श्रावण म्हटला कि निसर्गाचे विविध पैलू आपणास पहावयास मिळतात.
काही क्षण सतत डोळ्यात भरून ठेवावेत असेच असतात.
या किमयागार निसर्गाचे मी शब्द बद्ध केलेली रचना
"जीवनाचा खरा आनंद देण्या श्रावण आला"
सृष्टीचे सौंदर्य खुलवण्या
आनंदाचा मास हा आला
निसर्गाचे अलोक दर्शन जगाला
घडवाया विस्मयकारी श्रावण आला || १||
पावसाच्या सतत धारा
कधी ऊन तर कधी मंद झुळूक वारा
माळरानावर फुलले हिरवे गालीचे
फुलवी त्यात रान फुलांचे बगीचे || २
||
बागेत उडती रंगीबेरंगी फुलपाखरे
हळूच धरावया जाता चकवती लाजरे
विविध पशु पक्षी त्यांच्या सोबती
आनंदाने निसर्गाचे गीतते गाती || ३||
पाखरांची येथे शाळा भरते
सृष्टी रंग बदलत नाच नाचते
नदी नाले खळखळ वाहती
कधीच थांबु नका मानवास संदेश
देती || ४ ||
इंद्रधनुच्या विशाल कमानी
अंतरंगातील रंग फुलवी मनी
विविध सण उत्सव सोबत घेऊन आला
जीवनाचा खरा आनंद देण्या श्रावण
आला.|| ५ ||