काल आमच्या कोकणगाव
केंद्रातील मोठ्या भगिनी नुकतेच ६ महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या
त्यांचे दु:खद निधन झाले.
रक्षा बंधनाच्या दिवशी
अचानक निरोप घेणे काळजाला चटका लावणारेच होते.
त्यांचा विषयी शब्द बध्द
केलेली माझी रचना
"तुझ्या कार्याचे स्मरण हृदयातआमचे
सतत राहील".
शांत संयमी स्वभाव तुझा
कधीही न राग चेह-यावर
सतत कामात व्यस्त राहिलीस
कधी तक्रार न केली
कुणाच्या नावावर
आज रक्षाबंधनाच्या दिवशी
रेशीम धागा तुटला गं
अचानक तुझे एक्झिट होणं
काळजाला चटका बसला गं
कामावर प्रेम करणारे
व्यक्तिमत्व तुझे
आम्हाला सतत देतसे प्रेरणा
बळ
प्रामाणिक काम करण्याचे का
देव देतो असेच फळ?
हजारोंचे साहित्य दिले तू
आमच्या चिमुकल्यांना
भावना मोकळ्या न करता
पोरकं केला तू आम्हा
सहका-यांना
सन्मान तुझा करण्यासाठी
सज्ज होतो आम्ही ९ तारखेला
सर्व काही मनातच घेऊन
गेलीस
सुख दु:ख न सांगता आम्हाला
तुझ्या साहित्याकडे लक्ष
जाता
डोळे आमचे पाणावतील
सांगना गं ताई कसे त्याला
स्पर्श करण्यास हात आमचे
धजावतील
आठवणीच्या हिंदोळ्यावर
मन हे झोके घेतच राहील
तुझ्या कार्याचे स्मरण
हृदयात
आमचे सतत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली
प्रकाश चव्हाण & परिवार all Kokangaon Cluster Members
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा