येरे बाप्पा आमच्या घरी मुषकावर होऊन स्वारी
अबाल वृद्धांना नवचेतना
देणारा सण आनंदाचा आला |
गुलाल उधळत वाजत गाजत
गणराज घराघरात विसावला ||१||
बुद्धीचा देवता तो देई
सर्वा सुख आणि समृद्धी |
चिंतन करी जो मानवा होई
ज्ञान आत्मविश्वासात वृद्धी ||२||
विघ्नहर्ता तू सुखाचा दाता
नष्ट करी सर्व चिंता |
स्मरण करता त्वरित सोडावी
आयुष्याच्या तू गुंता ||३||
देवाचा तू ईशागण
प्रथम मान तुझ्या पूजेला |
माता पिता सर्व श्रेष्ठ देवता
शिकवण देई तू या जगाला ||४||
आगमनाने तुझ्या सर्वांच्या
आनंदाला येई भरती |
भक्ती भावाने भाविक जास्वंद,दुर्वा
तुझ्या माथ्यावर वाहती ||५||
निसर्गही स्वागत करण्या बाप्पाच्या
असतो नेहमी नेहमी तत्पर |
विविध रंगी पुष्प फुलावी
झाडाझाडांवर सत्वर ||६||
बालगोपालांचा तू सखा
तरुणांचा तू नायक |
अबलांचा तू सदैव रक्षक
वृद्धांचा वरद विनायक ||७||
स्वागत करण्या तुझ्या भार्या करी
गोड धोड मोदक भारी |
येरे बाप्पा आमच्या घरी
मुषकावर होऊन स्वारी ||८||
गणराज तू विश्वंबर
उत्साह आनंदाचा तू साधक |
शुभंकर,कपील, चिंतामणी तुला
देतो नैवेद्याला मी मोदक ||९||
श्री.प्रकाश लोटन चव्हाण
प्राथमिक शिक्षक
जि.प.शाळा बोरस्तेवस्ती
ता.निफाड जि. नाशिक
९९६०१२५९८१
माझा छंद माझ्या कविता वाचा
chavanprakash001.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा