☺ *श्यामकांत रुले*☺
शाळा सिद्धी निर्धारक,जळगाव
मो.नं.9822842952/7840915952
"सर मनापासून धन्यवाद !!!!"
"आपण निर्धार्काची भूमिका पार पडताहेत. आपण पाठवलेले सर्व भाग मी माझ्या ब्लॉगवरून प्रसारित करत आहे. वेळोवेळी असेच सहकार्य लाभावे हीच सदिच्छा!!!!"
(समृद्ध
शाळा)
✒भाग -1
*दूरदृष्टी*
शाळांना
त्यांच्या स्व-सुधारणेत सातत्याने व्यग्र राहण्यास सक्षम करणारे सकारात्मक पाऊल म्हणून
"शाळा मानके व मूल्यांकनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार केलेला आहे .सर्व
बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी
परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज भारतीय समाजात जाणवत
आहे.त्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रात शाळा त्यांची कामगिरी व सुधारणकेंद्रीत गुणवत्ता
पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.म्हणूनच शालेय सुधारणाकेंद्रित सर्वंकष व सर्वांगीण
शालेय मूल्यांकन यंत्रणा विकसित करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक
नियोजन व प्रशासन विद्यापीठ(NUEPA)हे मनुष्यबळ विकास मंत्रालय(MHRD)च्या आश्रयाने
'शाळा मानके व मूल्यांकनाच्या कार्यक्रमाचे 'नेतृत्व करीत आहे.NPSSE हा असा उपक्रम
आहे,ज्याचे ध्येय प्रत्येक शाळेचे एक संस्था म्हणून मूल्यांकन करणे आणि जबाबदारीने
स्व विकासाची संस्कृती विकसित करणे आहे.NPSSE हे ' शालेय मूल्यांकन'
हे माध्यम आणि ' शालेय सुधारणा' हे लक्ष्य अशी कल्पना करते हा कार्यक्रम वेगवेगळ्या
राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने राबविला गेला.जसे गुजरातच्या ' गुणोत्सव' उडीसाच्या
'समीक्षा' कर्नाटकचा 'शालेय गुणवत्ता मूल्यांकन व प्रमाणन' आराखडा इ. सन 2015/16 पासून महाराष्ट्रात 'समृद्ध
शाळा' या नावाने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
**************************************************************************************
भाग-2 🌻 *शाळा मानके व मूल्यांकन आराखडा (SSEF)* हे शाळा
मूल्यांकनाचे समावेशक साधन आहे.तो शाळांना सुयोग्य पद्धतीने निर्धारित निकषांवर
त्यांच्या निर्णायक कामगिरी क्षेत्रांचे
मूल्यमापन केंद्रित व धोरणात्मक
पद्धतीने करण्यास सक्षम बनवतो.SSEF चे विकसन
राज्यस्तरीय अधिकारी,जिल्हा व तालुकास्तरीय
शिक्षण अधिकारी,प्रशिक्षक ,शाळा प्रमुख,शिक्षक संघटना,इ.चा समावेश करून
सहभागी पद्धतीने केले आहे.
🌻 *प्रमुख वैशिष्ट्ये*-
● निर्णायक कामगिरी क्षेत्रे म्हणून मुख्य क्षेत्रे व
यांतर्गत मूल्यमापन व सुधारणेसाठी संदर्भ बिंदू म्हणून गाभाभूत मानकांचा संच यांची
निश्चिती.
● स्वयं - मूल्यांकन व बाह्य मूल्यांकन या दोहींसाठी एक
सर्वसमावेशक साधन.
● विभिन्न शाळांची गरज लक्षात घेऊन राज्यांच्या
संदर्भीकरणासाठी लवचिक व स्वीकारार्ह.
● स्पष्ट, तार्किक व शाळा आणि बाह्य मूल्यमापकांना वापरण्यास
सोपे.
● मूल्यमापन प्रकिया सुसंगत व पारदर्शी बनविणारी. 🌷 *SSEF ची रचना* -
हा
आराखडा एकूण मुख्य 7 क्षेत्रांचा बनलेला आहे.त्यात गाभाभूत मानकांचा संच
आहे.क्षेत्र मूल्यमापनात स्वयंस्पष्ट मार्गदर्शके,वस्तुस्थितीदर्शक माहिती,पायाभूतमानके,आधारभूत
पुरावे या पायऱ्याआहेत.शेवटी मत नोंदवण्यासाठी प्रतिसाद तक्ता आहे.शाळा मूल्यांकन
दर्शक फलकावर प्रत्येक शाळेने एकत्रित
मूल्यांकन अहवाल तयार करणे अपेक्षित आहे. राज्यभरातील 200 नवोक्रमशील शाळांचे
बाह्यमूल्यांकन झाले. काही दिवसात त्यातील काही 'शाळा समृद्ध' होतील.आता या वर्षीही जवळपास 20000 नवोपक्रमशील
शाळांची निवड होऊन त्यांचेही बाह्यमूल्यांकन होणार आहे.
*******************************************************************************
भाग - 3
☝ *प्रमुख क्षेत्र व गाभा मानके :*-
*1)शाळेचे सामर्थ्य स्तोत्र:उपलब्धता, पर्याप्तता व उपयुक्तता* -
★शालेय आवार
★क्रीडा उपकरणे व साहित्यासह मैदान
★वर्गखोल्या व इतर खोल्या
★वीज व विद्युत उपकरणे
★ग्रंथालय
★प्रयोगशाळा
★संगणक (जेथे तरतूद असेल तेथे)
★उतरता रस्ता
★मध्यान्ह भोजन,स्वयंपाक खोली व भांडी
★पेय जल
★हात धुण्याची सुविधा
★स्वच्छता गृह
पहिल्या प्रमुख क्षेत्रात वरील 12 गाभा मानके स्व मूल्यांकन व बाह्य मूल्यांकनात तपासण्यात येतात.प्रत्येक प्रमुख क्षेत्राची सुरुवात त्यातील विशिष्ट कामगिरी क्षेत्राचे महत्व शाळेसाठी अधोरेखित करण्यासाठी संक्षिप्त प्रस्तावनेने होते.
धन्यवाद !!
*********************************************************************************************
भाग -
4
◆ *प्रमुख क्षेत्र क्र.2*
*अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन* -
*गाभा मानके* -
●शिक्षकांना अध्ययनार्थीची जाण
●शिक्षकांचे विषय व अध्यापनशास्रीय ज्ञान
●अध्यापनाचे नियोजन
●अध्ययन पूरक वातावरण निर्मिती
●अध्ययन अध्यापन प्रक्रिया
●वर्ग व्यवस्थापन
●अध्ययनार्थीचे मूल्यमापन
●अध्ययन अध्यापन साहित्याचा वापर
●शिक्षकांचे स्वतःच्या अध्यापन अध्ययन कृतीवरील चिंतन
वरील गाभा
मानकांचे स्वयं व बाह्य मूल्यांकनात महत्वाचे स्थान आहे.प्रत्येक क्षेत्राची रचना
क्रमबद्ध पद्धतीने केली आहे.ते सूचक मार्गदर्शके,वस्तुस्थितीदर्शक माहिती,वर्णनासह
गाभा मानके तसेच स्वयं व बाह्य मूल्यांकनासाठी वस्तुनिष्ठ निवाडा करण्यासाठी
आधारभूत पुरावे यांनी मिळून बनले आहे.प्रत्येक मुख्य क्षेत्राच्या शेवटी मत
नोंदविण्यासाठी प्रतिसाद तक्ता दिलेला आहे.
धन्यवाद !
********************************************************************
भाग - 5
*प्रमुख क्षेत्र क्र.3*
*◆अध्ययनार्थीची प्रगती,संपादणुक व विकास* :-
◆ *गाभा मानके* -
●अध्ययनार्थींची उपस्थिती
●अध्ययनार्थींचा सहभाग व व्यग्रता
●अध्ययनार्थींची प्रगती
●अध्ययनार्थींचा वैयक्तिक व सामाजिक विकास
●अध्ययनार्थींची संपादणूक
अशी एकूण पाच
मानके या क्षेत्रात अंतर्भूत असून त्या द्वारे स्वयं व बाह्य मूल्यांकन करणे
अपेक्षित आहे.
धन्यवाद !
**************************************************************************
भाग - 6
*◆प्रमुख क्षेत्र क्र. 4*
*शिक्षक कामगिरी व
व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन*
*◆गाभा मानके*-
● नवीन शिक्षकांचे उद्बोधन
●शिक्षकांची उपस्थिती
●जबाबदारी निश्चिती व कामगिरी लक्ष्यांची निश्चिती
●अभ्यासक्रम अपेक्षांप्रति शिक्षकांची तयारी
●शिक्षक कामगिरीचे पर्यवेक्षण
●शिक्षकांची व्यावसायिक विकास
प्रत्येक प्रमुख
क्षेत्रांतर्गत गाभा घटक संबंधित प्रमुख क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण आयामांना
स्पर्श करतात. हि गाभा मानके गुणवत्तेचे निदर्शक तयार करून मापनक्षम अपेक्षा
निर्माण करतात आणि शाळा मूल्यांकनास सामायिक पाया पुरवतात.हि मानके चढत्या क्रमाने
तीन स्तरांवर कामगिरीची अपेक्षित पातळी समोर ठेवतात.एखाद्या प्रमुख क्षेत्रातील
समग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी लक्षात घ्यावयाचे महत्वपूर्ण घटक यामध्ये समाविष्ट
होतात.सुधारणेकडे प्रवास सुरु करणाऱ्या शाळेस गाभा मानके दिशा देतात.
धन्यवाद !!
*********************************************************************
भाग - 7
● *प्रमुख क्षेत्र क्र.5*
■ *शालेय नेतृत्व व व्यवस्थापन*
◆ *गाभा मानके* -
* दूरदृष्टीचे विकसन व दिशा निश्चिती
* बदल व सुधारणेचे नेतृत्व
* अध्ययन - अध्यापनाचे नेतृत्व
* शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व
● *प्रमुख क्षेत्र क्र.6*
■ *समावेशन,आरोग्य व सुरक्षा*
◆ *गाभा मानके*-
* समावेशन संस्कृती
* विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे (CWSN)समावेशन
* शारीरिक सुरक्षितता
* मानसिक सुरक्षितता
* आरोग्य व स्वच्छता
● *प्रमुख क्षेत्र
क्र.7*
■ *उत्पादक समाज -
सहभाग*
◆ *गाभा मानके* -
* शाळा व्यवस्थापन / शाळा विकास व्यवस्थापन समितीचे संघटन व व्यवस्थापन
* शाळा सुधारणेत भूमिका
* शाळा - समाज अनुबंध
* अध्ययन स्रोत म्हणून समाज
* समाज सक्षमीकरण
अशी एकूण हि 7
प्रमुख क्षेत्र व 45 गाभा मानके आहेत. शाळा मानके व मूल्यांकन आराखडा हा स्वयं व
बाह्य मूल्यांकनासाठी एक धोरणात्मक साधन आहे.
धन्यवाद !!
*********************************************************************************
भाग - 8
* *स्वयं मूल्यमापन मार्गदर्शक मुद्दे* -
● पूर्वतयारी
● पुराव्यांचे संकलन - ◆संबंधित व्यक्तींचे
म्हणणे ऐकून नोंद घेणे.
◆ शाळा परीक्षणे
◆ वर्ग परीक्षणे
◆ माहितीचे पुनरावलोकन
●सुधारणा करण्यासाठी बलस्थाने आणि संधीचा शोध घेणे
●सातत्यपूर्ण सुधारणा आराखडा कार्यक्रम तयार करणे
●सातत्यपूर्ण सुधारणा आराखडा आणि शालेय विकास आराखडा यांचा समन्वय
साधणे.
* *बाह्य मूल्यांकन मार्गदर्शक मुद्दे* -
● पूर्वतयारी
● पुराव्यांचे संकलन -
◆ संबंधित व्यक्तींचे
म्हणणे ऐकून नोंद घेणे
◆ शाळा परीक्षणे
◆ माहितीचे पुनरावलोकन
● सुधारणा करण्यासाठी बलस्थाने आणि संधीचा शोध घेणे
●सातत्यपूर्ण सुधारणा कार्यक्रमाचे परीक्षण करणे
●सातत्यपूर्ण सुधारणा आराखडा आणि शालेय विकास आराखडा यांचे परीक्षण
करणे.
शाळा मूल्यांकनासाठी
मार्गदर्शक मुद्द्यांचा हेतू क्रमशः व व्यावसायिक पद्धतीने करावयाच्या स्वयं व बाह्य
मूल्यांकन प्रक्रियेस आधार देणे हा आहे.
धन्यवाद !
***********************************************************************************************
भाग - 9 ◆ *शाळेत
राबविता येण्यासारखे उपक्रम
( नवोपक्रम )*
♻१. पेपरलेस
प्रशासन
♻२.
प्रोजेक्ट ई लर्निंग
♻३.
बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
♻४. दिवस नवा, भाषा नवी
♻५.
पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
♻६. माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
♻७. सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
♻८. बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
♻९. गणित
विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
♻१०. एक तास
राष्ट्रासाठी
♻११. भाषिक प्रयोगशाला
♻१२ . पर्यावरण संरक्षक दल
♻१३.
सौरऊर्जा जागरुकता व वापर
♻१४. विषय खोली
♻१५. आम्ही स्वच्छता
दूत
♻१६. तंबाकूमूक्त शाळा
♻१७. प्लास्टिक मुक्त शाळा
♻१८. विज्ञान भवन
♻१९. मैत्री संख्यांची
♻२०. आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
♻२१. एक दिवस गावासाठी
♻२२. विषय कोपरा - प्रभावी माध्यम
♻२३. विशेष विद्यार्थी कोपरा
♻२४. पुस्तक भिशी
♻२५. शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
♻२६. क्रीडा दूत
♻२७. राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
♻२८. हरित शाळा
♻२९. प्रदूषण हटवा अभियान
♻३०. चालता बोलता
♻३१. माझा
मित्र परिवार
♻३२. माझे
पूर्व ज्ञान
♻३३.
शब्दगंगा
♻३४. कौन बनेगा ज्ञानपती
♻३५. वर्ड
पॉट
♻३६. हस्ताक्षर
सुधार मोहिम
♻३७. संख्यावरील क्रिया - एक छंद
♻३८. प्रश्नमंजूषा
♻३९. विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
♻४०. बालआनंद मेळावे
♻४१. सातत्य पूर्ण उपस्थिती
♻४२. पुस्तक जत्रा
♻४३. फन एंड लर्न
♻४४. शंकापेटी
♻४५.
स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
♻४६. रोपवाटिका निर्मिती
♻४७. एक तास
इंटरनेट
♻४८. गांडूळ खत निर्मिती
♻४९. Student of the day
♻५०. एक तास मुक्त अभ्यास
♻५१. समस्या
व सूचना पेटी
♻५२.
किशोरवयीन मुलींचे शिक्षण
♻५३. लोकसंख्या शिक्षण
♻५४. स्वच्छ शाळा, सुंदर गाव
♻५५. वाचाल तर वाचाल
♻५६. बिखरे मोती
♻५७. Book of the day
♻५८. विशेष व्यक्तींच्या मुलाखती
♻५९. बालसभा
♻६०. माझ्या गावचा इतिहास
♻६१. परिसरातील भूरुपांची ओळख
♻६२. विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
♻६३. प्रयोगातून विज्ञान
♻६४. मुक्त वाचनालय
♻६५. खरा मित्र उपक्रम
♻६६. गृहपाठ गट
♻६७. टाकाऊतून टिकाऊकडे
♻६८. हस्तलिखित निर्मिती
♻६९. मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
♻७०. वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
♻७१.
व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
♻७२. परिसर
भेटीतून विज्ञान परिचय
♻७३. चला शिकूया लघू़द्योग
♻७४. दैनंदिनी लेखन
♻७५. नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
♻७६. विविध
स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
♻७७. शालेय
परसबाग
♻७८. संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
♻७९. खेळातून गणित शिकू
♻८०.
परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
♻८१. स्व
कल्पनेतून शोध निबंध लेखन
♻८२.
सांकेतिक भाषेचे खेळ
♻८३.
दप्तराविना शाळा, विद्यार्थी
♻८४. लेखक,
कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
♻८५. परिसरातील कलांची ओळख
♻८६. गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
♻८७. गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
♻८८. शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
♻८९. काव्यनिर्मिती, रचना व गायन
♻९०. पाणी व्यवस्थापन
♻९१.
बलिराजा चेतना अभियान
♻९२. जलसाक्षरता
♻९३. तंत्रस्नेही विद्यार्थी
♻९४. कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
♻९५. रेन वॉटर हार्वेस्टिंग
♻९६ .
पुस्तक परिचय व भेट
♻९७. विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक
खेळाभ्यास
♻९८ .
निर्मल शाळा अभियान
♻९९. विविध दिन साजरे करणे.
***************************************🍁 *शाळा सिद्धी*🍁 भाग - 10 नमस्कार मित्रांनो, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सर्व शाळांसाठी आनंदाची बातमी.शाळासिध्दी विषयाशी निगडित अनेक उपक्रमशील शाळा व शिक्षकांकडून विचारणा होत आहे.मा.असिफ शेख सर (प्रमुख,शाळा सिद्धी)यांच्याशी झालेल्या चर्चेअंती स्वयंस्फूर्तीने स्वयं व बाह्य मूल्यांकनास उत्सुक शाळांनी खाली दिलेल्या लिंकचा अभ्यास करावा.काही सूचना व सुधारणा सुचवावयाच्या असल्यास मेल करावा.
*विषय - शाळासिध्दी*
शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही
1. सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.
2. “शालासिध्दी” संदर्भातील school Evaluation या Dashboard ( दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्याwww.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.
3. शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.
4. शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.
5. शाळेची माहिती व बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झाल्यावर शाळेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडे शाळा बाह्य मूल्यमापन व समृध्दशाळा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 1 महिण्याच्या आत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडून शाळा बाह्य मूल्यमापन निर्धारकांकडून करण्यात येईल. निर्धारणाच्या वेळी शालेय माहितीशी संबंधित सर्व माहिती, पुरावे व अभिलेखे निर्धारकांना उपलब्ध करुन देणे शाळांना बंधनकारक आहे.
6. बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळा ही समृध्द शाळा निकष पुर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचे प्रमाणपत्र “समृध्दशाळा – 2016” अर्थात“SS- 2016”वितरीत केले जातील.
7. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.com वshalasiddhimaha@gmail.com या मेल चा वापर करावा.
8. सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी.
http://goo.gl/forms/omIiwWETqXTBvlw73
शाळांसाठी आचारसंहिता – शाळा माहितीचे प्रपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सात क्षेत्रे व 45 उपक्षेत्राची माहिती तयार करुन ठेवावी.चूकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.शाळा निर्धारणासाठी येणा-या निर्धारकांना कोणत्याही कामाची किंवा नोंदीची सक्ती करु नये.निर्धारकांना आवश्यक त्या माहितीचे रजिष्टर्स,दाखले,पुरावे व अभिलेखे पाहण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे. निर्धारक, कामकाज याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.
●उपक्रमशील शिक्षकांना सुवर्णसंधी -
शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors )निर्मिती व कार्यपध्दती
1. निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.
2. निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल. निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला जाईल.
3. गुगल फॉर्म लिंक फक्त असेसर करिता -
http://goo.gl/forms/gE6Hm1dbKacoDc6s2
4. निर्धारकांनी “शालासिध्दी”संदर्भातील school Evaluation या Dashboard (दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करावे.
5. निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.
6. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.com व shalasiddhimaha@gmail,com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.
निर्धारकांसाठी आचारसंहिता – 1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.

भाग 11
● *प्रमुख क्षेत्र आणि वेब पोर्टल* :
" शालेय मानके व मूल्यांकन " राष्ट्रीय कार्यक्रमास वेब पोर्टल द्वारा साहाय्य लाभले आहे.हे वेब पोर्टल आंतरक्रियात्मक आणि विश्वसनिय आहे.यामध्ये या संबंधित सर्व दस्ताऐवज असून ती डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.
या वेब पोर्टल वर आंतरक्रियात्मक प्लॅटफॉर्म असून प्रत्येक शाळेस आपला स्वयं मूल्यांकन अहवाल ऑनलाइन सादर करता येतो.बाह्य ' परीक्षकांना ' याच वेब पोर्टलचा वापर करून आपला अहवाल सादर करता येईल.स्वयं व बाह्य परीक्षकांना एकत्रित अहवाल या पोर्टल वर देता येतो.प्रत्येक शाळांना आपला Login ID,UDISE, कोड प्रमाणे पासवर्डसह तयार करता येईल.त्याच प्रमाणे गट,जिल्हा,आणि राज्यांना Login ID आणि Password तयार करता येईल.हे वेब पोर्टल वैशिष्ट्य पूर्ण असून यामध्ये पालक व जनतेस शाळा मूल्यांकन अहवालाची पाहणी करून प्रत्याभरण (feed back)देण्याची सोय आहे.शाळांना सातत्यपूर्ण सुधारणा करण्यासाठी या वेब पोर्टलद्वारा मार्गदर्शन मिळेल आणि स्वतः केलेल्या कामगिरीचे वेळोवेळी परीक्षण करता येईल.
*********************************************************************************************** *भाग - 12*
प्रमुख क्षेत्र 1
*शाळेचे सामर्थ्य स्रोत:उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगिता* -प्रमुख क्षेत्रासंबंधी सविस्तर
शाळेच्या परिणामकारक कामगिरीसाठी सामर्थ्य स्रोत निर्णायक आहेत.प्रत्येक शाळेस तिच्या कार्यासाठी विभिन्न स्रोतांची गरज असते.भौतिक सुविधा,मनुष्यबळ, आर्थिक,साहित्य इ. एखाद्या शाळेमध्ये सामर्थ्य स्रोत ते स्रोत असतात जे आरामदायक,सुरक्षित व तणावमुक्त वातावरणात अध्ययन सुलभ बनवितात.शाळा स्रोतांचे मुख्य गुणधर्म हे सहज उपलब्धता व कार्यक्षमता आहेत.सहज उपलब्धतेचा संदर्भ हा सर्व वापरकर्त्यास सुरक्षित व महत्वपूर्ण सुविधांच्या उपलब्धतेशी निगडीत आहे.कार्यक्षमतेचा संदर्भ हा स्त्रोतांच्या महत्तम उपयोगीतेशी निगडित आहे.म्हणून शाळेसाठी हे महत्वाचे आहे की, उपलब्ध स्त्रोतांचा महत्तम वापर सुरक्षा,स्वास्थ्य व स्वच्छतेचा उच्च दर्जा राखत पोषक वातावरणात अध्ययन घडून येण्यासाठी व्हावा.सदरहू क्षेत्राच्या *स्वयं मूल्यांकनासाठी सूचक मार्गदर्शके* :-
1)शाळेसाठी कोणते सामर्थ्य स्रोत उपलब्ध आहेत व पुरेसे आहेत ?
2)शाळेतील सामर्थ्य स्रोतांची गुणवत्ता व उपयुक्ततेचे प्रमाण किती आहे ?
3)शाळेद्वारा आंतरजाल सुरक्षेच्या खात्री साठी काय उपाय योजना अंगिकारल्या आहेत ?
आदी सूचक मार्गदर्शकांच्या साहाय्याने 12 गाभा मानकांनुसार शाळेतील वस्तुस्थिती दर्शक माहिती शाळेने शालेय मूल्यांकन दर्शक फलकावर भरावी.त्यानुसार आपल्या शाळेचा स्तर निश्चित करावा.बाह्यमूल्यांकनासाठी आलेले निर्धारक मूल्यांकन करताना नवीन बाबी सुचवून मार्गदर्शन करतील व आपल्या शाळेचा योग्य स्तर निश्चित करतील.
धन्यवाद !
*******************************************************************************************
भाग -13
*महत्वपूर्ण चर्चा*
शाळासिध्दी अर्थात समुध्दशाळा 2016 या विषयावर मा.शिक्षणआयुक्त,
शालेय शिक्षण विभाग पुणे यांच्या कार्यालयात दिनांक 20/08/2016 रोजी शाळासिध्दी विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत
डॉ रामचंद्र कोरडे, संचालक MIEPA
औरंगाबाद यांनी MIEPA संस्थेचा कामकाज अहवाल
सादर केला. त्यानंतर श्री असिफ शेख, RMSA मुंबई यांनी शाळासिध्दी या विषयाचे पी पी टी द्वारे सादरीकरण
केले व शाळा मूल्यांकनासंबंधी माहीती सादर केली. मा. आयुक्त धीरजकुमारसाहेबांनी शाळासिध्दी
मधील 7 क्षेत्रे व 45 गाभामानके या विषयावर सखोल चर्चा केली . प्रत्येक गाभामानकाचे
महत्व व उपयुक्तता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाशी कशाप्रकारे संबंधीत आहे
व यामधून 100 टक्के मुलांचे शिकणे कसे संबंधीत आहे हे देखील समजून घेतले व त्यावर आपले
विचार व्यक्त केले. या गाभामानकामधून शालेय विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे होऊ शकते
मा.शिक्षणआयुक्त धीरजकुमारसाहेबांनी केलेल्या मार्गदर्शनामधील
काही मुद्दे -
◆1. Every H.M. is a Leader Of
School असे सांगून सर्व प्रथम सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळासिध्दी कार्यक्रमाची
आवश्यकता विचारात घेऊन या विषयाचा सखोल अभ्यास करावा असे सांगितले. सर्व मुख्याध्यापकांनी
शासन निर्णयानुसार यावर्षी आपल्या शाळेचे स्वमूल्यमापन करावे यासाठी केंद्रप्रमुख,
विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना प्रेरीत करावे असे सांगितले.
◆2. राज्यस्तर , जिल्हास्तर व तालुकास्तर
Teams कडून आधुनिक
तंत्र व साधनांचा वापर करुन शाळासिध्दी या कार्यक्रमाची माहीती द्यावी . helpline कक्ष व support system निर्मिती करावी.
शाळेने खरी /वस्तूनिष्ठ भरायला हवी . स्व मूल्यमापनामधून शाळा
नेमके कोठे आहे हे समजणार आहे. मुल्यांकनात कमी गुण आहे म्हणुन कोणासही शिक्षा नाही
, उलट शाळा विकासासाठी दिशा मिळणार आहे. शालेय विकासाचे नियोजन करता येणे सहज शक्य
होणार आहे. निर्धारक, अधिकारी यांना शालेय विकासासाठी मेंटॉरींग करण्याची संधी यामधून
मिळणार आहे.
◆3. शाळासिध्दी व लोकसहभाग या क्षेत्रावर बोलतांना मा. आयुक्त साहेबांनी सांगितले
की पालकांना आपल्या मुलांबद्दल अभिमान असतो अर्थात शाळेत बोलावल्यास त्यांना आपल्या
मुलांबद्दलची माहीती ऐकण्यात आनंद्च होतो. परिस्थितीनुरुप वडीलांना शक्य नसेल तर आई
तरी शाळेत येतेच. त्यामुळेच शाळा व्यवस्थापन
समिती, पालक संघ,माता संघ.माजी विद्यार्थी संघ.अशा प्रकारे पालक व समाज सहभागातून शालेय
विकास शक्य आहे.
◆4.महाराष्ट्रात अतिशय चांगले काम करणारे अधिकारी , शिक्षक आहेत हे सांगतांना तृप्ती
अंधारे ,प्रतिभाताई भराडे यांचा नामोल्लेख केला. तृप्ती अंधारे या गटशिक्षणाधिकारी
म्हणून काम करत असतांना शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाऊन रमतात, विद्यार्थ्यांबरोबर लंगडी,
खो खो सारखे खेळ खेळतात यामुळे मुलांना खुप प्रेरणा मिळते व खेळाची उद्दीष्टे देखिल
साध्य होतात याचा उल्लेख केला.
मुलांसोबत खेळण्यात वेगळी मजा आहे , आनंद आहे. प्रत्येक शिक्षकाने,
अधिका-याने मुलांना “ आज हम ये खेल खेलेंगे” असे म्हणुन पाहा , त्या मुलांच्या चेह-यावर
कीती मोठा आनंद दिसेल.
खेळाचे महत्व सांगतांना अध्यापनाशी , विषयाशी संबंधीत कृतीयुक्त
व आनंददायी छोटे छोटे खेळ घेता येतील का ? यावर मार्गदर्शन केले. वर्गातील व वर्गाबाहेरील
खेळ कोणते , कसे असावे हे विचारले. मैदानी खेळ व आरोग्य, खेळ संस्कृती यावर चर्चा केली
. खेळामधून सचिन – आचरेकर या दोघांची ओळख देशाला , जगाला झाली हे देखिल सांगितले.
◆5.शालेय आरोग्य याबाबत बोलतांना संतुलित आहार व लसीकरण या सारख्या विषयावर देखील
मार्गदर्शन केले.
◆6.
केवल वर्गात नव्हे तर कितीतरी विषय वर्गाच्या बाहेर घेऊन शिकविता
येतात हे सांगतांना. परीसरातील उदा दिले. “अगर तुम्हारे स्कुल के पास , गॉंवमे फुल
है तो गुलदस्ता कैसे बनाए ये सिखाना चाहीए”
शाळासिध्दी मधील 7 क्षेत्रे व सात रंग म्हणजेच शाळासिध्दी कार्यक्रम
सुंदर इंद्रधनुष्य आहे असे संबोधले. मूल्यांकनानंतर देण्यात येणारे प्रमाणपत्र देखिल
सप्तरंगी ठेवावे असे सांगितले.
◆7.राज्य शिक्षक पुरस्कार , जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गुणवत्ता
विकासात प्रभावीपणे उपयोग कसा करता येईल ? या विषयावर बोलतांना या शिक्षकांनी आपल्या
शाळेबरोबरच केंद्रातील, तालुक्यातील शाळांना मार्गदर्शन करावे असे सांगितले.
◆8.मिपा संस्थेने शिक्षक प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन मिपा सक्षमीकरणासाठी यशदा
व यासारख्याच इतर प्रशिक्षण संस्थांना भेटी द्याव्यात या संस्थाचा अभ्यास करावा. व्याख्याते
व सुलभक तयार करतांना प्रसिध्द व यशस्वी वक्ते जसे शिवखेरा, इंद्रजित देशमुख यासारखे
व्याख्यात्यांचे शैक्षणिक विषयावर व्याख्याने आयोजित करावे असे सांगितले. त्यांच्या
प्रमाणेच संस्थेचे प्रभावी बोलणारे व्याख्याते व सुलभक तयार करावे. SCERT मध्ये देखिल डॉ नेहा
बेलसरे यांच्या सारख्या अभ्यासू अधिव्याख्याता आहेत असा उल्लेख केला.
◆
9.मा.प्रधान सचिव नंदकुमारसाहेब यांच्या प्रेरणेमधून अधिकारी
व शिक्षकामध्ये होत असलेले बदल व प्रगत शाळा
याबाबत समाधान व्यक्त केले.
याबरोबर शालेय विकास व 100 टक्के मुले शिकली पाहीजे, 100 टक्के
शाळा प्रगत शाळा झाल्या पाहीजे व 100 टक्के शाळांना SS2016 प्रमाणपत्र मिळाले पाहीजे
यासाठी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ रामचंद्र
कोरडे, संचालक MIEPA
औरंगाबाद, श्री इरफान इनामदार SCERT पुणे, श्री असिफ शेख, कार्यक्रम अधिकारी, RMSA मुंबई.श्री दत्तात्रय
वाडेकर ,सकाअ , MPSP
मुंबई आदी हजर होते.
*****************************************************
भाग -14
*निर्धारक निवड*
नमस्कार मित्रानो,🙏🙏🙏🙏🙏🙏प्रायोगिक तत्वावर शाळासिध्दी उपक्रम ज्या शाळेवर राबविवला व जे मुख्याध्यापक निर्धारक म्हणून काम करु शकतात अशा मुख्याध्यापकांचा समावेश शाळा सिध्दी निर्धारक व्हाट्स अप गटामध्ये करत आहोत. मोठ्या प्रमाणावर निर्धारक निर्मिती व शाळा स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापनासाठी आपल्याला निर्धारक व मुख्याध्यापक प्रशिक्षण आयोजित करावयाची आहे. आपल्या स्तरावरुन सध्या स्वयं मूल्यमापनासाठी इतर शाळांना मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित आहे. तसेच निर्धारक म्हणुन काम करण्यास इच्छूक शिक्षक, अधिकारी व सेवा निवृत्त शिक्षक व अधिकारी यांनी लिंक भरून द्यावी. लिंक भरल्यानंतर मुलाखती घेऊन निर्धारक निवड प्रक्रिया होणार आहे.
मा. नंदकुमारसाहेब, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार
राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांनी शासन निर्णय (30 मार्च 2016) व शाळासिध्दी पुस्तिकेतील सूचनेनुसार स्वयं मूल्यमापन करावे.
शाळांच्या बाह्य मूल्यमापनासाठी निर्धारक निवड प्रक्रिया घेतली जांणार आहे.
शिक्षण विभागातील सेवा निवृत्त अधिकारी व शिक्षक यांना निर्धारक म्हणुन काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
आवश्यकतेनुसार राज्यस्तर , जिल्हास्तर व तालुकास्तरावर मुख्याध्यापक व निर्धारक प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
सर्व निर्धारक व मुख्याध्यपकांनी शाळासिध्दी अर्थात समृध्द शाळा 2016 (SS2016) करीता इतर शिक्षक व शाळांना प्रोत्साहन द्यावे.2016 साठी लिंक ओपन होताच share केली जाईल.

**************************************************************************************************
◆ भाग -15
*मा.असिफ शेख साहेब*(प्रमुख,शाळा सिद्धी)यांच्या अनमोल मार्गदर्शन
नुसार
शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही
1. सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी
या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6
दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.
2. “शालासिध्दी” संदर्भातील school Evaluation या Dashboard ( दर्शक फलक
) वर केंद्र शासनाच्याwww.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर
उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.
3. शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची
माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ
स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच
माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.
4. शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी
(Login ID) शाळा तयार करु
शकते. यासाठी शाळेने LOGIN
ID म्हणून शाळेचा UDISE
कोड टाकावा. शाळेचे gmail
खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड
जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून
शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास
final submit करावी. Final submit केल्यानंतरच
सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.
5. शाळेची माहिती व बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झाल्यावर
शाळेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडे शाळा बाह्य
मूल्यमापन व समृध्दशाळा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 1 महिण्याच्या
आत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडून शाळा बाह्य
मूल्यमापन निर्धारकांकडून करण्यात येईल. निर्धारणाच्या वेळी शालेय माहितीशी संबंधित
सर्व माहिती, पुरावे व अभिलेखे निर्धारकांना उपलब्ध करुन देणे शाळांना बंधनकारक आहे.
6. बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळा ही समृध्द
शाळा निकष पुर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचे प्रमाणपत्र “समृध्दशाळा
– 2016” अर्थात“SS-
2016”वितरीत केले जातील.
7. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.com वshalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस
चा वापर करावा.
8.सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती
भरण्यात यावी.
http://goo.gl/forms/omIiwWETqXTBvlw73● *शाळांसाठी आचारसंहिता*
– शाळा माहितीचे प्रपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सात क्षेत्रे व 45 उपक्षेत्राची माहिती
तयार करुन ठेवावी.चूकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.शाळा निर्धारणासाठी
येणा-या निर्धारकांना कोणत्याही कामाची किंवा नोंदीची सक्ती करु नये.निर्धारकांना आवश्यक
त्या माहितीचे रजिष्टर्स,दाखले,पुरावे व अभिलेखे पाहण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे. निर्धारक,
कामकाज याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.
● *शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors) निर्मिती व
कार्यपध्दती*
1.निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम
शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात
शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूरक वाचन
करावे.
2.निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये
आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल.
निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला
जाईल.
3. गुगल फॉर्म लिंक फक्त असेसर करिता -
http://goo.gl/forms/gE6Hm1dbKacoDc6s2
4. निर्धारकांनी “ शाळा सिध्दी ”संदर्भातील school Evaluation या Dashboard (दर्शक फलक
) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर
उपलब्ध माहितीचे वाचन करावे.
5.निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक
राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून
कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित
शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.
6. शाळा सिध्दी- समृध्दशाळा - या विषयाशी संबंधित पत्र
व्यवहारासाठीdir.mscert@gmail.com व shalasiddhimaha@gmail,com या मेल ॲड्रेस
चा वापर करावा.
*निर्धारकांसाठी आचारसंहिता*–
1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य
ती गोपनियता पाळण्यात यावी.विद्या परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन
करणे आवश्यक आहे.
धन्यवाद !
☺ *श्यामकांत रुले*☺
शाळा सिद्धी निर्धारक,जळगाव
मो.नं.9822842952/7840915952
Very good
उत्तर द्याहटवा