का हिणावती मला अबालवृद्ध
?
अपार कष्ट सहन
करत
तुझ्या मायावी
जगात मी आले |
श्वास घेण्या
पुर्वीच मात्र
प्राण इंक्युबीटर
मध्ये अडकले ||१||
भ्रूण रुपा
पासून होतोय
माझ्या वर
अन्याय |
भ्रुण रूपातच गोठून प्राण
आई बापच शोधती
पर्याय ||२||
जन्माला
आल्याबरोबर
वाडवडील कुलक्षण
वदती |
मुलाचा अट्टाहास
पायी
जन्मल्याबरोबर
जिवंत पुरती ||३||
आईवडील जरी लक्ष्मी
म्हणून मला
स्विकारती |
वयात
येण्याअगोदच दृष्टांच्या
नजरा माझ्या वर
खिळती. ||४||
वयाबरोबरच जन्म
दात्याची
वाढत जाते चिंता
|
राक्षस
नराधमांच्या वागण्याने
आयुष्याचा होतोय
गुंता ||५||
शाळा घर
आप्तेष्टांमध्येही
वाटत नाही
सुरक्षितता |
जन्माला घालून
विधात्या मला तू
जन्म
दात्याची नष्ट केलीस रे शांतता ||६||
प्रत्येक
क्षेत्रात मी माझ्या
कर्तृत्वाने
स्वतः ला केले सिद्ध |
मुलगी म्हणून
अजूनही का
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा