माझी कविता
यंत्राला दे एकदिवसाची सुट्टी
अन्न वस्त्र निवारा नंतर
मोबाईल झाला महत्त्वाचा
अबाल व्रुद्धाना वेड लावून तो
नष्ट करी आनंद जीवनाचा ।।१।।
मोबाईलने वाटते रेे तुला
जग जवळ आल्या सारखे
पण संवादच हरवून बसलोय आपण
निखळ आनंदाला झालो पारखे ।।2।।
जगाची खबरबात,सर्व संदेश
मिळतात चुटकीसरशी
पण डाक पत्राद्वारे मिळाणा-या
संदेशासारखी गोडी नसते फारशी ।।३।।
कार्यालयिन संदेशाचीही याद्वारेच
होऊ लागली देवाणघेवाण
आज,आता ताबडतोब संस्कृतीचा ठेवावा लागतोय मान।।४।।
जलद संदेश वहनाने खरच थांबली का तुझी गरगर ?
नेहमीच्या या ट्रिंग ट्रिंगने
विचलित होते चित्त क्षणभर ।।५।।
शालेय विद्यार्थीही याच्या
प्रेमात पडून खेळतोय विदेशी खेळ
दिलेला टाक्स पुर्ण करतांना
स्वतः च्या जीवनाचा चुकतोय मेळ ।।६।।
बघता बघता कधी मिळवली
याने आपल्या जीवनावर सत्ता
खेळ,शिक्षण, आरोग्य विसरणारा तरूण
कशी टिकणार हो या भारताची विद्वत्ता ? ।।७।।
आप्तेष्टांना वेळ देण्या यंत्राला दे तू एक दिवसाची सुट्टी
स्वच्छदी आनंदाची अनुभूती घेशील सर्वांशी होईल गट्टी ।।८।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा