-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    रविवार, २३ एप्रिल, २०२३

    उन्हाळी अभ्यासिका २ री व ३ री

     नवीन शैक्षणिक  धोरणानुसार FLN चे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेल्या  उन्हाळी अभ्यासिका 

    मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करा व डाऊनलोड करून वापरा पालाकंना ब्लॉगची लिंकही शेअर करा  

    इयत्ता पाहिलीतून दुसरीत जातांना 

    दुसरीतून तिसरीत जातांना  मराठी माध्यम अभ्यासिका डाउनलोड करा 
    दुसरीतून तिसरीत जातांना  सेमी माध्यम अभ्यासिका डाउनलोड करा 


    गुरुवार, १६ मार्च, २०२३

    "21 व्या शतकात स्विकारुया डिजिटल शैक्षणिक क्रांती”

               “२१ व्या शतकात स्विकारुया डिजिटल शैक्षणिक  क्रांती"

                  भारत डिजिटल शिक्षणाच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे, शाळा, विद्यापीठे आणि महाविद्यालये यांनी डिजिटलायझेशनचा अवलंब वाढल्याने, इंटरनेटचा वाढता प्रवेश आणि विद्यार्थ्यांची वाढती मागणी यामुळे समर्थित आहे. एका अहवालानुसार, भारतातील सक्रिय इंटरनेट वापरकर्ते 2025 पर्यंत 900 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, 2020 मध्ये 622 दशलक्ष सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांपेक्षा 45% वाढ झाली आहे. तसेच, 2025 पर्यंत देशातील इंटरनेट प्रवेश 55% पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

                          शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल शिक्षणाचा पर्याय  मोठ्या प्रमाणात येत आहे. त्याची सुरुवात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे दिसते. ३४ वर्षानंतर आलेल्या शिक्षण धोरणामध्ये याचा खोलात विचार केला आहे. पूर्ण धोरणांमध्ये डिजिटलायझेशन किंवा त्या संदर्भातील मुद्द्यांचा अनेक ठिकाणी  उल्लेख सापडेल. हे धोरण ठरवतांना त्यांनी ग्रामीण विद्यार्थी आणि शहरी विद्यार्थी दोघांचा विचार करून हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर भर दिला आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या नातेसंबंध प्रत्येक स्तरावर करण्याबाबत सूचित केलेले दिसून येते

                         इयत्ता सहावी पासून कोडींग प्रोग्रामिंग विषय समाविष्ट करून  विद्यार्थी ज्या भाषेत शिक्षण घेत असेल त्या भाषेमध्ये डिजिटल कन्टेन्ट विकसित करण्याचा मानस या धोरणात केलेला दिसतो.येथे प्रश्न निर्माण होतो एवढे डिजिटलायझेशन शिक्षणात होणार आहे त्यासाठी भारत तयार आहे का? ग्रामीण भागात इंटरनेट आहे का? १३० कोटी जनतेमध्ये स्मार्टफोनची संख्या ६० कोटी आहे.. हे गरिबांना परवडेल का? हा बदल केव्हा होणार? या प्रश्नाची उत्तरे आपणास कोरोना काळात मिळाली आहेत . जर कोरोना आला नसता तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बदलाचा वेग हा मध्यम धीमी गतीचा असता. पण कोरोना काळात दोन क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाला ते क्षेत्र म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि शिक्षण. न्यू एज्युकेशन पोलिसी मध्ये ब्लेंडेड एज्युकेशन सिस्टीम सुचवली आहे

                           या नवीन पध्दतीत विद्यार्थ्याने शिक्षकांचे  त्या-त्या विषयासंदर्भातील प्री रेकॉर्डिंग व्हिडिओ बघायचे आणि त्या नंतर वर्गांमध्ये त्या घटकाबाबत  चर्चा करायची.. प्रॉब्लेम सोडवायचे. यामुळे शिक्षकांची भूमिका ही बदलून ती मार्गदर्शक कडे जाईल. या पद्धतीचे शिक्षण जगातील कितीतरी देशात सध्या चालू आहे

                         नवीन शिक्षण धोरणात स्पष्ट सांगितले आहे की तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे दोन्ही आवश्यक आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे न्यू एज्युकेशन पॉलिसीला अपेक्षित आहे. कोविड १९ मुळे कितीतरी शाळेत  ऑनलाइन पद्धतीने शिकवायला सुरुवात झाली होती. अनेक शिक्षक आपल्या वर्गात  ऑगल्मेट रियालिटी सारखे तंत्र वापरून वर्गांमध्ये हत्ती, गाई आणून शिकवत आहेत. विद्यार्थ्यांसाठी मायक्रोसॉफ्टच्या शैक्षणिक ॲपचा वापर करून स्काइपवर अनेक  देशातील शाळांमधील त्यांच्या विद्यार्थ्यांची संवाद साधत आहेत. गॉलक्टिक एक्सप्लोरर या ॲपचा वापर करून शाळेत ग्रहमाला सहज दाखवत आहेत  . तंत्रज्ञान असो किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर असो तो तळागाळात वापरायला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात ग्रामीण भागातील किमान ४०% विद्यार्थी पूर्णवेळ शिक्षण प्रवाहात होते.झूम गुगल मिट द्वारे ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याचे चित्र दिसून येत होते.

                         आम्ही नाशिक जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी साहेब नाशिक जि..CEO डायट नाशिकच्या समन्वयातून स्थानिक केबलद्वारे शिक्षणाची गंगा सुरु केली होती.डायट नाशिक मार्फत मी स्वत: जिल्हास्तरावर दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेऊन प्रत्येक तालुक्यात सुलभक तयार केले होते. त्यांच्या मार्फत सर्व तालुक्यातील १००% शिक्षकांना झूम गुगल मिट द्वारे ऑनलाईन शिक्षण, whatsapp द्वारे अभ्यासमाला , गुगल क्लासरूमचा अध्ययन अध्यापनात वापर याबबत प्रशिक्षित केले होते.

                            डिजिटल शिक्षणाबाबत अनेक नकारात्मक मतप्रवाह आपल्याला दृष्टीक्षेपात येतात.डिजिटल शिक्षण ग्रामीण भागात शक्यच नाही अनेक ठिकाणी रेंजचा प्रश्न आहे असे समर्थन करून डिजिटल शिक्षणापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आज ७०% पालकांच्या कडे Android मोबाईल आहेत त्या गॅझेटचा योग्य रीतीने वापर करून घेतल्यास डिजिटल शिक्षणाचे द्वार सहज उघडता येईल यासाठी शिक्षक म्हणून आपली मानसिकता बदलाने फारच महत्वाचे आहे.

                         कोणत्याही ठिकाणी रेंज नसली तरी मोबाईलवर चांगले व्हिडीओ डाउनलोड करून देऊन आपण शिक्षणाची गंगा प्रवाहित करू शकतो. मी स्वत: यावर गेल्या वर्षापासून काम करत आहे. मी अध्ययन अध्यापनात PPT शो चा खुबीने वापर करत आहे . इयत्ता ली ते वी च्या मराठी विषयाचे १४८ KBC गेम शो तयार करून मुलांना अन्नाद्द्दयी शिक्षण देत आहे त्याच बरोबर इंटर अॅक्टीव नकाशा वाचन शोशेकडो क्लिक गेम शो, मराठी इंग्रजी बाराखडी शो. इतर PPT शो द्वारे मुलांना स्वयं अध्ययनासाठी डिजिटल शिक्षणाचा पर्याय निवडलेला आहे. या विषयावर SCERT मार्फत घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेत २०१९ २०२० दोन वर्षात माझ्या नवोपक्रामास राज्यातून दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.

                        विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे व्हावे त्यांना स्वयं अध्ययन पद्धतिने शिक्षणाची गोडी लागावी यासाठी ग्रामीण भागातील जिथे इन्टरनेट सुविधा अजिबातच उपलब्ध नाहीत त्या भागातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता निहाय डिजिटल शैक्षणिक App तयार केले असून या apps मध्ये बोटाने लिहिण्याची ,पुसण्याची लेखन केलेले शब्द उच्चारासह ऐकण्याची सुविधा देण्यात आलेली आहे यात स्वयं अध्ययन इयत्ता ली स्वयं अध्ययन इयत्ता री , स्वयं अध्ययन इयत्ता री , स्वयं अध्ययन इयत्ता थी या Apps चा समावेश आहे पाठ्यपुस्तकातील सर्व विषयांचे सर्व कंटेंट यात उपलब्ध करून देण्यात आलेले असून सर्व app ऑफलाईन चालतात. त्यासोबतच English Learning super Fun , Maths Genius , English Learning , Digital Fun Math Part-1 and part -2 असे नाविन्यपूर्ण App आपणास प्ले स्टोअर वर सर्च केल्यावर मिळतील ज्यांच्य द्वारे हजारो विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने स्वयं अध्ययन करत आहेत. मी महाराष्ट्र राज्य रिसोर्स पर्सन म्हणून NCERT च्या CIET मार्फत आयोजित कार्यशाळेचा एक भाग म्हणून गेल्या तीन वर्षापासून सहभाग घेत आहे

               राज्य केंद्र शासनामार्फत दीक्षा App हे सर्वोत्तम app निर्माण  करण्यात आले असून सर्व इयत्तांचे उत्तम कंटेंट यात उपलब्ध आहेत ज्याचा वापर प्रत्येक शिक्षकाने करणे गरजेचे आहे.

                           शिक्षकांनी स्वत:अपडेट होऊन डिजिटल शिक्षणाची कास धरणे काळाची गरज आहे. शिक्षकांना  ऑनलाइन शिक्षण देणारे बरेच प्लॅटफॉर्म्स आधीपासून उपलब्ध आहेत. त्यांच्यामार्फत तुम्ही देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांची प्रमाणपत्रे मिळवू शकतात . या तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून शिक्षक  जगातल्या कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळवू शकतो. सोबत परीक्षा देऊन तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळते.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या swayam.gov.in या पोर्टलवर भारतातील नामांकित संस्थांच्या शिक्षकांनी तयार केलेले कोर्सेस येथे अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत.त्यांत सहभाग घेऊन शिक्षकांनी स्वत:ला अपडेट ठेवावे व निपुण भारत चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे येण्याचा प्रयत्न करावा 

    श्री.प्रकाश लोटन चव्हाण  (प्राथमिक शिक्षक) 

    National ICT Awardee Teacher 

    जि.प.शाळा करंजवण ता. दिंडोरी जि.नाशिक 

    9960125981.