे.

    २१ व्या शतकातील आवाहनांना सामोरे जातांना
    Name of the Step.
    पायरीचे नाव
    शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देणे.
    Objective / हेतू
    २१ व्या शतकातील शैक्षणिक कौशल्य विकसनासाठी, समस्या निराकरणसाठी तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर करणे.२] ग्लोबल तंत्रज्ञान वापराचे कौशल्य शिक्षकांमध्ये विकसित करणे.
    Definition / Concept
    संकल्पना
    1]अध्यापनातील काही समस्या निर्माण झाल्यावर प्रत्येक वेळी कोणी मदतीला उपलब्ध असतीलच असे नाही त्यामुळे स्वयं अध्ययनासाठी हे सोयीस्कर आहे.2].प्रकल्प निर्मिती ,समस्या निराकारणात याची मदत होते.3]शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साहिय्याने अभिरूप परिस्थितीची निर्मिती करून प्रभावी अध्यापन करता येते4]प्रत्येक विषयाच्या तंत्रशिक्षकांच्या अध्यापनाचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविता येते,Interactive Media तंत्रज्ञानाचा साहिय्याने पाठ चालू असतांना विद्यार्थी शंकांचे समाधान करू शकतात..5]Tele Conferencing, video Conferencing या नवीन तंत्र विज्ञानामुळे दूर अंतरावरील तज्ञांची पथके तयार करून कोणत्याही विषयावरील चर्चासत्रे कमी खर्चात बनविता येतात व एकाचवेळी मोठ्या समूहासाठी प्रसारित करता येतात.6]शालेय माहितीचे कागद विरहित संग्रह करणे शक्य होते.७]संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शैक्षणिक तंत्र विज्ञानामध्ये भर पडली आहे.Interactive Board media ,chat group, online learning. On-line examination, telephonic techniques यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
    Why?
    का ?
    १]दृक-श्राव्य माध्यमांमध्ये ग्राफिक्स आणि ऍनिमेशनच्या साहाय्याने प्रभावी व आकर्षक कार्टून्स, रेखाचित्रे, थ्रीडी चित्रे, पूर्णपणे संगणकाद्वारेच निर्णाण केली जातात. या आधारे भाषा विषयासंबंधी व विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येते.२]मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रे, संबंधित शास्त्रज्ञांची चित्रे, पाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने स्कॅनिंग करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतात.३]संगीत, खेळ, कार्यानुभव, चित्रकला या विषयांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रांच्या वापराला अधिक वाव देता येतो.४]विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने निळविता येतात.५]. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतिद्वारे अध्ययनअनुभव देता येतो.६]संदर्भज्ञानासाठी आणि मूल्यमापनासाठी देखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो.
    How (Steps to be followed while teaching)
    कसे ?
    तंत्रज्ञानचा अध्ययन अध्यापनात वापर करत असतांना आपण खालील ६ मुद्यांवर लक्ष केंद्रित केले तर महत्वाचा बदल सहज लक्षात येऊ शकतो 1]Dialogue २]Revision and Practice. ३]Enquiry ४]Problem Solving ५] Tutorial ६] Simulation यासाठी शिक्षकांनी खालील प्रकारे डिजिटल साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावेत १]अध्ययन घटकांवर आधारित PPT, Video,अध्ययन शिट तयार करणे. स्वत: साहित्य निर्मिती करता येत नसले तर Diksha app YouTube या डिजिटल माध्यमांचा वापर करणे.२] प्रथम आपला पाठ अध्यापन करणे त्याचे मूल्यमापन करण्यासाठी online Test, click Game सारखे डिजिटल साहित्य निर्मिती करणे विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल अनुभव देण्यासाठी छोटे छोटे app निर्मिती करणे किंवा अध्ययन घटकांशी संबधित प्ले स्टोअरवरील app वापण्यास प्रवृत्त करणेडिजिटल साहित्यांच्या साहिय्याने शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांना दिले जाणारे अध्ययन अनुभव चिरकाल स्मरणात राहतात.तसेच विद्यार्थ्यांचे शिकणे व मुलांचे शिकवणे सोपे होत असते.
    Examples (Experiences)
    उध्दरहाणे
    आपणास पृथ्वीचे परिवलन शिकवायचे आहे ते मेणबत्ती व चेंडूचा वापर नकरता आपण एक व्हिडीओ क्लिप दाखवली तर विद्यार्थी सहज समजतात व पृथ्वीची गती त्याचा वातावरणावर होणारा परिणाम याचे सूक्ष्म ज्ञान आपण देवू शकतो. २]कविता शिकवतांना अनेक भावनिक कल्पना त्यात व्यक्त केलेल्या असतात या कल्पनांचे आभासी दृष्य तंत्रज्ञानच्या साहिय्याने आपण निर्माण करू शकतो.३] विज्ञानाचे प्रयोग सोप्या पध्दतीने व्हिडिओ द्वारे दाखवू शकतो.४] फुलपाखराचे जीवन वृत्त सुरवंट पासून फुलपाखरू निर्मिती पर्यंत प्रवास सहज स्पष्ट करता येतो.
    Assessments/Evaluation

    मूल्यमापन
    वर्ग मूल्यमापन साठी गुगल टेस्ट किंवा online Test चा वापर करणे. २] विद्यार्थांकडून डिजिटल साहित्य निर्माण करून घेणे त्याला लागणाऱ्या वेळेवरून मुल्याकन करणे.
    Challenges faced by teachers while executing in class
    वर्गपातळीवर अंमलबाजवणी करताना येणाऱ्या अडचणी
    आपला नाशिक जिल्हा भौगोलिक दृष्ट्या विविधतेने नटला आहे त्यामुळे नेट कनेक्टीव्हिटी हि सर्वात मोठी समस्या आहे.
    १] प्रत्येक शाळेत संगणक उपलब्ध नाहीत त्यामुळे प्रत्येक शाळेत अमलबजावणी शक्य होत नाही.
    २] विद्युत पुरवठ्याची सुविधा प्रत्येक शाळेत उपलब्ध नाही.
    ३] शिक्षकांचे अध्ययन अध्यापनात वापराबाबत शिक्षकांमध्ये नकारात्मक दृष्टीकोन आजही मोठ्या प्रमाणावर आहे.
     ४] अनेक शिक्षकांना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य आजही अवगत नाही. त्यामुळे अनेक शाळेत साहित्य असूनही त्याचा वापर करतांना शिक्षक दिसून येत नाहीत.
    Expected Outcome at ASER
    ASER शी संबंधित अपेक्षित फलनिष्पत्ती
    समस्यांचे सामान्यीकरण सहज करता येत असल्याने आपण प्रत्येक घटकांवर डिजिटल साहित्य निर्मिती करून विद्यार्थ्यांना डिजिटल अध्ययन अनुभवातून Assar च्या पात्रतेवर आपण आणू शकतो. विद्यार्थ्यांना PPT game Click game, Excel sheetच्या साहिय्याने आपण गेम निर्मिती करून स्वयं अध्यायानातून विद्यार्थी प्रगती साधता येईल.
    Expected Outcome at NAS
    NAS शी संबंधित अपेक्षित फलनिष्पत्ती
    विद्यार्थ्यांना PPT game Click game, Excel sheetच्या साहिय्याने समस्या निर्माण करणे त्यावर विद्यार्थ्यांना समस्या निराकरण साठी प्रवृत्त करता येईल .विद्यार्थी स्वयं अध्ययनातून समस्या निराकरण करण्यास प्रवृत्त होतील व विद्यार्थ्यामध्ये स्वयं अध्ययनाची सवय विकसित करता येईल.
    Expected Outcome at PISA
    PISA शी संबंधित अपेक्षित फलनिष्पत्ती
    विद्यार्थ्यांना PPT game Click game, Excel sheetच्या साहिय्याने Out of Box विचार करायला प्रवृत्त करता येईल.उदा. एका प्रश्नांवरूनविद्यार्थांना अनेक प्रश्ननिर्माण होतील असे डिजिटल गेम तयार करणे मुलांपुढे २ अंक दिल्यावर त्यापासून सर्व गणिती क्रिया करण्यास प्रवृत्त करणे. वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती नुसार डिजिटल साहित्य निर्मिती करून आपण PISA लेवलचे विद्यार्थी घडवू शकतो.
    Other ideas/Thoughts
    इतर विचार
    १]Diksha & Bolo सारख्या app चा अध्यापनात व विद्यार्थी अध्ययनात करतील यासाठी प्रयत्न व्हावेत.
    २]शिक्षकांना डिजिटल साहित्य निर्मिती व वापर यांचे प्रशिक्षण देणे
    .३]प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात किमान एक संगणक उपलब्ध करून देणे
    ४] शाळेच्या विद्युत बिल भरण्याची सुविधा ग्रामपंचायत मार्फत करण्यात यावी.
     ५] सर्व विद्यार्थ्यांना tab उपलब्ध करून द्यावेत
     ६] तंत्रज्ञानची जाणअसलेल्या शिक्षकांकडून इयत्ते नुसार दर्जेदार साहित्य निर्मिती करून संकलित करून प्रत्येक शाळेत पेनड्राईव्ह ने मोफत देण्यात यावेत.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा