-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    Google Searchमधून जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठीच्या 8 सोप्या ट्रिक्स

     <Marquee>Google Searchमधून जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठीच्या 8 सोप्या ट्रिक्स</Marquee>


    आपल्याला  कोणत्याही माहिती ची अडचण जाणवली की आपण हमखास गुगलवर सर्च करतो गुगलच्या अनेक सेवा आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. त्यातही गुगल सर्च हा कायम हाताशी असणारा हक्काचा पर्याय आहे. या सर्चमध्ये अधिकाधिक योग्य रिझल्ट मिळवण्यासाठी काय करायचं? हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असेल.आज आपण गुगलवर एखादी माहिती शोधताना काही सोप्या गोष्टी केल्या तर आपल्याला सर्च रिझल्ट अधिक योग्य मिळतील आणि नेमकी माहिती कमीत कमी वेळात शोधता येईल.याबद्दल अधिक माहिती जाणून  घेऊया.

    Google Searchमधून जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठीच्या 8 सोप्या ट्रिक्स खालीलप्रमाणे आहेत.


    १).  फक्त तुम्हाला हव्या त्या वेबसाईट्सवरची माहिती सर्च करा

    एखाद्या सर्च टर्मच्या (सर्च करतोय त्या शब्दाच्या) आधी वा नंतर एखादी विशिष्ट वेबसाईट लिहील्यास गुगल तुम्हाला त्या वेबसाईटवरच्या माहितीचे सर्च रिझल्ट दाखवेल.

    गुगल सर्च

    उदा. गुगल सर्च मध्ये तुम्ही chavanprakash001.blogspot.com टाईप केले  तर आपल्याला  माझ्या ब्लॉग वरील विविध विषयीचे लेख मिळतील.


    २).एखाद्या ठराविक जागेविषयीची माहिती

    गुगलवर तुम्हाला एखाद्या ठराविक जागेविषयीची माहिती मिळवण्यासाठीही सर्च करता येईल.असं करण्यासाठी Location हा शब्द वापरा.


    रायगड लोकेशन : गुगलवर  रायगड लोकेशन  असं सर्च केल्यास तुम्हाला  ते ठिकाण दिसून येईल व त्याविषयीच्या बातम्या मिळतील. 

    U


    एखाद्या विशिष्ट वेबसाईटवर सर्च करायचं नसल्यास तुम्ही फक्त सर्च करायची गोष्ट आणि त्यापुढे लोकेशन लिहून माहिती शोधू शकता.


    ३). अवतरण चिन्हांचा वापर (Quotation Marks)

    जर तुम्ही एखादं वाक्य अवतरण चिन्हांमध्ये - " " घालून शोधलंत तर गुगल तुम्हाला हवी असलेली माहिती अगदी त्याच क्रमानुसार शोधेल.

    यामुळे तुमच्या वाक्यातले काहीच शब्द असणारे रिझल्टस वगळले जातील.


    उदा. जर तुम्ही  "cotton rate in Maharashtra" असं शोधलंत तर तुम्हाला गुगल तेच रिझल्ट्स दाखवेल ज्यामध्ये या शब्दांचा, याच क्रमाने वापर करण्यात आला आहे.

    फक्त Cotton किंवा फक्त Maharashtra असं असणारे सर्च रिझल्ट्स तुम्हाला दाखवले जाणार नाहीत..४)जर तुम्हाला ठराविक कालावधी दाखवायचा helloअसेल तर  टिंबाचा (..) वापर करावा


    एखाद्या ठराविक कालावधीमधली माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.

    म्हणजे तुम्हाला १९९० ते २००० या काळात रीलिज झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांची यादी हवी असेल, तर तसं संपूर्ण वाक्य लिहिण्याऐवजी अमिताभ बच्चन १९९०… २०००  असं सर्च करा.

     

    किंमतीबाबतही तुम्ही हे करू शकता. म्हणजे 20 ते 30 हजार रुपये किंमत असणारा लॅपटॉप तुम्हाला शोधायचा असेल तर Rs.20,000..30,000 Laptop असं सर्च करा.

    ५).माहिती वगळण्यासाठी डॅशचा (-) वापर

    एखाद्या शब्दाच्या आधी जर तुम्ही डॅश किंवा वजाबाकीचं चिन्हं लिहीलं तर गुगल तो शब्द सर्चमधून वगळून इतर गोष्टी सर्च करतं.

    म्हणजे तुम्हाला आरोग्यविषयक बातम्या वाचायच्या असतील पण कोरोना व्हायरसविषयीच्या बातम्या वाचायच्या नसतील तर काय करायचं?

    सोपं आहे. सर्च करताना Health-coronavirus असं टाईप केलं तर कोरोना व्हायरस वगळून आरोग्यविषयक इतर माहिती येईल.

    पण हे करताना त्या शब्दाला चिकटून आधी डॅश किंवा हायफनचं चिन्हं वापरावं. डॅश आणि शब्द यात स्पेस नको.

     Health-coronavirus 


    ६). दोन गोष्टी एकावेळी शोधण्यासाठी | चा वापर

    एकमेकांशी संबंध नसलेल्या दोन गोष्टी तुम्ही एकाचवेळी शोधू शकता.


    या दोन शब्दांच्या मध्ये | घातल्यास त्याचा वापर or सारखा होतो आणि आणि गुगल तुम्हाला या दोन शब्दांविषयीचे रिझल्ट्स दाखवले.

    उदा. 

    काना व उकाराचे शब्द शोधायचे असतील तर

    गुगल सर्च मध्ये काना|उकाराचे शब्द सर्च करा 


    हेच रिझल्ट्स तुम्ही or शब्द मध्ये लिहूनही मिळवू शकता.


    ७) . एखाद्या कंपनीची शेअर बाजारातली माहिती.

    जर तुम्हाला शेअर बाजारात रस असेल किंवा मग तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स घेतले आहेत, त्याच्या किंमतींवर लक्ष ठेवायचं असेल तर मग गुगलला साधी सूचना देऊन तुम्ही ही माहिती मिळवू शकता.


    stock : असं लिहून तुम्ही तुम्हाला हव्या त्या कंपनीचं नाव समोर लिहा.


    त्या कंपनीची कामगिरी तुम्हाला गुगल दाखवेल.


    ८) . फाईलच्या फॉरमॅटनुसार सर्च करा.

    एखाद्या विशिष्ट वेबसाईटवरची माहिती सर्च न करता जर ती तुम्हाला एखाद्या विशिष्ट फॉरमॅटमध्ये शोधायची असेल, तर तुम्ही तसं करू शकता.


    असं करण्यासाठी सर्च टर्मच्या पुढे filetype : असं लिहून शोधा.


    वर्ड फाईलसाठी doc किंवा पीडीएफसाठी pdf असं तुम्ही लिहू शकता.


    उदा. कब्बडी नियमावली filetype :PDF सर्च करा.


    वरील सर्व माहिती माझ्या online वाचण्यात आली असून सर्व माहिती मीस्वत: सर्च करून खात्री केली आहे.


    संकलन व लेखन

    श्री प्रकाश लोटन चव्हाण प्राथमिक शिक्षक

    National ICT Awardee.

    जि.प. शाळा करंजवन या.दिंडोरी जि. नाशिक

    ९९६०१२५९८१



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा