प्रत्येकालाच असावा
एक छंद
ज्यातून मिळतो
स्वनिर्मितीचा आनंद ||१||
आपल्या कलागुणांना
मिळतो वाव
समाजात निर्माण
होतो आपला भाव ||२||
आपल्या विचारांना
मिळते एक दिशा
इतरांनी चांगले म्हणावे
याची नसते भाबड आशा ||३||
आपल्या व्यक्तिमत्वाचा
उलगळतो पैलू एक एक
समविचारी मित्र
मिळत जातात अनेक ||४||
वेळेचे भान छंद
जोपासतांना उरतच नाही
स्वत:साठीच वेळ दिल्याने
मानव समाधानी राही ||५||
नवनिर्मितीचा ध्यास
असतो व्यक्तिला
प्रेरणा मिळते आपल्या
नवविचाराला ||६||
निर्माण होते
एक एक संधी
मानव राहतो
व्यस्त आणि आनंदी ||७||
विना छंद
भरकटते जीवन
सतत चिडचिड
करते मन ||८||
छंदामुळे उलगडतात
आपल्या मनातील भाव
एक तरी छंद
तुम्हाला असुद्या राव ||९||
x
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा