20 ऑगस्ट 2010 शासननिर्णयानुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत आपण माहीती करून घेऊया . C.C.E. नुसार आकारीक मुल्यमापन व संकलीत मुल्यमापन यातुन आपण विद्यार्थ्याचे मुल्यमापन करतो . आकारीक मुल्यमापनात विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेचे मुल्यमापन तर संकलीत मुल्यमापनातुन विद्यार्थ्याचे संपादणुकिचे मुल्यमापन करतो . आकारीक मुल्यमापनात एकुण आठ साधनतंत्राचा वापर करतो . इयत्ता३ री ,४ थी ,व ५ वी परिसर अभ्यास याविषयाचे * परिसर अभ्यास भाग 1 साठी 60 टक्के भारांश *व *परिसर अभ्यास भाग 2 साठी 40 टक्के भारांश घ्यावा.*
- दैनंदीन निरीक्षण
- तोंडी काम
- कृती / उपक्रम
- प्रयोग /प्रात्यक्षिक
- प्रकल्प
- स्वाध्याय / वर्गकार्य
- चाचणी
- इतर साधने ( स्वंयमुल्यमापन व सहाध्यायी , पडताळा सुची , विद्यार्थी संचिका , पदनिश्चयन श्रेणी , मतावली , प्रासंगीक नोंदी , अभिरुची प्रश्नावली ) इत्यादी
ही साधनतंत्रे अध्ययन अध्यापन व मुल्यमापन यासाठी उपयुक्त आहेत .
संकलीत मुल्यमापन
प्रत्येक सत्राच्या अखेरीस करावयाचे मुल्यमापन , संकलीत मुल्यमापन आणि आकारीक मुल्यमापन यातील प्राप्त गुण एकत्रीत करून विषयनिहाय श्रेणी द्यावी . संकलीत मुल्यमापनानंतर अतिरिक्त व पूरक मार्गदर्शनासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी राखुन ठेवावा . संकलित मुल्यमापन तोंडी , प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपात घ्यावा . लेखी चाचणीसाठी संविधान तक्ता तयार करून ज्ञान , आकलन , उपयोजन , कौशल्य ही उद्दीष्टे मुक्त , बध्द प्रश्न , दीर्घोत्तरी , लघुत्तरी वस्तुनिष्ठ या प्रश्नप्रकारासह सृजनात्मक प्रश्न विचारांना चालना देणारे प्रश्न मुक्तोत्तरी प्रश्न , मुल्य तपासणारे प्रश्न , कारण मिमांसा जाणणारे प्रश्न चाचणीत टाकावेत . सोपे, मध्यम, कठीण याचेही प्रमाण राखावे . यासाठी शिक्षकाकडे स्वताची प्रश्नपेढी असणे आवश्यक आहे . शिक्षकाने स्वता प्रश्नपत्रिका काढावी .
स्रोत :
