-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, २३ जुलै, २०१५

    गणिताचे सूत्र.

    गणित : महत्त्वाची सूत्रे=>

    मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा नेपूर्ण भाग जाणारी संख्या,

    सम संख्या - ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

    विषम संख्या - ने भाग जाणारी संख्या,

    जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,

    संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.

     संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
    A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
    B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
    C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
    D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
    E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
    F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
    G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.

    एक अंकी एकूण संख्या आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.

    ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
    ) पासून पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
    ।।) हा अंक २१ वेळा येतो.
    ।।।) हा अंक ११ वेळा येतो.

    ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
    ) पासून पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
    ।।) दोन अंकी संख्यात ते या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.

     दोन अंकांमधून एकूण संख्या,तीन अंकांमधून एकूण संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

     विभाज्यतेच्या कसोटय़ा
    A) ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी , , , , यापैकीकोणताही अंक असल्यास.
    B) ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ने नि:शेषभाग जात असल्यास.
    C) ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
    D) ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर किंवा ५असल्यास.
    E) ची कसोटी-ज्या संख्येला या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ने निश्चित भाग जातो.
    F) ची कसोटी-संख्येतील शेवटच्या अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ने नि:शेष भाग जातो.
    G) ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी हा अंकअसतो जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ने भाग जातो.
    H) ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
    I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून अंकांची बेरीज समान असते किंवा फरक किंवा ११ च्या पटीत असतो.
    J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
    K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
    L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
    M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

     लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
    दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या

     मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
    दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने(विभाजकाने) भाग जातो ती संख्या

    प्रमाण भागिदारी
    A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर,
    B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर,
    C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.

    गाडीचा वेग-वेळ-अंतर
    A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/
    B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/
    C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×१८/
    D) गाडीची लांबी=ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारावेळ × /१८
    E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ + /१८
    F) गाडीचा ताशी वेग लागणारा वेळ काढताना १८/ ने गुणा अंतर काढताना /१८ ने गुणा
    G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷

    सरासरी
    A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X
    B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
    C) X संख्यामान दिल्यावर ठराविकसंख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
    D) X या क्रमश: संख्याची बेरीज =(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷

    सरळव्याज
    A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
    B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
    C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
    D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>

    नफा-तोटा
    A)नफा =विक्री- खरेदी,
    B)विक्री = खरेदी + नफा,
    C)खरेदी = विक्री+ तोटा,
    D)तोटा = खरेदी - विक्री
    E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी
    F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी
    G)विक्रीची किंमत = खरेदीची

    .किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१००

    H)खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा)

    मंगळवार, २१ जुलै, २०१५

    सातत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE जाणून घेऊ या.

       20 ऑगस्ट 2010 शासननिर्णयानुसार  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत आपण माहीती करून घेऊया . C.C.E.  नुसार आकारीक मुल्यमापन व संकलीत मुल्यमापन यातुन आपण विद्यार्थ्याचे मुल्यमापन करतो  . आकारीक मुल्यमापनात विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेचे मुल्यमापन तर संकलीत मुल्यमापनातुन विद्यार्थ्याचे संपादणुकिचे मुल्यमापन करतो . आकारीक मुल्यमापनात एकुण आठ साधनतंत्राचा वापर करतो .  इयत्ता३ री ,४ थी ,व ५  वी परिसर अभ्यास याविषयाचे  * परिसर अभ्यास भाग 1 साठी 60 टक्के भारांश *व *परिसर अभ्यास भाग 2 साठी 40 टक्के भारांश घ्यावा.*
    1. दैनंदीन निरीक्षण
    2. तोंडी काम
    3. कृती / उपक्रम
    4. प्रयोग /प्रात्यक्षिक
    5. प्रकल्प
    6. स्वाध्याय / वर्गकार्य
    7. चाचणी
    8. इतर साधने ( स्वंयमुल्यमापन व सहाध्यायी , पडताळा सुची , विद्यार्थी संचिका , पदनिश्चयन श्रेणी , मतावली , प्रासंगीक नोंदी , अभिरुची प्रश्नावली ) इत्यादी

              ही साधनतंत्रे  अध्ययन अध्यापन व मुल्यमापन यासाठी उपयुक्त आहेत .
    • दैनंदीन निरिक्षण : विद्यार्थी निरीक्षणातुन शिकतो . क्षेत्रभेटी , सहली , प्रयोगशाळा , याठिकाणी अनेक प्रकारची निरिक्षणे करत असतो . यातुन त्याचे अध्ययन होते . शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अध्ययनातील प्रगती , रुची , आवड , मुल्य, जीवनकौशल्ये , व्यकतीमत्व विकास , शिकण्याची गती, पध्दती , अध्ययनातील अडथळे , शारीरिक , भावनिक , बौध्दीक याचा मागोवा घेवुन अध्यापनात सुधारणा व विद्यार्थ्याला मार्गदर्शन यासाठी शिक्षकाने दैनंदीन निरिक्षण करावे . सत्रनिहाय विषयापुढे नोंदवहीमध्ये अत्यंत उल्लेखनिय नोंदी कराव्यात .
    • तोंडी काम : हे साधनतंत्र भाषण , संभाषण , मुलाखत गटचर्चा , प्रश्नोत्तरे , भुमिका मांडणी , आकृती , नकाशा , आलेख , चित्रवाचन यासाठी वापरता येते . गटात व वैयक्तिक स्वरुपात घेता येते . योग्य भारांष ठरवुन सत्रनिहाय विद्यार्थ्याचे तोंडी काम तपासावे.
    • कृती / उपक्रम : चित्रावर , स्वाध्यायावर , निरिक्षण यासाठी  विशिष्ट हेतु डोळ्यासमोर ठेवुन केलेले काम म्हणजे कृती आणि अनेक कृतीची गुंफन म्हणजे उपक्रम. चौकटीबाहेर जाऊन प्रत्येक्ष अनुभवातुन  स्वताच्या गतीने अनौपचारीक वातावरणात शिकता येते . शिक्षकानी सत्रात अनेक कृती आणि उपक्रम यांचा सराव घ्यावा . त्यातील एका कृतीची किंवा उपक्रमाची मुल्यमापनासाठी निवड करून त्यातील सहभाग सातत्य सफाईदार पणा  याचा विचार करून गुणदान करावे.
    • प्रयोग / प्रात्यक्षिक : कृतीतुन संकल्पना , नियम , गुणधर्म , निष्कर्ष यांचा पडताळा घेणे म्हणजे प्रयोग होय. यातुन कारक कौशल्याचा विकास होतो . कृतीतुन शिकता येते . घोकंपट्टी टळते . अमुर्त कल्पना स्पष्ट करण्यास मदत होते. प्रात्यक्षिकातुन सराव , दृढीकरण होते . सत्रात शिक्षकाने अनेक प्रयोग प्रात्यक्षिके घ्यावेत . एका प्रयोगाचे किंवा प्रात्यक्षिकाचे मुल्यमापनासाठी निवड करून कृतीतील क्रम सातत्य , अचुकता सफाईदारपणा निरिक्षणातील वेगळॆपण साधने हाताळण्याचे कौशल्ये या निकषावर गुणदान करावे .
    • प्रकल्प : प्रकल्पातुन प्राप्त ज्ञानाचे उपयोजन कृतीतुन अध्ययन , जीवनकौशल्याचा विकास आत्मविश्वास , स्वावलंबन , सहकार्य , सादरीकरण , निवेदन  या गुणाचा विकास होतो . प्रकल्पाचे प्रकार संग्रह , सर्वेक्षण , संशोधन , प्रतिकृती तयार करणे . कोणत्याही एका सत्रात विद्यार्थ्याने एक प्रकल्प पुर्ण करावा . प्रकल्पाचे नियोजन कार्यवाही माहीती संकलन , निष्कर्ष , सादरीकराण यानुसार गुण द्यावेत .
    • स्वाध्याय / वर्गकार्य : शाळेत व शाळॆबाहेर स्वंयअध्ययनातुन शिकण्याची प्रक्रिया सतत चालू रहावी , ज्ञानाचे दृढीकरण व उपयोजन यासाठी उपयुक्त . शिक्षकानी स्वताची प्रश्नपेढी तयार करुन नियोजनपुर्वक स्वाध्याय द्यावेत . आशयाची समज नाविन्य , मांडणी याचा विचार करून  गुणदान करावे.
    • चाचणी : पुस्तकासह व पुस्तकाशिवाय चाचणी घेता येते. यातुन लेखी प्रतिसाद , विचारप्रक्रिया , मध्यवर्ती कल्पना , आशयाची समज , उपयोजन , अभिव्यक्ति , आकलन पडाताळता येते . सराव , मुल्यमापन यासाठी उपयुक्त उता-यावरील प्रश्न , नकाशा , चित्रे , आलेख , यावरील प्रश्न काढून पुस्तकासह चाचणी घेता येते . यासाठी पुरेसे साहित्य नियोजन , विद्यार्थ्याना नीट सुचना दिल्या पाहिजेत .
    • इतर साधने ( स्वंयमुल्यमापन व सहाध्यायी , पडताळा सुची , विद्यार्थी संचिका , पदनिश्चयन श्रेणी , मतावली , प्रासंगीक नोंदी , अभिरुची प्रश्नावली ) इत्यादी यातुन विद्यार्थ्याचा छंद , कल , आवड , अभिरुची , जीवनकौशल्ये पडताळता येतात.

       
    संकलीत मुल्यमापन

        प्रत्येक सत्राच्या अखेरीस करावयाचे मुल्यमापन , संकलीत मुल्यमापन आणि आकारीक मुल्यमापन यातील प्राप्त गुण एकत्रीत करून विषयनिहाय श्रेणी द्यावी . संकलीत मुल्यमापनानंतर अतिरिक्त व पूरक मार्गदर्शनासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी  राखुन ठेवावा . संकलित मुल्यमापन तोंडी , प्रात्यक्षिक   व लेखी स्वरूपात घ्यावा . लेखी चाचणीसाठी संविधान तक्ता तयार करून ज्ञान , आकलन , उपयोजन , कौशल्य ही उद्दीष्टे मुक्त , बध्द प्रश्न ,  दीर्घोत्तरी , लघुत्तरी वस्तुनिष्ठ या प्रश्नप्रकारासह सृजनात्मक प्रश्न विचारांना चालना देणारे प्रश्न मुक्तोत्तरी प्रश्न  , मुल्य तपासणारे प्रश्न , कारण मिमांसा जाणणारे प्रश्न चाचणीत टाकावेत . सोपे, मध्यम, कठीण  याचेही प्रमाण राखावे . यासाठी शिक्षकाकडे स्वताची प्रश्नपेढी  असणे आवश्यक आहे . शिक्षकाने स्वता प्रश्नपत्रिका काढावी . 
    स्रोत :  सातत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण मार्गदर्शन पुस्तिका 

    शाळेने कात टाकली दैनिक महाराष्ट्र टाईम्स दि.२१.०७.२०१५