७] तंत्रज्ञान वापरून मी अध्यापन कसे सोपे केले?
मुलांना चालती-
बोलती
चित्रं, कार्टून, व्हिडिओ गेम, टीव्ही खूपच आवडतं. त्यामुळे पहिल्यांदा मी लॅपटॉपवर त्यांना आवडणारे गेम, गमतीशीर व्हिडिओ, इंग्रजीच्या ऱ्हाईम्स असं दाखवू लागलो. मुलांना लॅपटॉपचे फारच कुतूहुल होते. सर लॅपटॉपला हात लावू देतात, ही त्यांच्यासाठी मोठी आश्चर्याची गोष्ट होती. मुलं तासनतास त्या लॅपटॉपमधे रमू लागली. याचा अर्थातच अपेक्षित परिणाम घडून आला. शाळेत येण्याचा कंटाळा करणाऱ्या आपल्या वर्गमित्रांनाही ते शाळेतल्या गंमती सांगू लागले. आणि मग शाळेतील लॅपटॉपवरच्या गंमती पाहण्यासाठी शाळा बुडविणारी मुलंही नियमित शाळेला येऊ लागली.
१] google 3d animals
द्वारे
प्राणी पक्षी प्रत्यक्ष वर्गात वावर करताहेत हा आभासी प्रत्यक्षानुभव मुलांना दिला ३डी मुळे
मुलांना प्राणी पक्ष्यांची पूर्ण ओळख
गुगल अर्थ द्वारे जगाची सफर....
२]गुगल map
द्वारे ठिकाण शोधणे,नकाशा,अंतर याबाबत माहिती देता येते.
एखाद्या
घटकाची माहिती कशी शोधावी याबाबतीत गुगल सर्च वापर
३]Google
Translate चा इंग्रजी शिकतांना केला जाणारा वापर
४]Youtube मध्ये पाठावर व अन्य घटकावर व्हिडिओ सर्च करणे
५]मोबाईलवर
व्हाईस टाईपिंग विषयी माहिती
६]संगणक ,Laptop
वर मुलांना टाईपिंग शिकवले.
७]Online
Test निर्मिती ती
सोडवून रिपोर्ट बघणे
८]सर्वात
जास्त ppt शो चा
प्रभावी वापर KBC गेम,क्लिक गेम यामुळे मुलांचा प्रत्यक्ष
सहभाग वाढला
९]विद्यार्थ्यांना
व्हर्च्युअल पध्दतीने शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी
१०]विविध app
ची निर्मिती करण्यात आली.
११]माझ्या
वर्गातील विद्यार्थ्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण मी केले आहे.
१} ज्यांच्याकडे Android मोबाईल आहे व ते नेटचा नेहमी वापर करतात.
२]
ज्यांच्याकडे फक्त साधा मोबाईल फोन आहे
३]
ज्यांच्याकडे संपर्काचे कोणतेही साधन नाही.
या तीनही
गटातील मुले माझ्या शाळेत वर्गात आहेत.त्यांच्यासाठी मी वर्गात विविध साहित्यांचा वापर
करून घेत असतो.
२ ऱ्या ३ ऱ्या गटातील मुलांना मी माझा स्वत:चा
मोबाईल, Tab शिक्षणासाठी
देतो व त्यांना शिकवण्यासाठी १ ल्या गटातील मुलांचा सहभाग घेत असतो.
यामुळे
मुलांचे सहध्य्यायी पद्धतीने शिकणे होते. मुलांचे शिकणे व माझे शिकवणे सोपे होत
जाते.
मी मुलांना स्वयं अध्यानासाठी ५०० च्या वर लॅमिनेशन
कार्ड तयार केली आहेत.त्यांचा उपयोग सुटीच्या काळात विद्यार्थ्यांना स्वयं
अध्यानासाठी करतात आजही माझ्या वर्गातील मुलांकडे ती कार्ड आहेत व त्या द्वारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा