लक्ष लक्ष दिव्यांचा
तेजोमय प्रकाशात
स्वागत करूयात
दिपावलीचे
करूनी एक संघ मानव जात
जपूयात एकमेकांच्या भावना
साक्षीदार होऊयात या नवनिर्मितीचे.
दुरावा हा सरावा धनवान अन दारिद्रयाचा
एक विचार निर्माण व्हावा
नवसंकल्पनांचा
गुणवान हाच खरा धनवान
पैशांचा माज सरावा
नांदोत एक अंगणात
संपवून मनाचा दुरावा
गरीबांचे अश्रू पुसावेत.
भूकेल्यांना द्यावे अन्न्
वाटसरूला द्यावे जल
करावे सर्वांनाप्रसन्न
काळ्या आईच्या सेवा करत जगाचा पोशिंद्या राब राब राबतोय
राखू त्याचा खरा मान
जो आपण जगावं म्हणून स्वतः रोज मरतोय.
जगवूयात या जिवंत विधात्याला
देऊन कष्टाचे फळ
सन्मान करूनी त्याच्या त्यागाचा
देऊ जीवन जगण्याचे बळ
मंदीराच्या दान पेटीत गुप्त धन देऊन
समाधानी न होता
गरजवंताला पाण्याच्या थेंब व अन्नाच्या कणदेऊनी टिकवू आपली मानवता.
मंदिराच्या तिजोरीवर असतो
संस्थान मंडळाचा डोळा
देवाच्या नावाने लुटारूंची
फौज होत असते गोळा
दिन दुबळ्यांना लूटून
या धनधांडग्याना आपण पोसतो
आसुसलेले कोवळी मने
त्यांच्या भावनाही पायदळी तुडवतो
संपवून सारे भेद
स्मरण ठेवू शिकवण शिवबाची
वेश-भाषा गरीब-श्रीमंत जातभेदाला तिलांजली देत गाणी गाऊ एकात्मतेची
आज नरक चतुर्थीचा
करा मनात संकल्प
भेदभावाचे दुरावे नष्ट करूनी
होऊया समृद्ध नी प्रगल्भ.
✍✍✍✍✍✍
*प्रकाश चव्हाण नाशिक*
🌅🌅🌅🌅🌅
🎇🎇 *दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*🎇🎇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा