-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    ५} निष्ठुर मानवा


    ..................................
    निष्ठुर मानवा 
    ..................................

    असा कसा रे मानवा तू
    निष्ठुर झालास ?
    अदभूत सृष्टीचे सौंदर्य तू रे  
    नष्ट करण्यास निघालास ! ||१||

    बाजारी दुकानी  प्लास्टिकचा
     तू  वापर करू लागलास
    वाटेल तेथे हवे तसे
    त्याला भिरकावत राहिलास ! ||२||

    मुके बिचारे प्राणी ते
    अन्न समजून खातच राहिले
    पचनक्रिया थांबल्याने
    प्राणास मुकु लागले ||३||

    निर्दयी निष्ठुर मानवा तू
    बळी घेतसे हव्यासापोटी
    थांबव रे तू  प्लास्टिकचा
    पुढच्या निरोगी पिढी साठी ||४||

    निसर्ग सुंदर,सुदर जीवन
    घे त्याचा तू आनंद
    सृष्टीचे जीव जंतूनाही
    जगण्याचा मिळूदे परमानंद ||५||

    **************************************
    श्री.प्रकाश लोटन चव्हाण प्राथ.शिक्षक
     जि.प.शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि. नाशिक
    ९९६०१२५९८१

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा