"मिळो सुख तुला या सृष्टीचे"
दूर देशी असलो तरी
आठवण असते काळजात.
आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटल्यावर
आनंद मावेना गगनात.
लहानपणी तुझा बोट धरुनी
चालायला शिकलो मी
तुझ्याच मुखातून निघणा-या गोड बोलांनी
बोबडे बोलायला शिकलो मी.
नव्हती परिस्थिती पोटभर जेवण
मिळण्याची तेव्हा
कळतही नव्हते काही
तुझ्या मुखाचा घास मला
भरवत होतीस जेव्हा
तुझ्या आनंदाला उरच नाही.
लहान असूनही तू मला दरवर्षी
रेशीम बंध बांधतेस
आयुष्यभर माझे रक्षण करत आलीस
तरीही माझ्या कडून रक्षणाची आस धरतेस?
तुझ्याच रेशमी धाग्याने
बळ मिळते जीवनात नवनिर्मितीचे
विनंती करतो आज देवाला
सुख मिळो तुला या सृष्टीचे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा