स्वप्नातला भारत
गुलामगिरीच्या जखडातून मुक्त करण्या देश
लाखो क्रांतिकारक झाले शहीद |
भ्रष्ट राजकारण अनितीत मानवा
तू केलेस रे स्वत:ला कैद ||१||
ना बाळगली पर्वा परिवाराची
ना भीती मरणाची त्या क्रांतीकारकांना |
आज अन्याय अनीतीचे राजकारण करतांना
कसा विसरलास तू रे त्या बलिदानांना ||२||
स्वतंत्र भारताचा डंका वाजवतोस मग
का सुरक्षित वाटत नाही स्त्रियांना ?
रक्षण करतेच शोषण करती
सांग कोण देईल न्याय त्या अबलांना ||३||
असत्याचा विजय होतसे
सत्यवान सोसतो आहे वनवास |
भ्रष्टाचार मुक्त देश करण्या तू
का ठेवतो इतरांवर आस ? ||४||
चल उठ मानवा पेटव मनात
नवक्रांतीची विशाल ज्योत |
बंध तोड तू अन्याय अनीतीचे
घडवाया स्वप्नातला भारत ||५||
श्री.प्रकाश लोटन चव्हाण
प्राथमिक शिक्षक
जि.प.शाळा –बोरस्तेवस्ती
ता.निफाड , जि. नाशिक
९९६०१२५९८१
chavanprakash001.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा