-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    माझी शाळा

                                                                            शहराच्या जवळ पण मळ्याच्या वस्तीत छोटीसी माझी शाळा.
    जि.प.शाळा बोरस्तेवस्ती , साकोरेमिग .त.निफाड .जि. नाशिक.  शाळेत२०११ या साली  जेमतेम 15 ते २० मुले मुली तेही अशिक्षित पालकांची ज्यांचे ध्येयय फक्त दोन वेळचे जेवण मिळावे हेच•  दि.०१.०६.२०११ रोजी  बदलीने शाळेत रुजू झालो . शाळेचा पहिला दिवस १२ वाजले पण एकही विद्यार्थी शाळेकडे आलाच नाही . जोडीला पवार सर त्यांचीही बदली माझ्याबरोबरच झालेली. दोघांचाही बोरस्तेवस्ती शाळेतील पहिला दिवस १२ वाजेनंतर मात्र अनामिक भीती वाटू लागली शाळेत मुले आहेत की नाही दोघांनी मळ्यातील वस्तीत फेरफटका मारला २ मुले सापडली तीही इ.३ व ४ थीची. दखलपात्र विद्यार्थी शोधूनही सापडेना कारण ज्या मुलांची नावे खानेसुमारीत होती ती पालकच वस्ती सोडून दुसरीकडे स्थलांतरीत झालेली होती.  २-३ दिवसानंतर ८-१० मुले शाळेत आली . मग विद्यार्थी शाळेत न येण्याच्या समस्सेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परिसरातील पालक शालेय भौतीक सुविधा व शैक्षणिक प्रगतीवर नाराज असल्याचे दिसून आले .साकोरेमिग व बरडवस्ती शाळेत मुलांना बसायला बेंचेस होते.त्यामुळे शाळेजवळील मुले देखील त्या शाळेत २-२ की.मी पायी जात होते. अन्य शाळेत जाणाऱ्या पालकांच्या भेटी घेतल्या मात्र आम्ही दोघेही शिक्षक नवीन असल्यामुळे आमच्या म्हणण्याकडे कोणीही गांभीर्याने पहात नव्हते. शाळेत इ. १ ली ला एकच मुलगी दाखल झाली . तीही शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची. आपण बदलीने आलो आणि शाळा बंद पडलीतर आयुष्यभर आपल्याला हि गोष्ट खात राहील.या विचारांनी अस्वस्थ झालो. तेव्हा ठरवले काहीही झाले तरी शाळा बंद पडू द्यायची नाही.
                    त्याच वर्षी SSA  अंतर्गत बालमहोत्सव शाळेत साजरा करण्याबाबत शासन निर्णय आला व आपले कार्य परिसरातील पालकांना दाखवण्याची नामी संधी चालून आली. शासकीय अनुदान व त्याच्या जोडीला दोघेही शिक्षकांनी १५०० -१५०० रु.टाकून विविध उपक्रम व साहित्यांची निर्मिती केली.परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींना शाळेत आमंत्रित केले.शालेय परिसर पताके लावून सजवला . शाळेत नवीन काही उदयास येत आहे असे ग्रामस्थांना वाटले. नवीन काही  दिसले तर माणूस थोडा वेळ थांबतोच. तसेच झाले.कधीही न पाहिलेल्या गोष्टी ग्रामस्थांना दिसल्या आमच्या साहित्याचे व उपक्रमांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.पालकांच्या चेहऱ्यावरील भाव आमचे कर्तुत्व सिद्ध करणारा दिसत होतो .पालकांच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण होत आहे हे दिसून आले.तोचक्षण माझ्यासाठी प्रेरणादायी होता.जवळच HAL कंपनी आहे तेथील अधिकारी आपल्या परिक्षेत्रात भेटीसाठी आलेले होते त्यांना भेटलो शाळेविषयी व शाळेतील मुलांविषयी पालकांच्या आर्थिक परिस्थितीविषयी अधिकार्यांना क्ल्पना दिली. आमच्या शाळेसाठी काहीतरी मदत मिळावी या विषयी मागणी मांडली. शाळेतील दुरवस्था व आमची तळमळ पाहून HAL कंपनी कडून १० बेंचेस  पहिल्या वर्षी मिळाले.  शाळे शेजारी सामाजिक कार्यकर्ता मा.अनिल बोरस्ते यांचे घर आहे त्यांची भेट घेतली त्यांनी २०००रु चे विद्यार्थ्यांना ड्रेस दिले.तदनंतर आता थांबायचे नाही असे मनाशी पक्के ठरवले .पुढच्या वर्षी ६ मुले पहिलीला दाखल झाले.पुन्हा HAL कंपनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. पुन्हा HAL कंपनी कडून १० बेंचेस मिळवले .त्याच्या जोडीला सर्व कोकणगाव परीसारतीला ६ शाळाना मुलांना दप्तर वह्या बूट स्वाक्स मिळाले. शाळेत ज्ञानकुंभ प्रश्नमंजुषा सहशालेय उपक्रम राबवले. HAL कंपनी कडून घसरगुंडी सी-स्वा खेळण्याच्या साहित्यांची व संगणक संचाची मागणी केली. शालेय विद्यार्थी प्रगती पाहून HAL कंपनीने आमची मागणी मान्य करून १०००००/- रु. पर्यंतचे साहित्य शाळेला भेट म्हणून दिले. भारतीय स्टेट बँक ओझरमिग शाखेच्या मुख्य प्रबंधक मा.जाधव साहेबांची भेट घेतली.१ जुलै  बँकेच्या वर्धापनदिन निमित्त त्यांच्या कडून सन २०१२-१३ साली सर्व मुलांना प्रत्येकी ३-३ वह्या,पेन्सिलbox,शार्पनर,खोडरबरइ.साहित्य मिळवले.सन २०१३-१४ या वर्षी सर्व मुलांना प्रत्येकी एक गणवेश व स्वेटर मिळवले.LIC पिपळगाव शाखेकडून मुलांना मदत मिळवली बघता बघता माझ्या शाळेचे रूप बदलले. सन २०११-१२ साली "क" श्रेणीतील शाळा सन २०१४-१५ अखेर शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रमात " अ " श्रेणीत आली.
              आज माझ्या शाळेचा पट ३८ आहे. शाळेच्या प्रगतीसाठी मला HAL कंपनी कडून  भारतीय स्टेट बँक ओझरमिग शाखेकडून व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून भरभरून मदत मिळाली त्यांच्यामुळेच आज शाळेविषयी परिसरातील गावातील ग्रामस्थांना मी माझ्या शाळेकडे वळवू शकलो.

        सध्या शाळेत कार्यरत शिक्षक
    अ.नं.
    शिक्षकाचे नाव
    जन्मतारीख
    शैक्षणिकपात्रता
    सेवेत रुजू तारीख
    या शाळेत रुजू ता.
    कायमचा पत्ता
    श्री प्रकाश लोटन चव्हाण
    ०३.१०.७४
    एम.ए.डी.एड
    ०७.१२.९६
    ०१.०६.२०११
    प्लॉट नं.१७ गट नं.५५७ महालक्ष्मीनगर,बहिणाबाई बी.एड कॉलेजमागे   आडगाव शिवार नाशिक
    श्री. शांताराम रामभाऊ     कापसे
    ०१.०६.७७
    बी.ए. डी.एड.

    ०२.०६.९८
    १०.०७.२०१२
    मु.पो. जऊळके दिंडोरी
    ता.दिंडोरी जि .नाशिक

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा