-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    मंगळवार, २८ मे, २०१९

    ATM संमेलन नाशिक २४ व २५ मे ची क्षण चित्रे


    कृतिशील शिक्षकांचा महामेळावा.
        *कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचा महामेळा,ज्ञानकुंभ मेळा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी दिनांक 24 25 मे 2019 रोजी पार पडला. we are one विद्यार्थी ,समाज व शिक्षक हिताय.”या ब्रीदवाक्य ने प्रेरित होऊन महाराष्ट्र भरातील नवोपक्रमशिल शिक्षकांना संघटीत करणारे विक्रमदादा एक जवाहीर सारखेच आहेत.मे महिन्यात नाशिकात संमेलन घ्यायचे नक्की झाले तेव्हा आमच्या अंगात नवउत्साह संचारला होता.त्रंबकेश्वर,MVP संस्थेचा हॉल,नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम स्कूलचा AC हॉल,जनार्दन स्वामींचा आश्रम स्थान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इत्यादी ठिकाणे पाहण्यात महिना गेला. सर्व ठिकानापैकी यशवंतराव  चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे ठिकाण दादाला फारच भावले पण तेथे आमची माजी विद्यार्थी हि ओळख त्यामुळे तेथे नाशिक ATM सदस्य पोहचू शकत नव्हते तेव्हा मदतीला धावून आले हेमंत सूर्यवंशी दाजी.मोनाताईव आम्ही नाशिककर ATM सदस्य पेक्षाही जणूकाही माझ्या मुलीचे लग्नकार्य आहे या दृष्टीकोनातून दाजी सर्वांच्या पुढे धावू लागले.दादांना कार्यक्रम स्थळाचे टेन्शन असतांना डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवत दाजींनी कुलगुरू,तेथील लेखादिकारी जाधव,पाईकराव सरांच्या जवळ संमेलनाचे महत्व सांगत काहीही झाले तरी संमेलन चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथेच घेऊ असा निश्चय ठेवत आपला हट्ट पूर्ण केला व नाशिकच्या निसर्गरम्य परिसरात महाराष्ट्रातील शिक्षकांना AC हॉल मिळवून देत उन्हाळ्यातही श्रावण मासासारखा ,वसंतऋतूचा गारवा देण्यात नाशिककर यशस्वी ठरले.
    विलास बापू गवळी,रमाकांत जगताप,शशांक पगार,जयदीप गायकवाड ,विलास जमदाडे,नामदेव बेलदार,किरण शिंदे,दत्तात्रय चौघुले,गजानन उदार,प्रदीप देवरे,विश्वास पाटोळे,रामदास शिंदे,मोनाताई,अनुताई,हेमंत दाजी यांनी नियोजनासाठी प्रत्येक मिटींगला उपस्थिती दर्शवत उत्तम नियोजनाची मुठ बांधली.
    विक्रम दादा,नारायण दादा,ज्ञानदेव माऊली या त्रिकुटाच्या सोबतीने ज्योतीताई यांनी गेल्या ५  वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्ष तयार झाले आहे.
    २०१५-१६  च्या पहिल्या संमेलनात एकवटलेल्या सदस्यांपैकी २५ टक्के माणिकमोती विखुरले मात्र अनेक हिरेही ATM मिळत गेले व ATM संघटन अधिकाधिक वाढत गेले याचा ATM सदस्य असल्याने मला सार्थ अभिमान आहे.
    दिनांक २३ मे रोजीच आमची धावपळ सुरु झाली. नाशिकच्या सर्व सदस्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो येथे नामोल्लेख करणे मला योग्य वाटत नाही,आपण आयोजक आहोत याचे भान ठेवत सर्वांनी आपल्याला शक्य असतील त्या कामाची जबाबदारी स्विकारत सर्व कामे पेलली व संमेलन यशस्वी करण्यात सर्वांनी सहकार्य केले म्हणून सर्व नाशिक ATM सदस्यांचे मनापासून धन्यवाद!

    आपल्या संमेलनासाठी आदरणीय कुलगुरू  ई.वायुनंदन साहेब अध्यक्ष म्हणून लाभले त्याचे कारण त्यांचातील  साधेपणातील मोठेपणा , विलक्षण बुद्धिमत्ता ,औदार्य,कुशल प्रशासक.
    सकाळी इ वायुनंदन साहेब,डॉ हितेश पनेरी,डॉ कविता साळुखे,पाईकराव सर,विक्रमदादा,ज्योतीताई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन त्यात आमच्या ATM नाशिक बघिनींचे सुस्वर स्वागत गीताने संमेलन हॉल मध्ये प्रसन्न वातावरण तयार केले.
    डॉ हितेश पनेरी साहेबांनी भारतीय संस्कृती व शिक्षण यावर सर्वांशी संवाद साधला. भारतीय संस्कृतीचा वारसा आपण का जपला पाहिजे हे त्यांनी विविध चित्र ,ppt तून पटवून दिले. व प्रश्नोत्तरातून सर्वांशी संवाद साधत शंकेचे निरसन केले.
    उपक्रमशील शाळा या सत्रात संदीप पवार सरांनी आपल्या जीरेवारी शाळेचा द्विशिक्षकी शाळेपासूनचा राज्याला आदर्श ठरणाऱ्या शाळेपर्यंतचा प्रवास कथित केला व एक शिक्षकाने ठरवले तर किती बदल सहज करू शकतो याचा संदेश आपणास दिला.त्यांच्या सोबतच लहू बोराटे सर यांनी आपल्या शैक्षणिक प्रवास मांडला,तर सचिन सूर्यवंशी सर यांनी एक व्यक्ती एक रुपया संकलन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत १३२ कोटी रुपये संकलानाचा संकल्प सर्वांना भावून गेला त्यापेक्षाही स्वत:ची जमीन विकून २० लाखाच्या निधीचे व्याज शाळेसाठी खर्च करणारा देशातील हा पहिला व एकमेव अवलियाला जवळून अनुभवता आले. किरण गायकवाड , संदीप शेजवळ सरांचा वस्ती शाळा पासूनच प्रवास व आधुनिक शिक्षणाची कास धरत शाळेच्या विकासासाठीची तळमळ आपणास अनुभवता आली.
    भोजन सत्रानंतरचे सत्र सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.आपल्या अपंगत्वावर मात करत आदर्श जीवन कसे जगावे याचा संदेश देणारे ATM सदस्य सुरेश धारराव,सोपान खैरनार,राहुल भोसले यांचे सत्र ‘माझा प्रेरणादायी प्रवास’
    सुरेश धारराव सरांनी बालपणी पोलियो झाल्याने निर्माण झालेले अपंगत्वावर मात करत मी कसा घडलो ? माझी खोडकर वृत्ती,माझा अभ्यास व्यासंग,माझे शिक्षकांचे बचतगट,शाळेतील राबवत असलेले उपक्रम,विज्ञानप्रदर्शन ,विशेष ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती विद्यार्थी प्रगती एक सामान्य शिक्षकापासून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार पर्यंतचा प्रवास शब्दबद्ध करत सर्वांना प्रेरित करून गेले.
    त्याच्याही पुढे असलेले व्यक्तिमत्व आम्हास अनुभवण्यास मिळाले ते म्हणजे सोपान दादा खैरनार आपल्या आई  बापाने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उरावणाऱ्या सोपानदादाचा अभिमान नाशिककर असल्याने अधिक वाटतो.आपल्या खोडकर स्वभावाने शालेय जीवनात स्वच्छंदी जीवन कसे जगलो,आपल्या गुरुजींनी खाद्यावर बसवून घडवून आणलेली सहल त्यामुळे यशस्वी जीवन जगण्याचा मंत्र कसा सापडला याचेगुपित उघडतांनाच दहावीच्या निकालाचा प्रसंग सर्वांचे हृदय हेलावून गेला,तर डी.एडला असतांनाचा अनुभवाने सर्वांना मनमोकळे हसवले आज पर्यत शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम कसे राबवले त्यांचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार पर्यंतचा प्रवास सर्वांना मोहित करून गेला. या दोघांबरोबरच सर्वांचे आकर्षणाचे केंद्र राहुल भोसले सर जवळजवळ १४ तासाचा प्रवास करून नाशिक गाठणारा हा अवलिया कोकमठाण नंतर दुसऱ्यांदा भेटला.आपल्या हातापायाने चालणाऱ्या भोसले सरांनी “आपण आपल्या स्वत:वर विश्वास ठेवा लोक काय म्हणतील या कडे दुर्लक्ष करा.”हा संदेश सर्वांना प्रेरणादायी ठरला. दुर्दम्य इच्छाशक्ती , चांगल्या चांगल्यांनाही लाजवणारा उत्साह आणि जीवन जगण्याची उर्मी खरोखरच सर्वांना सुन्न करणारी होती आपल्याला पंढरपूर व इतर ठिकाणी भिकारी समजणाऱ्याना दिलेली चापराख,आपल्या वैवाहिक जीवनाचे अनुभव सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते मात्र तेही मिश्किलपणे मांडण्याचे राहुलादादाचे कौशल्य सर्वांना भावून गेले.
    त्या नंतरचे सत्र म्हणजे बाळासाहेब लिंबकाई यांचे “मुलासाठी पुस्तकाचे प्रकट वाचन का?व कसे?”ह्या सत्रात  ppt द्वारे बाळासाहेब लिंबकाई सरांनी वाचनाचे नमुने सादर केले,वाचन वेग कसा असावा ? समजपुर्वक वाचन कसे असावे? याचे मार्गदर्शन करत चित्र गोष्टी वाचन करून वाचनानंतर प्रश्न कसे विचारावेत याबातीत आपले विचार मांडले व प्रश्नोत्तराद्वारे शिक्षकांशी संवाद साधला.
    सायंकाळी ज्यांची तमाम ATM सदस्य आतुरतेने वाट पाहत होते ते प्रमुख पाहुणे मॅक्सीन मावशी,मा.प्राची साठे मॅडम कार्यासन अधिकारी शिक्षण मंत्री महाराष्ट्रराज्य  यांच्या आगमनाने सर्वांच्या उत्साहात भर पडली सोबतच अधिकारी वर्ग मा डॉ वैशाली झणकर जिल्हा शिक्षणाधिकारी नाशिक ,मा.एल.डी.सोनवणे उपशिक्षणाधिकारी नाशिक zp, मा.सरोज जगताप गटशिक्षणाधिकारी निफाड,मा.सुलभा वाटारे गटशिक्षणाधिकारी पंढरपूर ,मा किरण कुवर निरंतर शिक्षण नाशिक यांचेही आगमन झाले. “शिक्षक प्रगल्भीकरण –एक प्रवास” सदरात  मा डॉ वैशाली झणकर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी Design for change या उपक्रमाची महिती देऊन शिक्षकांना प्रगल्भ केले. तर मा.सुलभा वाटारे गटशिक्षणाधिकारी पंढरपूर यांनी एक शिक्षक पासून अधिकारी पदापर्यंतचा प्रवास,तालुक्यात सुरु केलेले विशेष उपक्रम याबद्दल मार्गदर्शन केले.
    आज प्राची साठे ताईचा वाढदिवस होता तो संमेलनात आलेल्या चिमुकल्यांच्या सोबत सर्व ATM सदस्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला व ताईना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.तदनंतर मा विक्रम दादा व ज्योतीताई यांनी मा.प्राची साठे मॅडम कार्यासन अधिकारी शिक्षण मंत्री महाराष्ट्रराज्य  घेतलेली मुलाखत संस्मरणीय ठरली  आदर्श शिक्षक व अधिकारी यांच्यातील समन्वय कसा साधावा ,बालपणाच्या आठवणी,शिक्षण घेतानाचे अनुभव,सवैवाहिक जीवन,शिक्षकापासून कार्यासन अधिकारी पर्यंतचा प्रवास,शिक्षण क्षेत्रात घडत असलेले बदल त्यात शिक्षण मंत्र्यांची भूमिका,पाठ्यक्रमातील चांगल्या व चुकीच्या बाबी यासारख्या अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या व शिक्षकांच्याही प्रश्नांना समर्पक उत्तरे देत साठे ताईंनी सर्वांची मने जिंकली.या कार्याक्रमात माझ्या easy English app चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले हा माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग होय.
    रात्री जेवणानंतर कवी कट्ट्यात शिक्षकांमध्ये लपलेला कवी सर्वांना अनुभवायला मिळाला.गप्पा गोष्टी व काव्यकट्टा यात रात्रीचे १ कसे वाजले हे कुणालाच समजले नाही.
    दि २५ मे रोजीचा दिवस उगवला तो मा ई.वायूनंदन साहेब कुलगुरू YCMOU यांच्या सोबतीने.सकाळी सकाळी साहेबांनी सर्वांना विद्यापीठाचा परिसर पायी फिरत दाखवला.तेव्हा त्यांचात लपलेला निसर्ग प्रेमी,चाणाक्ष अधिकारी सर्वांना अनुभवण्यास मिळाला.विद्यापीठ परिसरातील फळबागा व इतर बाबींची साहेबांनी सर्वांना बारीकसारीक माहिती देत नाशिकचा निसर्ग दाखवला.
    सकाळ सत्राची सुरवात झाली ती मॅक्सीन मावशी यांच्या “ बालकांच्या सर्वांगीण विकासात मातृभाषेचे महत्व”या सदराने मॅक्सीन मावशीचे मराठी,तामिळ भाषेवरील प्रभुत्व पाहून सारा समूह थक्क झाला.चांगल्या चांगल्या विचारवंतांना,शिक्षण तज्ञांना मॅक्सीन मावशी भेटल्या नाहीत पण एक सामन्य शिक्षकांना त्या भेटल्या त्याचे कारण एकच ATM चे मॅक्सीन मावशीना असलेले आकर्षण. मॅक्सिन मावशी यांच अस्खलित मराठी बोलणे ऐकून शिक्षक म्हणून एक भाषा शिक्षणाची शिक्षणाच्या माध्यमाची खऱ्या अर्थाने जाणीव झाली.मुलांचा भाषिक विकासाचे टप्पे सांगत असतांना आपल्या भारतातील शिक्षण क्षेत्रातील प्रवास मावशींनी सांगितला.नारायण दादांनी तमिळ भाषेत सादलेला संवाद समजला नाही पण आनंद देऊन गेला.मावशिंबरोबर आलेले प्रकाशराव कसे घडले या विषयी त्यांनी सर्वांशी संवाद साधला.व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत मने जिंकली.
    मला सर्वात जास्त आवडलेलं सदर “माझा वेगळा उपक्रम”यात प्रथम वेच्या गावित सरांनी एका झोपडीतली शाळा पासूनची आपली शिक्षण क्षेत्रात सुरवात झोपडीचे आदर्श शाळेत रुपांतर,त्या परिसरातील बोलीभाषेमुळे संवाद साधण्यात येणाऱ्या अडचणी,परिसरातील बोली भाषा शिकतांनाचे अनुभव वेच्या सरांनी मांडले.
    तुकाराम अडसूळ यांचे पर्यावरणासाठी केलेलं अत्यंत प्रभावी असं काम प्रेरित करून गेले. शाळेतील अनुभव मुलांबरोबरच ग्रामस्थांना व मुके प्राण्यांना शिस्त लावणारा हा आदर्श अनुभवायला मिळाला.ज्या गावात शाळा म्हणजे हागणदारीचे ठिकाण असा समज होता तेथे वृक्ष लागवड करून प्रसन्न हिरवळ तयार केली त्या  हिरवळीला बघून नवविवाहित शाळेत फोटो काढायला येऊ लागले हि फोटो प्रेरित करून गेले  त्यांची पर्यावरण रक्षणाची समज समजून घेताना आपण सर्वच प्रभावित झालो.
    जगदीश कुठे यांनी शाळेचे पाहिलेलं स्वप्न पूर्ण करताना केलेली धडपड प्रेरणादायी होती .एका तांड्याच्या शाळेत १० खाजगी गाड्यांनी येणारी मुले त्यांच्या तळमळीची जाणीव करून गेली. ज्या शाळेत मुले दिसत नव्हती ती शाळा आता प्रवेश बंद चे बोर्ड लावू लागली यावरूनच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता व उपक्रम शिलता समजून येते.
    प्रदीप देवरे हा आमचा इंगलिश गुरु त्याचे  इंग्रजी विषयाबद्दल प्रेम इंग्रजी शिकण्यासाठी चे उपक्रम,माईडम्याप,मुलांना कृतीतून इंग्रजीचे  भन्नाट शिक्षण,इंग्रजी भाषा शिकण्याचे त्यांनी विकसित केलेले टप्पे,त्यांचा साहित्य संग्रह सर्वांना समृद्ध करून गेला
    नगर जिह्यातील लेझीम पटू आदर्श सखा लक्ष्मीकांत इडलवार यांनी लेझीमचा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यातून शाळेसाठी मिळालेला लाखोंचा निधी,मुलांची शाळेविषयीची आतुरता निर्माण करण्यात आलेले यश,youtube वरील व्हिडीओना मिळालेले लाखोंचे लाईक,हजारो शाळेत त्यांच्या लेझीम पथकाचे अनुकरण केले जाते
     आमचा गणित मित्र वाल्मीक चव्हाणयांनी  गणित मित्र या उपक्रमा संदर्भात सादरीकरण केले. सोशल मीडिया व्हाट्सअप यांचा सकारात्मक शैक्षणिक वापर करून गणिताविषयी च्या संदेशांची सेवा वाल्मिक वैभव शिंदे यांनी नुकतीच सुरू केली आहे.महाराष्ट्रभरातून तीन हजारपेक्षा जास्त शिक्षक विद्यार्थी पालक हे या उपक्रमास संलग्न आहेत. या माध्यमातून गणित उपक्रम अनुभव शैक्षणिक विचार शैक्षणिक साहित्याचा वापर विद्यार्थी अनुभव सर्वांशी शेअर केले जातात. प्रत्येक जण गणित मित्र होऊ या अशी विनंती त्यांनी उपस्थितांना दिली.
    सारिका ताई यांचे शैक्षणिक उपक्रमांबद्दल सर्वांना माहिती मिळाली सारिकाताईंनी आपल्या उपक्रमाचे संकलन केले असून त्याचे पुस्तक प्रकाशन करून सर्वांना त्यांच्या पुस्तकांची प्रत मोफत देण्यात आली. पूजा ताई यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती करून विद्यार्थी विकास कसा साधला याचे सादरीकरण केले.
    समारोप सदरात ई.वायूनंदन कुलगुरू YCMOU,मा.किरण मोघे साहेब माहिती आयुक्त,मा डी.डी.सूर्यवंशी साहेब ज्येष्ठ अधिव्याख्यातासंगमनेर DIECPD, डॉ प्रकाश अतकरे सर ,पाईकराव सर हि प्रमुख पाहुणे लाभली.प्रसंगी डॉ प्रकाश अतकरे सरांनी YCMOU मधील शिक्षणाच्या प्रमुख वाटा यावर विवेचन केले. मा.किरण मोघे साहेब माहिती आयुक्त यांनी मातृभाषेबरोबरच प्रादेशिक भाषा इंग्रजी भाषेचे महत्व विषद केले.मा.सूर्यवंशी साहेबांनी आपले ATM वर असलेले प्रेम,शिक्षणात उपक्रमशीलतेचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. पाईकराव सरांनी दोन दिवसातील संमेलनातील अनुभव सांगितले तर ई.वायूनंदन कुलगुरू YCMOU हे ATM चे झालेले आशिक त्यांच्या वाणीतून दिसून येत होता.आज पर्यंत अनेक विद्यापीठात प्रशिक्षण सत्र पहिले,अनेक शिक्षक समूहास मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली पण ATM शिक्षकांची विद्यार्थी गुणवत्तेसाठी सुरु असणारी तळमळ प्रथमच पाहायला मिळाली.शहरी भागातील प्राध्यापक व शिक्षकांचे नाते मार्मिक शब्दात त्यांनी व्यक्त केली.यापुढे जर विद्यापीठात ATMला काही उपक्रम राबवायचे असल्यास मोफत सभागृह मिळवून देऊ असा शब्द त्यांनी दिला.
    नारायण दादाने पुढील वर्षात ATM मार्फत राबव्यात येणाऱ्या उपक्रमाची  माहिती दिली.माऊलीने उपस्थितांचे आभार मानले. व सर्व उपस्थित ATM सदस्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून संमेलनाची सांगता झाली.
    २ दिवसीय संमेलनाचा निरोप घेण्याचा प्रसंग शब्दबद्ध करणे कठीण.
    २ दिवसात नामदेव बेलदार,खंडू मोरे,भरतपाटील,विश्वास पाटोळे सरांनी प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये टिपले,रामदास शिंदे,खंडू मोरे,विलास जमदाडे सरांनी वृत्तपत्रात संमेलनाची छान प्रसिद्धी दिली,सर्व ATM ताईंनी खूप छान सहकार्य केले येथे सर्वांचा  नामोल्लेख करणे शक्य नाही तर नाशिकच्या प्रत्येक सदस्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी  आपले अनमोल योगदान दिले याबद्दल सर्वांचे आभार!
    गजू व  दाजींनी विद्यापीठातील सुविधा मिळवण्यात मोलाचे सहकार्य केले त्यांचेही साभार अभिनंदन!

    श्री.प्रकाश चव्हाण
    ATM नाशिक





    ATM संमेलन नाशिक २४ व २५ मे ची क्षण चित्रे पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.