-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    ६ } कधी येईल तुला रे वास्तवाचे भान?

    आज मानव आपले सर्वस्व या मोबाईलमध्ये विसरत चालला.
    आनंद दु:खाचे क्षणही तो whatsapp facebook वरच व्यक्त करू लागला त्या विषयी व्यक्त होणारी दगदग मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आवडल्यास शेअर करा
    कधी येईल तुला रे वास्तवाचे भान?
    दिवसरात्र तु रे मानवा
    असतोस या गँझेटमध्ये व्यस्त
    मुक्त हो तू या गुलामगिरीतून
    का मुकतोस तू आनंदाला मस्त? ।।१।।
    नेहमीच धडपडतो,शोधतो
    तू निर्जीव वस्तूत सुख
    भावनिक नाते विसरुन सारे
    का होतोस तू अंतरमुख? ।।2।।
    उठल्या बरोबरच व्हाँटस् अप फेसबुक
    तपासणं झालं तुझे रे काम
    आभासी जगात वावरतोस दिनरात
    सांग कधी घेशील तू रे विराम? ।।3।।
    आभासी दुनियेत फिरवतो
    काँपी पेस्ट करून अफवा
    सततच्या या मोबाईलचा
    कसा येत नाही रे तुला थकवा? ।।४।।
    नाते गोते प्रेम सारे
    अडकवतो तु रे लिखित शब्दांत
    संकटकाळी धावतील का रे
    सगळे तुझ्या दु:खात? ।।५।।
    कुटुंबातील सगळ्यांची असते
    तुझ्याशी दोन शब्द बोलण्याची आस
    का व्हाँटस् अप फेसबुकवर वरच शेअर करतो
    तू त्यांचेआनंदाचे क्षणही खास ?।।६।।
    स्वमग्नता आजार तूला हा
    या गँझेटमुळे लागला
    जीवनातील छोट्या छोट्या
    आनंदी क्षणांना तू असा का रे मुकला ? ।।७।।
    वेळीच सावध होरे मानवा
    दे सर्वांना वेळ आणि सन्मान
    गँझेटमुळे विखुरले सारे
    कधी येईल तुला रे वास्तवाचे भान? ।।८।।

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा