-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

    "पुन्हा बिरसा जन्म घेरे करण्या आमचे रक्षण"

    ९ ऑगष्ट हा आदिवासी दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जात आहे
    त्यानिमित्ताने सहज सुचलेली माझी रचना

    "पुन्हा बिरसा जन्म घेरे करण्या आमचे रक्षण"

    सृष्टी निर्मितीचे पूर्वज आम्ही
    आदिवासी आमची जमात
    रानमेवा खातच वाढलो
    पशु पक्षी मित्र आमचे रानात ||1||
    मोलमजुरी व्यवसाय आमचा
    निसर्ग आमची देवता
    बिरसा मुंडा जननायक आमचा
    त्यानेच शिकवली खरी मानवता ||२||
    पारतंत्र्यात शोषणा विरूद्ध
    लढला तो बनावान
    वन कायद्याला तिलांजली देत
    इंग्रजांविरुद्ध पेटवले त्याने रान ||३||
    हजारीबागच्या तुरुंगात त्याने
    केला एक संकल्प
    इंग्रज सरकार उलथून पाडण्यासाठी
    उलगुलानचा दिला होता आम्हा विकल्प ||४||
    ब्रिटीश आणि जहागीराविरुद्ध
    बिरसा तू पुकारालेस बंड
    शोषणा विरुद्ध लढण्याचे बळ देऊन
    सर्वांना सोबत घेत लढत राहिला अखंड ||५||
    मानवाच्या अतिक्रमणाने जंगल
    डोंगर झाले माळरान
    सिमेंटच्या जंगलात बुडून मानव
    विसरत चालला जगण्याचे भान ||६||
    आज स्वातंत्र्याचे शतक गाठतोय
    तरीही होतच आहे आमचे शोषण
    पुन्हा बिरसा जन्म घेरे
    करण्या आमचे रक्षण ||७||

     श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक 
    जि.प. शाळा-बोरस्ते वस्ती
    ता.निफाड जि. नाशिक 
    मोबा.9960125981

    भाव पूर्ण श्रद्धांजली

    काल आमच्या कोकणगाव केंद्रातील मोठ्या भगिनी नुकतेच ६ महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांचे दु:खद निधन झाले.
    रक्षा बंधनाच्या दिवशी अचानक निरोप घेणे काळजाला चटका लावणारेच होते.
    त्यांचा विषयी शब्द बध्द केलेली माझी रचना 

    "तुझ्या कार्याचे स्मरण हृदयातआमचे सतत राहील".

    शांत संयमी स्वभाव तुझा 
    कधीही न राग चेह-यावर
    सतत कामात व्यस्त राहिलीस 
    कधी तक्रार न केली कुणाच्या नावावर
    आज रक्षाबंधनाच्या दिवशी 
    रेशीम धागा तुटला गं
    अचानक तुझे एक्झिट होणं
    काळजाला चटका बसला गं
    कामावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व तुझे 
    आम्हाला सतत देतसे प्रेरणा बळ
    प्रामाणिक काम करण्याचे का 
    देव देतो असेच फळ? 
    हजारोंचे साहित्य दिले तू 
    आमच्या चिमुकल्यांना 
    भावना मोकळ्या न करता 
    पोरकं केला तू आम्हा सहका-यांना
    सन्मान तुझा करण्यासाठी 
    सज्ज होतो आम्ही ९ तारखेला 
    सर्व काही मनातच घेऊन गेलीस 
    सुख दु:ख न सांगता आम्हाला 
    तुझ्या साहित्याकडे लक्ष जाता 
    डोळे आमचे पाणावतील
    सांगना गं ताई कसे त्याला 
    स्पर्श करण्यास हात आमचे धजावतील
    आठवणीच्या हिंदोळ्यावर 
    मन हे झोके घेतच राहील 
    तुझ्या कार्याचे स्मरण हृदयात
    आमचे सतत राहील. 

    भावपूर्ण श्रद्धांजली
    प्रकाश चव्हाण & परिवार all Kokanagaon Cluster Members

    रक्षा बंधन

    "मिळो सुख तुला या सृष्टीचे" 


    दूर देशी असलो तरी
    आठवण असते काळजात.
    आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटल्यावर
    आनंद मावेना गगनात.
    लहानपणी तुझा बोट धरुनी
    चालायला शिकलो मी
    तुझ्याच मुखातून निघणा-या गोड बोलांनी
    बोबडे बोलायला शिकलो मी.
    नव्हती परिस्थिती पोटभर जेवण
    मिळण्याची तेव्हा
    कळतही नव्हते काही
    तुझ्या मुखाचा घास मला
    भरवत होतीस जेव्हा
    तुझ्या आनंदाला उरच नाही.
    लहान असूनही तू मला दरवर्षी
    रेशीम बंध बांधतेस
    आयुष्यभर माझे रक्षण करत आलीस
    तरीही माझ्या कडून रक्षणाची आस धरतेस?
    तुझ्याच रेशमी धाग्याने
    बळ मिळते जीवनात नवनिर्मितीचे
    विनंती करतो आज देवाला
                                                                                              सुख मिळो तुला या सृष्टीचे!