क्रोधाचा म्हणजेच (रागाचा) स्वत:चा एक पूर्ण परिवार आहे. रागाची एक लाडकी बहिन आहे हट्ट, ही सदैव रागा बरोबर असते. रागाची पत्नी आहे हिंसा, हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते. रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे अहंकार, रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव भय (भिती), आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत निंदा व चुगली, एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते. वैर हा रागाचा मुलगा आहे. इर्षा ही या परिवाराची सुन आहे. या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव घृणा, ही नेहमी नाका जवळच असते, नाक मुरडने एवढेच हिचे काम. उपेक्षा ही रागाची आई आहे. त्या मुळे सर्वांना नम्र विनंती आहे या परिवारा पासून दूर रहा सुख, सम्पत्ती, समाधान, तुमच्या घरी सर्व मांगल्य राहील.
हसत रहा , हसत जगा !
हसत रहा , हसत जगा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा