-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    संगणक तंत्रज्ञानचा शाळेत वापर कसा केला जातो?



    संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो.शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून आहे. गरज आहे ती आज संगणकाचा वापर कल्पकतेने आणि योग्य सावधगिरी बाळगून शैक्षणिक प्रक्रियेत वापरण्याची. काही उपयुक्त अप्लिकेशन सॉफ्टवेअरमुळे संगणकाचा शिक्षणक्षेत्रात वापर करता येतो.
    १. शाळेमध्ये संगणक शिक्षकांना गुणपत्रिका तयार करण्यासाठी तसेच शिक्षणप्रक्रियेत मदत करतो.
    २. निरनिराळ्या कार्यालयांमध्ये हा त्यांची कामे सोपी व लवकर करण्यास मदत करतो.
    . शालेय आरोग्य तपासणीसंबंधी माहिती साठवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान मदत करू शकतो.
    ४. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये ग्राफिक्स आणि ऍनिमेशनच्या साहाय्याने प्रभावी व आकर्षक कार्टून्स, रेखाचित्रे, थ्रीडी चित्रे, पूर्णपणे संगणकाद्वारेच निर्णाण केली जातात. या आधारे भाषा विषयासंबंधी व विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येते.
    ५. शिक्षणात संगणकाचा वापर गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात होत आहे. संगणकामुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाले आहेत. आज संगणकाचा वापर होत नाही असे जवळपास एकही क्षेत्र नाही..
    ६. संगणकाच्या साहाय्याने स्वयंअध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते.
    ७. क्रमान्वित पाठ अध्ययन पद्धतीचा वापर संगणकाच्या साहाय्याने करणे सुलभ जाते.
    ८. स्वगतीने विद्यार्थ्यास कुठल्याही घटकाचे अध्ययन करणे सुलभ जाते.
     ९. मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रे, संबंधित शास्त्रज्ञांची चित्रे, पाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने स्कॅनिंग करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतात.
    १०. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतिद्वारे अध्ययनअनुभव देता येतो.
    ११. संदर्भज्ञानासाठी आणि मूल्यमापनासाठी देखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो.
    १२. संगीत, खेळ, कार्यानुभव, चित्रकला या विषयांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रांच्या वापराला अधिक वाव आहे.
    १३. विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने निळविता येतात.

    1 टिप्पणी:

    1. सर खूपच छान संकलन व स्वनिर्मित साहित्य आहे .आमच्या सारख्या नविन शिक्षकांना खूपच उपयुक्त.

      उत्तर द्याहटवा