इंग्रजी समान उच्चाराचे शब्दांचा video direct link ने डाऊनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
- महत्वाच्या वेबसाईट
- शाळा सिद्दी लॉगीन
- शाळा सिद्दी माणके पुस्तिका
- माहितीचा खजिना /span>
- महाराष्ट्र तासिका वाटप GR
- CCE मूल्यमापन प्रक्रिया
- Marquee Codes
- शाळा इमारत निर्लेखन फाईल
- संपूर्ण Excel शिका Video पाहून
- पाठ्यपुस्तक डाऊनलोड करा
- आदर्श व संगीतमय परिपाठ
- इ-लर्निंगसाठी महत्वाचे
- कविता KG ते ८ वी
- बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिका
- ब्लॉग Address तयार करणे
- ब्लॉग डिझाईन सेटिंग
- ब्लॉग हेडर इफेक्ट
"> ब्लॉग पेजेस तयार करणे /span>
"> ब्लॉगवर स्लाईड शो तयार करणे /span>
"> ब्लॉगवर हलती अक्षरे add करणे /span>
"> ब्लॉगवर सरकती चित्रे व अक्षरे add करणे /span>
रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६
माझी शाळा माझे उपक्रम
🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
माझी शाळा माझे उपक्रम
उपक्रम :चला वर्गीकरण करूया.
इयत्ता :3 री
कृती :
👉प्रथम दोन रिकामे box घ्या..
👉त्याला रंगीत आवरण लावा.
👉box वर ओला कचरा व सुका कचरा असे नावे लिहा.
👉कागदाच्या चिठ्ठ्या तयार करा.
👉चिठ्ठ्या वर कच-याची नावे लिहा.
उदा.केळीचे साल,रद्दी पेपर,भाज्यांची देठ,पेन्सिल तुकडे. ….
👉 एक एक विद्यार्थीला जवळ बोलवून चिठ्ठ्या वाचून तो कचरा
कोणत्या कचराकुंडीत टाकायचा प्रश्न विचारावेत.
व त्या box मध्ये ती चिठ्ठी टाकायला लावणे.
👉 एक विद्यार्थी वर्गीकरण करत असतांना अन्य विद्यार्थी वहिवर दोन भाग करून
ओला कचरा व सुका कचरा लेखन करतील.
👉 अचूकपणे वर्गीकरण केल्यावरसर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉 या प्रमाणे ओला व सुका कचरा विद्यार्थी वर्गीकरण सहज करतात.
🌷🌷🌷🌷🌷🌷
उपक्रमांची यशास्विता.....
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👉 वर्गीकरण कसे करावे हे विद्यार्थी समजतो.
👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून योग्य अध्ययनाची सवय वाढीस लागते .
👉 घरी देखील असाच दोन भागात कचरा संकलित करावा हे समजतो.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
👉 🌷🌷🌷🌷👇👇 🌷🌷🌷🌷
माझी ज्ञानरचनावादी शाळा माझे उपक्रम पहा
chavanprakash001.blogspot.in वर
माझी शाळा माझे उपक्रम
उपक्रम :चला वर्गीकरण करूया.
इयत्ता :3 री
कृती :
👉प्रथम दोन रिकामे box घ्या..
👉त्याला रंगीत आवरण लावा.
👉box वर ओला कचरा व सुका कचरा असे नावे लिहा.
👉कागदाच्या चिठ्ठ्या तयार करा.
👉चिठ्ठ्या वर कच-याची नावे लिहा.
उदा.केळीचे साल,रद्दी पेपर,भाज्यांची देठ,पेन्सिल तुकडे. ….
👉 एक एक विद्यार्थीला जवळ बोलवून चिठ्ठ्या वाचून तो कचरा
कोणत्या कचराकुंडीत टाकायचा प्रश्न विचारावेत.
व त्या box मध्ये ती चिठ्ठी टाकायला लावणे.
👉 एक विद्यार्थी वर्गीकरण करत असतांना अन्य विद्यार्थी वहिवर दोन भाग करून
ओला कचरा व सुका कचरा लेखन करतील.
👉 अचूकपणे वर्गीकरण केल्यावरसर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉 या प्रमाणे ओला व सुका कचरा विद्यार्थी वर्गीकरण सहज करतात.
🌷🌷🌷🌷🌷🌷
उपक्रमांची यशास्विता.....
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👉 वर्गीकरण कसे करावे हे विद्यार्थी समजतो.
👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून योग्य अध्ययनाची सवय वाढीस लागते .
👉 घरी देखील असाच दोन भागात कचरा संकलित करावा हे समजतो.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
👉 🌷🌷🌷🌷👇👇 🌷🌷🌷🌷
माझी ज्ञानरचनावादी शाळा माझे उपक्रम पहा
chavanprakash001.blogspot.in वर
बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६
एक अविस्मरणीय वारी
शिक्षणाची पंढरी समजल्या जाणा-या पुणे शहरात
दि.२७ ते ३१ या कालावधीत शिक्षणाची वारी महाराष्ट्र सरकार तर्फे मा.शिक्षण मंत्री
विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. या वारीत निफाड तालुक्यातून
मा.नेहा शिरोरे मॅडम विस्तार अधिकारी निफाड यांच्या नेतृत्वाखाली १६ उपक्रमशील
शाळेतील शिक्षकांचे एक युनिट सहभागी झाले होते.त्यात मला सहभाग होण्याची संधी
मिळाली याचा मनस्वी आनंद होत आहे.
नाशिक जिल्ह्यातून २०० उपक्रमशील शिक्षक
दि.३०/०१/२०१६ रोजी १०.०० वाजता रात्री शासकीय कन्याविद्यालयात एकत्र जमले होते.
त्यात एक विशेष बाब मला जाणवली ती म्हणजे मा. मोगल साहेब जिल्हा शिक्षण अधिकारी सर्व
शिक्षकांचे स्वागत साठी पूर्ण वेळ तेथे थांबले. तसेच मा.जगताप मॅडम
गटशिक्षणाधिकारी निफाड या देखील आम्ही पुण्याला प्रस्थान करे पर्यंत थांबल्या
प्रत्येक शिक्षकांची वैयक्तिक विचार पूस करून शिक्षण वारीसाठी मा. मोगल साहेब व
मा.जगताप मॅडम यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या.अधिकारी वर्ग देखील आमच्यासाठी
रात्री पूर्णवेळ थांबून वारीला जाणा-या शिक्षकांना प्रेरित करत होते हि गोष्ट आमच्या साठी खूपच अभिमानाची होती.
रात्री ११ वाजता आम्ही नाशिकहून पुण्याकडे
प्रस्थान केले.व रात्री ३.०० वा. ओझर येथे मुक्कामला थांबलो. कोणत्याही शुभ
कार्याची सुरवात श्री गणेशाच्या पूजनाने आपण करतो. आमच्याही वारीची सुरवात
दि.३०/०१/२०१६ रोजी ओझरच्या श्री गणेशाच्या दर्शनाने झाली.व दर्शनानंतर आम्ही
१०.०० बालेवाडी पुणे येथे पोहचलो.
भव्य दिव्य बालेवाडी स्टेडीयम मध्ये
शिक्षणाची वारी सजलेली होती. मा.नेहा शिरोरे विस्तार अधिकारी निफाड यांच्यासह
आम्ही स्टेडीयम मध्ये प्रवेश केला. आयोजनाचे भव्यदिव्य स्वरूप पाहून आश्चर्याचा
धक्का बसला.अतिशय नियोजन बद्दरित्या तेथे एकेक युनिटला प्रवेश दिला जात होता.कोणतीही
धावपळ नाही कोणताही गोंधळ नाही. पंढरीचे वारकरी ज्या प्रकारे विठ्ठलाचे दर्शनाला
आपल्या वारकरी शिस्तीचे पालन करतात त्याच पद्धतीने सर्व शिक्षक व अधिकारी एकत्र
येवून स्वयं शिस्त पाळत होता.
हॉल मध्ये प्रवेश केल्यावर आतील दृश्य
शैक्षणिक क्षेत्रातील विस्मयकारक काम करणा-या शिक्षकांच्या विविध स्टॉलने सजलेला
होता .एकूण ५४ स्टॉल ३ हॉलमध्ये भरवण्यात आले होते.प्रत्येक स्टॉलवरील उपक्रमशील
शिक्षक व त्यांचे अधिकारी अतिशय तन्मयतेने आपल्या उपक्रमाची माहिती सदर करत
होते.अधिकारी व शिक्षक मधील दरी कुठेही दिसत नव्हती.
आमच्या विस्तार अधिकारी मा.नेहा शिरोरे मॅडम आमच्यापेक्षाही अधिक
माहिती प्रत्येक स्टॉल मध्ये जाणून घेत होत्या. शिक्षणाची तळमळ अजूनही एवढ्या
प्रमाणात आमच्या मॅडममध्ये आहे हे पाहून आम्हाला जणू स्फुर्तीच चढत होती.हजारो
शिक्षक व अधिकारी वारीसाठी व स्टॉल पाहण्यासाठी हॉलमध्ये फिरत होती पण प्रत्येक जण
मला काहीतरी घ्यायचे आहे.जे समोर दिसत आहे ते सर्व मला घ्यायचे आहे.नजरेत समाविष्ठ
करायचे आहे.यासाठी स्पर्धात्मक रित्या प्रत्येक स्टॉलवर गर्दी करत होता मात्र
तेवढीच स्वयंशिस्तही पळतांना दिसत होता.बाहेर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना १
गाईड देण्यात आलेला होता आमच्या गटासाठी आरती कुंडले या गाईड देण्यात आल्या होत्या
त्यानी आम्हाला हॉलमध्ये नेले व विविध
स्टॉलची माहिती दिली.
संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानारचनावाद
अध्ययन अध्यापनाची खरी ओळख करून देणा-या कुमठे बीटच्या भराडे मॅडम व त्यांचे
शिक्षकांनी राबवलेले आदर्श उपक्रमांनी पहिला स्टॉल सजला होता सर्वात जास्त गर्दी
या स्टॉलवर होती.कुमठे बीटाला मला जाण्याची संधी मिळाली नव्हती पण ख-या कुमठे
बीटाची ओळख मला याठिकाणी झाली.मी नेहा शिरोरे मॅडमबरोबर आलेलो आहे असे भराडे मॅडम
यांना सांगितल्यावर आपल्या स्टॉलची माहिती देण्यापुर्वीचा मला त्यांनी तुमच्या निफाड
तालुक्याने काही कालावधीच खूपच उत्तुंग भरारी घेतली असे सांगितल्या बरोबर खूपच
आनंद झाला. आमच्या शिक्षकांच्या कार्याची दाखल राज्यस्तरावर घेतली जात आहे हे एकूण
छान वाटले.त्यांच्या साहित्यांची ओळख करून घेतली .२ रा स्टॉल सहयोगी
दल पुणे यांचा होता.विविध खेळातून शिक्षण येथे अनुभाण्यास मिळाले.
३ रा व ४ था स्टॉल
वाई तालुका सातारा यांचा होता. ज्ञानारचनावाद आधारित विविध साहित्य त्यांची मांडणी
व त्या शिक्षकांची उपस्थितांना आपल्या उपक्रमांची सांगण्याची तळमळ वाखाणण्यासारखी
होती.दिवसभर येणा-या गर्दीला कंटाळा न येता जेजे आपणास ठावे तेते इतरांना द्यावे
या वृत्तीने तेथील शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत होते. ५ वा स्टॉल केंजळ
ता.भोर यांचा होता.ABL
शिक्षण पद्धतीचा
वापर व लोकसहभागाची माहिती आम्हाला येथे मिळाली. ६वा स्टॉल पुणे महानगर पालिकाचा
होता. ७ व्या स्टॉलवर वेबसाईट निर्मिती व इ लर्निग साहित्य निर्मिती याची माहिती
मिळाली.
८ व्या व ९ व्या
स्टॉलवर धुळे जिल्ह्याच्या निकुम्बे व साळवे शाळा यांचा लोकसहभाग व इलर्निग सुविधा
व प्रत्येक गावात अधिकारीच्या प्रेरणा सभा त्यातून एक वर्षात २ कोटीचा लोकसहभाग
मनाला प्रेरित करून गेला. यासारखे ५४ स्टॉलवर उपक्रम सजवण्यात आलेले होते त्यातील
माझ्या मनाला भावलेले काही स्टॉल...
स्टॉलक्र. १२
कात्रजचासंगीतोपचार करिता आवश्यक राग व उपयोग
स्टॉलक्र.१३ कला व कार्यानुभव
बाहुली नाट्य निर्मिती येथे प्रत्यक्ष बाहुल्या निर्मिती शिकण्यास मिळाली. स्टॉल क्र.
१५ हवेली पंचायत समितीचा शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर लोकसहभागातून हवेली
तालुक्याचा शैक्षणिक विकास याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. स्टॉल क्र. १६ येलाशुवाडी
ता.संगमनेरचा यात मराठी शाळा इ-लर्न्निग साहित्य मोफत डाऊनलोड साठीची वेबसाईट
पाहायला मिळाली. स्टॉल क्र.१७ माढा तालुका सोलापूर यांचा QR कोड
निर्मिती मनाला भाहून गेली स्टॉल क्र.१८ गडहिंग्लज
पं.स.कोल्हापूरचा ज्ञानारचनावाद अध्ययन अध्यापनाची विविध साहित्य निर्मिती व वापर
यांनी भरलेला होता.स्टॉल क्र.१९ स-समानतेचा
भारतीय स्त्री शक्तीचे दर्शन घडवणारा होता. स्टॉल क्र.२० जनता विद्यालय मालेगाव नाशिक
यांचा होता.हॉल मध्ये प्रवेश
केल्यावर गारखेडा बीट औरंगाबाद यांचे साहित्य लक्ष्य वेधून घेत होते. स्टॉल क्र.२४
पुणे दौंड तालुक्यातील मुगाव शाळा यांचा
कमी खर्चात डिजिटल शाळा सर्वाना आकर्षित करत होता. स्टॉल क्र.२५ कोंढापुरी
ता.शिरूर पुणे यांचा होता. स्टॉल क्र.२७ उर्दू माध्यमिक शाळा घाटलाडकी अमरावती
यांचा होता.MahaHelp
वेबसाईटची वेगळी ओळख
करून देणारा होता. स्टॉल क्र.२८महालदारपुरी जि.उस्मानाबाद यांच्या शैक्षणिक
निर्मितीने सजला होता.
आमचे मित्र विक्रम अडसूळ सर व त्याच्या टीमचा स्टॉल क्र.२९
येणा-या सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.विविध शैक्षणिक खेळ व साहित्य जाणून
घेण्यासाठी शिक्षक रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत होते.राज्य स्तरावर आपला ठसा
उमटवणारी बंडगरवाडी ता. कर्जत अहमदनगर याच्या साहित्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलेले
गर्दीवरुनच दिसून येत होता.
स्टॉल क्र.३०नळणी जि.जालना
यांचा होता. तर स्टॉल क्र.३१ चिखली जि.बुलढाणा यांच्या साहित्यांनी सजला होता. स्टॉल
क्र.३२ कान्हूर मेसाई ता. शिरूर यांच्या गणिती साहित्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. स्टॉल
क्र.३३दसरखेड मलकापूर जि. बुलढाणा यांचा
भूगोल विषय शिकवण्यास साहाय्य करणारी video क्लीपने
भरला होता. स्टॉल क्र.३४गिरड ता. भडगाव,जळगावचा होता. स्टॉल क्र.३५ गोरेगाव मुंबई
यांचा पाठ्यपुस्तकांचा विविधांगी वापर,फळ्याचा वापर,मूल्यमापन गटनिर्मिती शिकवणारा
होता.त्याच्या शेजारी किशोर विभागाचे साहित्य विक्री केंद्र होते तेथे विविध
उपयोगी पुस्तके खरेदीसाठी शिक्षक गर्दी करत होते. स्टॉल क्र.३७ सोनपेठ जि.परभणी यांचा
समाज सहभाग लक्ष्य वेधत होता व समाजसहभागाची प्रेरणा देत होता. स्टॉल क्र.३८ टीच फॉर
इंडिया पुणे यांनी शिकवण्याचा विविध स्कील शिकवत होता. स्टॉल क्र.३९ भाषा
शिक्षणाची कृती योजना पुणे महानगर पालिका शिक्षकांचा होता. स्टॉल क्र.४० नांदगाव
जि.अमरावती व स्टॉल क्र.४१ यांचा खेळातून शारीरिक व शैक्षणिक विकास यांचा समन्वय
कसा साधावा हे शिकवणारा होता.स्टॉल क्र.४३ ओंकार
बालवाडी औरंगाबाद बाल संस्कारचे मूर्त रूप दर्शवणारा होता.शिशुवाटीका लक्ष वेधत
होता. स्टॉल क्र.४४ लेंड – अ- हॅड पुणे यांचा साहित्य संग्रह व व्यावसायिक
शिक्षणाचे धडे देणारा होता. स्टॉल क्र.४८ गावपोड ता.घाटंजी यवतमाळ यांचा उपक्रम
बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे शिक्षकांना प्रेरणा देणारा होता. स्टॉल क्र.४९ श्री
शारदा भवन हायस्कूल नांदेड यांचा कविता अध्यापनाचे टप्पे कविता चाली याचे दर्शन
घडवणारा होता. स्टॉल क्र.५० शिंदेवस्ती म्हसवड ता.माण सातारा येथील तंत्रस्नेही व
ऑफलाईन अॅप निर्मिती करणारे शिक्षक बालाजी जाधव यांचा होता.विविध अॅप ची माहिती
येथे शिक्षकांना देण्यात येत होती. संपूर्ण राज्यात इ-लर्निगचा व डीजीटल शाळेच्या
लळा लावणारे संदीप गुंड सरांचा पष्टेपाडा शाळेचा स्टॉल क्र.५१ होता. स्वत: संदीप
गुंड ज्ञानरचनावाद वडीजीटल शाळा यांचा समन्वय साधणारी अध्यापन पद्धती शिकवत होते.
स्टॉल क्र.५२ येथे मला अविस्मरणीय प्राथमिक शिक्षिका सौ.मोहिते मॅडम पाहायला
मिळाल्या जि.प.शाळा कारी ता.जि.सातारा येथे मुलींचा दोरखांबचा चमू त्यांनी तयार
केला आहे. त्यांचे प्रात्यक्षिक डोळ्याचे पारणे फेडणारा होता. स्टॉल क्र. ५३
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांचा होता.इंग्रजी शिक्षणाची काळाची गरज
इंग्रजीवर कमांड कशी मिळवावी याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. स्टॉल क्र.५४ इझी
टेस्ट अॅड इझी क्लास चा होता.
असा १ ते ५४ स्टॉलमध्ये
आम्हाला शिक्षणाचा खजिना अनुभवायला मिळाला.
संध्याकाळी स्टेडियम
हॉलमध्ये
समारोप प्रसंगी सायं.४.३० वा.सर्व वारकरी सेन्ट्रल हॉलमध्ये एकत्र जमलो.मा.नंदकुमार साहेब [शिक्षण सचिव],मा.प्राची साठे [विशेष का.अ.शिक्षण मंत्री],शीतल बापट सानेगुरुजी फौंडेशन,सुवर्णा खरात उपसचिव,मा.गोविंद नांदेडे[संचालक-SCERT],पांढरे साहेब[सहसंचालकSCERT]मा.विलास तावडे- शिक्षण मंत्रींचे बंधू, डॉ.पुरुषोत्तम भापकर –आयुक्त शिक्षण म.राज्य. सर्व टीमचे विस्तार अधिकारी व २०००उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.
तद्नंतर भराडे मॅडम
यांनी आपल्या कुमठे बीटाचा शैक्षणिक विकास कसा झाला याची माहिती दिली व
शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मा.नंदकुमार साहेब यांनी १ तास उपस्थित
शिक्षकांना आपल्या गोड वाणीने मंत्रमुग्ध केले. शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने
प्राथमिक शिक्षणासाठी राबवलेले विविध उपक्रमांचे तोंड भरून कौतुक केले.व
शिक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.यात मा.नेहा शिरोरे मॅडम विस्तार
अधिकारी निफाड याच्या उपक्रमांबाबत मा.नंदकुमार साहेब यांनी वैयक्तिक चौकशी केली व
आम्हा निफाडच्या शिक्षकांना वैयक्तिक वेळ दिला.याचा आम्हाला अभिमान आहे.
राज्यस्तरावर
उपक्रमशील शिक्षकांना आपल्या कौशल्य दाखवण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून
दिली याबाबत शिक्षण मंत्री मा.विनोद्जी तावडे व राज्य सरकारचे मनापासून धन्यवाद !!!!
आमची मा.नेहा शिरोरे
मॅडम विस्तार अधिकारी निफाड यांच्यासोबत शिक्षण वारीसाठी निवड केल्याबद्दल
मा.जगताप मॅडम व पं.समिती निफाडचे त्रिवार अभिवादन !!!!!!
शब्दांकन
श्री.प्रकाश लोटन
चव्हाण
जि.प.शाळा
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि.नाशिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)