आधारस्तंभ
होतास तुम्ही आधारस्तंभ
पारतंत्र्यात तुमचा कार्यारंभ।
दाखविली दिशा तुम्ही जना
आजही सर्व करती तुम्हा वंदना. ||१||
गांधी नेहरूंच्या क्रांती चे
तुम्ही साक्षीदार
आदर्श जीवनाचा मार्ग अवलंबण्या
तुम्ही दिला सर्वांना आधार. ||२||
शेती शिक्षण समाज कार्य
घडले तुमच्या हातून
आपल्या कार्याची चर्चा होते
आजही मनामनातून ||३||
बाबा आज आम्ही तुम्हा
आठवतो प्रेम भावे
नेहमीच चालवू पुढेआपला वसा
आमच्या अंतरभावे.||४||
आपल्या सुंदर आठवणी आहेत
आजही आमच्या ह्रदयी
शिक्षण समाजकार्य मध्ये आपलाच
कित्ता गिरवणार आम्ही नित्य समयी ||५||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा