महर्षींचा वसा चालवणारे
शिक्षकी पेशात कधीच नाही कमी |
मुलांप्रती मित्रत्वाचे नाते आमचे
आंम्ही देतो गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी || १ ||
विविध क्लुप्त्या आणि उपक्रम
सदैव आमच्या सोबती |
विद्यार्थी विकास साधतो आम्ही
वर्तनवाद,ज्ञानराचानावाद आमच्या संगती || २ ||
ग्रामीण भागाचे रुपडे बदलण्याची
आहे इच्छा आमच्या मनामनातून |
भारताचे भविष्य आकार घेत आहे
आमच्या ग्रामीण शाळा शाळांतून || ३ ||
विद्यार्थ्यांशी नाते जुळले आमचे
सहानुभूतीचे प्रेमाचे |
प्रत्येक मुल प्रगत व्हावे
हेच ध्येय धोरण आमचे || ४ ||
प्रत्येक काम करतो
आम्ही शर्थीने कर्तव्यनिष्ठतेने |
विद्यार्थी हिताची कास धरून
प्रगतीच्या वाट शोधतो तन मन धनाने || ५ ||
भावी इतिहास घडवण्याची
आहे आमच्यात क्षमता |
संस्कारमय पिढी घडावी
यासाठी सतत घेतो दक्षता || ६ ||
चाकोरीबाद्द जीवन जगणे
आहे आमची कमजोरी |
याच ठिकाणी होते आमची
टिंगल टवाळखोरी || ७ ||
सामाजिक संस्कृतीचे भान जपणारे
आम्ही आहोत उपासक |
राष्ट्रीय संपती संवर्धनासाठी आम्ही
असतो आजन्म अभ्यासक || ८ ||
ज्ञानप्रसारक,सहशोधक
आम्ही सदैव प्रशिक्षक |
आम्हीच समुपदेशक प्रबोधक
आणि मूल्य संवर्धक || ९ ||
संशोधक, साहित्य लेखक परीक्षक
आणि गुणवत्ता समीक्षक ज्ञानदाता |
विद्यार्थ्यांचा कौशल्य दाता ,संस्कारदाता
नवनिर्मितीचा गुरुजीच आहे स्फुर्तीदाता || १० ||
श्री.प्रकाश लोटन चव्हाण
प्राथमिक शिक्षक
जि.प.शाळा –बोरस्तेवस्ती ता. निफाड जि. नाशिक
Chavanprakash001.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा