अस म्हटलं जात शरीराला क्षमाकडे वृत्तीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण अशा शिक्षणाची लॉकडाऊनच्या काळानंतरची गरज आहे.
१] आतापर्यन आपली शिक्षण पद्धती आपण प्रश्न देतो त्याला उत्तरे शोधायला मदत करतो हि पध्दत बदलणार आहे आता मुलांना सेल्फ लर्निंग कडे वळवायचे आहे.
त्याला नवीन अभ्यास्पद्धातीची जाणीव करून द्यायची आहे.
२] दीक्षा अप्प मध्ये आणखी कन्टेनचा समावेश करून ते
app प्रभावी कार्याला हवे.सेल्प स्टडी व वर्कशीट चा समावेश करावे लागतील ऑफ लाईन चालणाऱ्या कन्टेनचा समावेश
वाढवण्यात यावा.
३] फिजिकल शिक्षण जो पर्यत सुरु होत नाही तो पर्यंत ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही मात्र यात दिला जाणारा कन्टेनचा समावेश मर्यादित हवा math, भाषा काही गोष्टींना स्थान दिले पाहिजे १ ते ४ साठी जास्तीत जास्त अर्धा तास तर ५ ते १० साठी१ ते दीड तासापेक्षा जास्त वेळ अभ्यासाचा कन्टेन मुलांना देऊ नये
४] सर्वांना मोबाईल नाही संगणक नाही यासाठी शासनाने फ्री टू इअर
TV चॅनल सुरु करायला पाहिजे जे १२ तास विविध शालेय शिक्षण देतील मराठी माध्यमाचे वेगळे व इंग्रजी माध्यमाचे वेगळे असावेत.
५]शालेय पुस्तके बरोबरीने इतर वाचनीय पुस्तके बालभारतीने आपल्या वेबसाईट वर add केले पाहिजे कला ची काही पुस्तके मोफत डाऊनलोड साठी शासनाकडून उपलब्ध करून दिले पाहिजे.
६]समजा लॉकडाऊन नंतर शाळा जर का जुलै ऑगस्ट च्या काळात सुरु झाल्या तर अभ्यासक्रमातील मुल गाभा शिकावान्र्याच्या घटकाकडे शिक्षकांना वळावे लागेल यासाठी शासनामार्फत धोरण निश्चित करणे गरजेचे आहे.
७]या काळात मुलांच्या विविध परीक्षा रद्द करून वर्षातून फक्त २ परीक्षा घेतल्या जायला हव्यात.
८]ग्रामीण भागात ग्रामपंचायत
मार्फत शाळेतील उपक्रमांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी बालकांसाठी विशेष तरतुदीची योजना यात असली पाहिजे.
९]विद्यार्थ्यांसाठी
लॅमिनेशन अभ्यासकार्ड निर्मिती करणे प्रत्येक पालकांना देवाणघेवाण करणे यासाठी
स्थानिक पातळीवर मदतीची गरज निर्माण झाली आहे.
१०]ग्रामीण भागात रेडीओ आजही ऐकला जातो यासाठी रेडीओ वर कार्यक्रम प्रसारित झाले पाहिजे.
विविध
NGO ची मदत ग्रामीण भागातील शिक्षणासाठी घेतली पाहिजे.
टाटा सारख्या कंपनी ने फ्री ऑफ कॉस्ट सोफ्टवेअर पुरवले आहेत त्यांचे सहकार्य घेतले पाहिजे NGO
मार्फत मुलांना सॅनिटराझ
करणे मुलांना मास्कचे वाटप करणे आज मुल घरी आहेत तेव्हाच शाळेत गेल्यावर सोशल डीस्टसिंग कशी पाळली जावी याबद्दल जाणीव जागृती यासाठी मदत घेतली गेली पाहिजे.
११]लॉकडाऊन नंतर आपण टप्याटप्याने शाळा भरवू शकतो २ सत्रात शाळा भरवू शकतो अशा
वेळी १ ली २ री सकाळ सत्र व ३ री ४ थी दुपार सत्र याचा विचार केला गेला पाहिजे.
१२]शाळा सुरु झाल्यावर प्रथम खेळातून शिक्षण घेतले जावे कारण बरेच दिवस मुल शाळेपासून दूर राहणार आहेत अशा वेळी मुलांना शाळेची आवड निर्माण करणे
गरजेचे आहे सुटी काळात मित्रांबरोबर खेळणे
तासंतास TV पाहणे
ह्या गोष्टींची सवय मुलांना झालेली असते अशा वेळी खेळातून शिक्षण हा पर्याय
महत्वाचा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा