-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    ऑनलाईन देण्यात येणाऱ्या अभ्यासावर मोठ्या मर्यादा आहेत त्यावर काय उपाय करता येईल?



    महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या विविधता असलेला देश आहे.
    यात शिक्षण देत असतांना आपण विद्यार्थ्यांना अभ्यास देताना ३ गट पडतात
    } ज्यांच्याकडे Android मोबाईल आहे व ते नेटचा नेहमी वापर करतात.
    २] ज्यांच्याकडे फक्त साधा मोबाईल फोन आहे
    ३] ज्यांच्याकडे संपर्काचे कोणतेही साधन नाही.
    कोरोना नंतर बदललेल्या परिस्थितील शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम व त्यावर उपाय
    } ज्यांच्याकडे Android मोबाईल आहे व ते नेटचा नेहमी वापर करतात.
    ज्यांना नेट रिचार्ज करणे शक्य नाही अशा पालकांसाठी ग्रामपंचायत मार्फत दिवसातून किमान १ तास Wifi उपलब्ध करून त्यांना खालील प्रमाणे अभ्यास देता येईल.
    १] ऑनलाईन टेस्ट देणे
    २] Pdf अभ्यासिका तयार करून पाठवणे .
    ३] Youtube वरील विविध व्हिडिओ च्या लिंक शेअर करणे.
    ४] ऑफलाईन व ऑनलाईन चालणारी विविध app च्या साहिय्याने शिक्षण .
    प्रत्यक्ष संवाद माध्यमातून पुढील app द्वारे शिक्षण देता येईल
    फोटो दाखवणे



    } ज्यांच्याकडे मोबाईल आहे पण तो साधा मोबाईल आहे यांच्या साठी
    १] मिस कॉल द्या व गोष्ट ऐका या उपक्रमांचा वापर करता येईल.
    मुलांना दररोज एक गोष्ट ऐकायला लावायची व त्या ऐकलेल्या गोष्टींचा सारांश लेखन करायला लावायचे,ती गोष्ट घरातील व्यक्तींना सांगायला लावायची.
    २] पालकांना प्रत्यक्ष कॉल करून मुलांना दररोज चा अभ्यास द्यायचा.
    ३] मेसेज चा वापर करून मेसेज द्वारे पालकांना अभ्यास द्यायचा यासाठी स्वस्तातले मेसेज पॅक आपण घेणे गरजेचे आहे.
    ४] ग्रुप कॉलिंग चा प्रभावी वापर आपण अभ्यास किती प्रमाणात केला यासाठी करू शकतो पालकांना एक विशिष्ट वेळ द्यावी मुलांना त्यावेळेत मोबाईलवर बोलण्याची संधी द्यावी.
    } ज्यांच्याकडे मोबाईल नाही TV नाही यांच्या साठी
    हा घटक महत्वाचा घटक आहे. असे ७५ टक्के पालक आपल्या ग्रामीण भागात आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे जास्त गरजेचे आहे यांच्यासाठी स्वत: खर्च करण्याची तयारी आपण शिक्षकांनी ठेवायला हवी.
    १] PDF लॅमिनेशन अभ्यास कार्ड तयार करून मुलांना वाटप करणे यात आपण अंगणवाडी ताईची मदत घेऊ शकतो.
    त्यांचाकडे कार्ड ठेवणे पालक दररोज येतील कार्ड घेऊन जातील दुसऱ्या दिवशी कार्ड जमा करून नवीन कार्ड घेतील
    २] गावात झेरॉक्स दुकान असेल तर त्या झेरॉक्स वाल्यांना दररोज एक pdf पाठवून आपल्या वर्गातील पालकांना  दररोज मुलांचा अभ्यास करायला लावणे व ते सर्व अभ्यास कागद जपून ठेवायला लावणे.
    ३] गावात झेरॉक्स दुकान नसेल तर शहरातून कुणी त्या गावात दररोजचा प्रवास करत असेल अशा व्यक्तींची मदत घेऊन त्यांना दररोज एक pdf पाठवून झेरॉक्स काढायला लावून  आपल्या वर्गातील पालकांना  पोहचवण्याची विनंती आपणास करता येईल.
    एखादा अभ्यासक्रम आपल्याला  आता विविध पर्यायातून शिकवता येऊ शकतो. एका गल्लील माळ्याच्या वस्तीत राहणाऱ्या मुलांचा गट तयार करून एकत्र जमून दुरस्त पद्धतीने आपण शिकवू शकतो.
    यात त्या वस्तीतील शिक्षित तरुण तरुणीचे आपण सहकार्य करून शिक्षण देऊ शकतो.यात पालकांची भूमिका महत्वाची असणार आहे. पालकांनी ठराविक वेळेस त्या ठिकाणी मुलांना ने आण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी

    1 टिप्पणी: