-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

    उतारा वाचन


    श्रुत लेखन व उतारा वाचन साठी काही नमुना संच एकत्र दिली जात आहेत. त्यांचा वापर करून आपण स्तराचा पडताळा करू शकता किंवा इयत्ता व वयोगट लक्षात घेऊन तुम्ही पाठ्यपुस्तकांतील परिच्छेदही निवडू शकतात.

    परिच्छेदाचे वाचन घेतल्यावर त्यावर शिक्षकांनी किमान ३ प्रश्न विचारून समाजपूर्वक वाचनाचा पडताळा घ्यायचा आहे.येथे प्रश्न दिलेली नाहीत. कृपया परिच्छेदावर आधारित प्रश्न सुलाभाकांनी स्वत: तयार करून विचारावेत.
    संच १

    कपिला गाय आहे .
    कपिला गाय गोठ्यात आहे.
    कपिला गाय दुध देते.
    मुले आवडीने दुध पितात.
    संच २

    तळे सुंदर आहे.
    तळ्यात बगळा उभा आहे.
    तळ्यात मासे पोहत आहेत.
    बगळ्याने मासा पकडला.
    संच ३

    टोपलीत फळे आहेत.
    बाबा आंबा खातात.
    सई पपई खाते.
    दादा अननस खातो.
    त्यांना फळे आवडतात.
    संच ४

    एवढासा उंदीर होता.
    त्याने घरात धुमाकूळ घातला.
    आईच्या साडीवर त्याने नक्षी काढली.
    बाबांच्या पायमोजाला
    दोन खिडक्या केल्या.
    संच ५

    सुषमा लिहित होती.
    तिच्या अक्षरात जादू आहे.
    सुषमाचे अक्षर सुंदर सुबक आहे.
    तिची वही सगळ्यांना हवी असते.
    संच ६

    गंगा आजी झोपडीत राहते.
    तिची झोपडी रामाच्या
    घराशेजारी आहे.गंगा आजीच्या
    घरात मांजर आहे.
    ती मला खूप आवडते.
    संच ७

    सरू एक गरीब मुलगी आहे.
    ती दुसरीत शिकते.तिची आई
    शाळेजवळच्या चौकात
    लिंबू विकते. त्या पैशांवर
    त्यांचे घर चालते.
    संच ८

    चैताली गुणी मुलगी आहे.
    ती दररोज शाळेत जाते.
    घरी आल्यावर ती घराचा
    अभ्यास करते.
    नंतर ती आईला मदत करते.
    संच ९

    फुगेवाला आला.
    त्याने लाल निळे फुगे आणले.
    मुलांनी फुगे घेतले.
    मुलांच्या हातातून फुगे सुटले.
    मुले फुग्यांच्या मागे सैरावैरा
    धावत सुटले.
    संच १०

    एक आजी होती.
    एकदा तिला तिच्या
    बहिणीचे पत्र आले.
    आजीला तिने आपल्या घरी
    पूजेला बोलावले होते..
    संच ११

    आमच्याकडे एक किसणी आहे.
    तिच्यावर बारीक किसले जाते.
    खोबरे किसून चटणी करतो.
    गाजरे किसून हलवा करतो.
    संच १२

    चिंच फार आंबट असते.
    हिरव्या चिंचा छान लागतात.
    जेवणात चवीला चिंचा वापरतात.
    चिंचोके भाजून खातात.
    संच १३

    आमच्याकडे एक किसणी आहे.
    तिच्यावर अनेक प्रकारचे पदार्थ
    किसले जातात.आम्ही खोबरे
    किसून चटणी करतो.
    गजर किसून हलवा करतो.
    संच १४

    बसमध्ये कंडक्टरकाका असतात.
    ते आपल्याला तिकीट देतात.
    स्टॉप आला कि घंटी वाजवतात .
    मग ड्रायव्हर काका बस थांबवतात.
    संच१५

    मेंढीच्या अंगावर लोकर असते.
    लोकरीपासून धागा काढतात.
    त्या धाग्यांचे स्वेटर विणतात.
    स्वेटर थंडीत वापरतात..
    संच १६

    मगर पाण्यात व जमिनीवर आढळते.
    ती पाण्यात पोहू शकते.
    जमिनीवर चालू शकते.
    ती उन्हात बसून अंग शेकते.
    संच १७

    पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात.
    कावळा काटक्यांचे घरटे बांधतो.
    सुगरण गवताचे घरटे विणते.
    शिंपी पानांचे घरटे शिवतो.
    संच १८

    नारळाचे झाड उंच असते.
    नारळाची चटणी करतात.
    नारळाच्या करंज्या करतात.
    नारळ मसाल्यात घालतात.
    सत्काराला नारळ देतात.
    संच १९

    पळसाच्या पानांचे द्रोण करतात.
    त्याच्या पत्रावळीही करतात.
    पळसाची फुले लाल असतात.
    फुलांपासून लाल रंग मिळतो.
    संच २०

    कच्चा आंबा म्हणजे कैरी.
    कैरीचे लोणचे करतात.
    कैरी पिकली की पिवळी होते.
    पिकलेल्या आंब्याचा रस करतात.
    संच २१

    शाळेला मोठे मैदान आहे.
    सकाळी मैदानात प्रार्थना होते.
    दुपारी आम्ही तिथे खेळतो.
    मैदानात धमाल येते .
    संच २२

    सखाराम बांगड्या घेऊन येतो.
    रेशमी बांगड्या , वर्खी बांगड्या.
    लाल हिरव्या , सोनेरी बांगड्या.
    तो बांगड्या भरून देतो.
    संच २३

    फणसाला वरून काटे असतात.
    फणसाचे गर गोड लागतात.
    गऱ्यात आठळी असते.
    फणस खोडावर लागतात.
    संच २४

    दिवस आणि रात्र यांचा पाठ शिवणीचा
    खेळ आपण रोज पाहतो.
    दिवसानंतर रात्र येते.
    आणि रात्री नंतर पुन्हा दिवस येतो.
    संच२५

    रामू नावाचा एक शेतकरी होता.
    तो शेतात खूप कष्ट करत असे.
    त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर
    पिक येत.त्याला तीन मुले होती.
    तीनही मुले खूप आळशी होते.
    संच २६

    सुगरण नावाचा पक्ष्याचा खोपा झाडाच्या शेंड्यावर असतो.
    वाळलेल्या गवताच्या कड्यांच्या
    साहिय्याने ते घरटे विणतात.
    घरट्याच्या आत कापूस कागद
    कापड गोळा करून ते
    खोप्यात ठेवतात.
    संच २७

    मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता.
    अचानक त्याला
    मुसमुसण्याचा आवाज आला.
    त्याला पायरीवर फुलपाखरू
    पडलेले दिसले.होते.
    त्याने अलगद उचलले व सूर्यफुलाच्या
    शेतात अलगद सोडले .
    संच २८

    गाय पाळीव प्राणी आहे.

    गायचे दुध सर्वांना आवडते
    गायच्या शेणाचा उपयोग
    सारवण्यासाठी करतात.
    शेणाचा उपयोग
    बायोगॅस साठी करतात.
    दिवाळीत वासू बारसेच्या दिवशी
    तिची पूजा करतात.
    संच २९

    कुत्रा पाळीव प्राणी आहे .
    तो घराची शेताची राखण करतो.
    याशिवाय तो अनेक
    आपल्याला मदत करतो.
    पोलिसांनाही त्याची मदत होते.
    कुत्र्याला त्रास देऊ नये.
    तो आपला मित्र आहे.
    संच३०

    हत्ती जंगली प्राणी आहे.
    तो शाकाहारी प्राणी आहे .
    त्याच्या लांब दातांना सुळे म्हणतात.
    हत्तीला लांब सोंड असते.
    सोंडेचा उपयोग अन्न तोंडात
    घालण्यासाठी वस्तू उचलण्यासाठी करतो.
    संच ३१

    पोपट अनेक प्रकारचे असतात.
    आपल्या परिसरात आढळणारा पोपट हिरव्या रंगाचा असतो.
    त्याची चोच लाल चुटूक असते.
    त्याच्या गळ्याभोवती काळा पट्टा असतो.
    तो पट्टा गोफ घातल्या
    सारखा दिसतो.
    संच३२

    रामू मडकी विटा बनवत असे.
    त्याने गाढव कुत्रा हे प्राणी पाळले होते.
    कुत्रा घराची राखण करत असे.
    गाढव स्वत:च्या पाठीवरून माती,विटावाहून नेत असे.
    रामू नेहमी कुत्र्याला बाजारात सोबत नेत असत.
    त्यामुळे गाढवाला कुत्र्याला खूप राग येई.
    संच ३३

    एका जंगलात वानरांची वस्ती होती.
    ते नेहमी झाडांवर वास्तव्य करत.
    ऐके दिवशी लाकुडतोड्या झाडे तोडायला आला.
    ते पाहून वानरांचे पित्त खवळले.
    त्यांना वाटले लाकुडतोड्याचा बेत आपल्याला हुसकून लावण्याचा आहे.
    म्हणून वानरांनी त्याच्यावर हल्ला केला.
    संच ३४

    सूर्याच्या कोवळ्या किरणांबरोबरच
    सूर्यपक्षी फुलाफुलांमधील मध
    शोधायला फुलांवर तुटून पडतात.
    सूर्यपक्षी आकाराने चिमुकला पक्षी गडद जांभळ्या रंगाचा असतो.
    एका जागी फार काळ तो थांबत नाही.
    भुंग्याप्रमाणे तो सतत फुलांवर बागडणारा पक्षी आहे.
    संच ३५

    छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात.
    घरातील अनुभवी,वडीलधार्‍या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात.
    सदीर्मध्ये गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात.
    उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात.
    संच३६

    माणूस शेती करायला लागला.
    त्याची शेती पाण्याजवळ असे.
    तो शेताजवळ वस्ती करून राहू
    लागला. अशाप्रकारे वाड्यावस्त्या
    तयार झाल्या.या वाड्यावस्त्यांची
    पुढे गावे झाली व गावांची वाढ
    होऊन शहरे निमार्ण झाली.
    संच ३७

    प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या
    गरजा जिथे पूर्ण होतात, तिथेच
    ते सजीव आढळतात. वाघाच्या
    गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात,
    म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो.
    तर जी वनस्पतीपाणवनस्पती नाही,
    ती पाणथळ जागी तग धरत नाही.
    संच ३८

    जून महिन्यात आभाळात
    सगळीकडे काळे ढग
    हजेरी लावू लागतात.
    पावसाळ्याची चाहूल लागते.
    तोपर्यंत बाजारात फणस,
    करवंदे आणि जांभळे आलेली असतात.
    संच३९

    पाण्याशिवाय माणूस जगू शकत
    नाही. म्हणून पाण्याचा स्त्रोत मानवी
    वस्तीच्या शक्य तितकाजवळ असणे
    गरजेचे असते.त्यामुळे प्राचीन काळी
    नगरे वसली ती कुठल्यातरी
    मोठ्यानदीच्या तीरावर. आपल्या
    देशातअशी अनेक शहरे आहेत. उत्तर
    भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही
    आपल्या देशाची राजधानी आहे.
    संच ४०
    माकडे आणि खारी हे
    वृक्षवासी प्राणी आहेत.
    त्यांना झाडांमुळे आधार
    व अन्न मिळते. त्यांच्या
    विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात.
    त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे
    उगवतात. काही पक्ष्यांना घरटी
    बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा