-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

    मराठी वाचन खजिना



    याhttp://www.esahity.com

     वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. फ़्री आणि ईझी. बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. 

    उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.


    मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.P

    दिव्यांगाचे (अपंगांचे) विविध प्रकार

    *UDISE + 2022-23*

    *दिव्यांगाच्या 21 प्रकारांची माहिती  व त्यांचे UDISE + Udise मध्ये दिव्यांगाचे नोंदणी करण्याचे कोड खालीलप्रमाणे*
    ♿🧬💉👂🏻👀🗣🧠👅🦵🏻🕶♿


    *(१) पूर्णतः अंध - (Blindness)* Code - 1
    • दृष्टिचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टिहीन असणे,
    • डोळे जन्मतः बंद असणे.
    • हालचाल करताना अडचणी येतात.

    *(२) अंशतः अंध - (Low Vision)* Code - 2
    • सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे.
    • दूरचे/जवळचे कमी दिसणे.
    • पुस्तकातील मजकूर पाहताना, वाचताना लिहिताना, अडचणी येतात.
    • उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे.

    *(३) कर्णबधिर - (Hearing Imapairment)* Code - 3
    • कोणताही आवाज ऐकू न येणे,
    • कमी ऐकू येणे,

    *(४) वाचा दोष - (Speech and Language Disability)* Code - 4
    • अडखळत बोलणे, स्पष्ट न बोलणे, शब्दांची तोडफोड करणे.
    बोलताना शब्द मागे पुढे करणे, त्यात तारतम्य नसणे यालाच 'वाचा दोष' असे म्हणतात.
    • जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे, तोतरे बोलणे.
    टाळूला छिद्र असणे.
    • clept palete.

    *(५) अस्थिव्यंग -(Locomotor Disability)* Code - 5
    • ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले' असे
    म्हणतात.
    हालचाल करण्यास अक्षम.
    सहज दिसणारे अपगत्व,

    *(६) मानसिक आजार - (Mental Illness)* Code - 6
    • असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन,
    • खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे.
    भयानक स्वप्न पडणे.
    भ्रम आभास असतो.
    • कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.

    *(७) अध्ययन अक्षमता -(Learning Disability)* Code - 7
    • वाचन, लेखन, गणितीय  अडचण .
    आकलन करण्यास अवघड जाते.
    | अंक ओळखण्यात गोंधळ, अक्षर उलटे लिहणे, शब्द गाळून वाचणे.
    काही मुलांमध्ये वर्तन समस्या असतात.
    • कमी संभाषण दिसून येते.
    • बुध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो.
    • विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात.

    *(८) मेंदूचा पक्षाघात - (Cerebral Palsy)*  Code - 8
    • हालचालींवर नियंत्रण नसते.
    • अवयवांमध्ये ताठरता असते.
    मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही.
    • हालचालीची क्षमता कमी असते.

    *(९) स्वमग्न - (Autism)* Code - 9
    स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.
    भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.
    बदल न आवडणे, त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.
    खेळणी, वस्तू यांसोबत अधिक रमतात.

    *(१०) बहुविकलांग - (Multiple Disability)* Code - 10
    • एक किंवा जास्त अपंगत्व असते.
    • अशा ब-याच मुलांना चालताना, बोलताना, उभे राहताना, शि- श असे दैनंदिन कार्य करताना
    समस्या असतात. (ADL)

    *(११) कुष्ठरोग - (Leprosy Cured Persons)* Code - 11
    • हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे.
    • त्वचेवर चट्टे, काळे डाग असतात.
    • हात, पाय, बोटे सुन्न पडतात.

    *(१२) बुटकेपणा - (Dwarfism)* Code - 12
    • सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असते.

    *(१३) बौधिक अक्षमता - (Intellectual Disability)* Code - 13
    • बौद्धिक क्षमता(IQ) ७० पेक्षा कमी असते.
    • दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार करण्यास कठीण जाते.
    • तार्किक प्रश्न सोडवताना अडचणी येतात.
    • नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी येतात.
    • काही मुलांना वर्तन समस्या असतात.

    *(१४) मांसपेशीय क्षरण - (Mascular dystrophy)* Code - 14
    • गटागटाने मांसपेशी कमकुवत  .
    • उभे होताना हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.
    ० मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .

    *(१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार - (Chronic Neurological Conditions)* Code - 15
    • मेंदूमध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.

    *(१६) मल्टिपल स्क्ले रोसिस - (Multiple sclerosis)* Code - 16
    . हातापायातील स्नायूमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.
    • स्नायूमध्ये शिथिलता येते व स्नायू काम करणे कमी करतात.
    • मलमूत्र क्रियांवरील नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते.

    *(१७) थॅलॅसेमिया - (Thalassemia)* Code - 17
    • रक्ताची कमतरता
    वारंवार रक्त पुरवावे लागते.
    • चेहरा सुकलेला असतो.
    • वजन वाढत नाही.
    • श्वास घेण्यात त्रास होतो.
    • वारंवार आजारी पडतात.

    *(१८) अधिक रक्तस्राव - (Hemophilia)* Code - 18
    ० हा आनुवांशिक रक्तविकार आहे.
    • रक्त वाहिन्यांतील बिघाडामुळे हा रोग होतो.
    • यामध्ये रक्तस्राव होतो.
    • जखमा झाल्यास अधिक रक्तस्राव होतो .
    • कधी कधी रक्तस्राव थांबत नाही.
    • रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.

    *(१९) सिकल सेल - (Sickle Cell Disease)* Code - 19
    • रक्ताचे प्रमाण कमी असणे.
    रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात.
    • शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो.
    • हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो.

    *(२०) अॅसिड अॅटॅक - (Acid Attack Victim)* Code - 20
    • अॅसिड अॅटॅकमुळे चेहरा, हात, डोळे यांवर परिणाम होतो.
    • त्वचा भाजल्यासारखी दिसते.
    • चेहरा विद्रुप होतो.

    *(२१) कंपवात रोग - (Parkinson's Disease)* Code - 21
    • डोपामिन रेणूच्या अभावामुळे रोग्याला कंप सुटतो.
    • हालचाली संथ होतात, स्नायू ताठर होतात .
    • वजन कमी होत जाते.
    • ५० ते ६० वयाच्या दरम्यान होतो.

    ♿🧬💉👂🏻👀🗣🧠👅🦵🏻🕶♿

    संकलन
    प्रकाश चव्हाण

    गुरुवार, ९ जून, २०२२

    वार्षिक नियोजन तक्ता इयत्ता – १ ली एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकानुसार

    चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली साठी एकात्मिक द्विभाषिक पुस्तके पाठ्यपुस्तके    १ ते ४ भागात तयार करण्यात आलेली आहेत मात्र सर्व विषय एकत्रित केल्याने वार्षिक व घटक नियोजन करण्यात अनेकांना अडचणी येत होत्या चा रही भागातील समाविष्ट घटकांचा आढावा घेऊन विषय निहाय  मासिक घटन नियोजन तक्ते तयार केले असून याद्वारे वार्षिक  मासिक व दैनिक नियोजन करणे आपणास सहज शक्य होणार आहे. 

    वार्षिक नियोजन तक्ता इयत्ता  – १ ली   एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकानुसार  मराठी माध्यम 

    डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा   


    वार्षिक नियोजन तक्ता इयत्ता  – १ ली   एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकानुसार  इंग्रजी माध्यम 

    डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा   









    बुधवार, १२ जानेवारी, २०२२

    कोविड-19 पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन अभ्यासिका १ ते ४

     कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत मुल जेमतेम शाळेत रमत असतांना अचानक आलेल्या या निर्णयामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणत होणार आहे 

    शासनाने ज्या ठिकाणी कोरोना पेशंट नाहीत तेथे शाळा सुरु  देणे अपेक्षित होते पण सरसकट निर्णयामुळे पालक विद्यार्थी व शिक्षक संभ्रम आहेत.
    मुलांना आपल्या पालकांच्या व मित्रांचा सहकार्याने अभ्यास करता यावा या दृष्टीकोनातून मी १ ते ४ वर्गाच्या मराठी व सेमी माध्यमाच्या अभ्यासिका सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहे आपण त्या डाऊनलोड करून मुलांना वाटू शकतात 
    माझ्या वर्गातील मुलांना १० जानेवारी रोजी अभ्यासिका वाटप करतांना 
    <marquee> 

     
    </marquee>


    इयत्ता १ ली.सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा  
    इयत्ता १ ली.मराठी  माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
    इयत्ता -२ री .सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा  
      
    इयत्ता -२ री .मराठी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा  
      

    इयत्ता -३ री .सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
    इयत्ता -३ री .मराठी  माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा    
      
    इयत्ता -४ थी .सेमी माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा 
     
    इयत्ता -४ थी .मराठी  माध्यमाची स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
    अध्ययन गती कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन अभ्यासिका डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
      

    गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

    Gmail मधून नको असलेले Mail आपोआप असे करा डिलीट,

     

    Gmail मधून नको असलेले Mail आपोआप असे करा डिलीट, पाहा प्रोसेस

    Gmail वर सतत अनेक नको असलेलेही मेल येत असतात. Inbox मध्ये सतत येणाऱ्या या मेल्सचा कंटाळा आला असल्यास आता चिंता करण्याची गरज नाही. आपल्या पर्सनल ईमेल अकाउंटवर दररोज येणाऱ्या प्रमोशनल ईमेलचा कोणताही फायदा नसतो. हे Email वेळेत डिलीट केले नाहीत, तर काही दिवसांत हा नको असलेल्या ईमेलचा आकडा हजारांवर जातो. त्यामुळे इनबॉक्स भरतो आणि इतके मेल डिलीट करणं कठीण जातं. पण एका ट्रिकद्वारे इनबॉक्समध्ये असलेले नको असलेले ईमेल डिलीट करता येतील.

    सर्वात आधी ईमेल स्टूडिओ प्रोद्वारे आपल्या जीमेल अकाउंटमध्ये ईमेल स्टूडिओ इन्स्टॉल करावं लागेल.

    आता Gmail Inbox मध्ये कोणताही मेसेज ओपन करा.

    त्यानंतर उजव्या बाजूला ईमेल स्टूडिओ आयकॉनवर क्लिक करा. Gmail आयडी, पासवर्डने लॉगइन करा.

    लॉगइन केल्यानंतर लिस्टमध्ये असलेल्या ईमेल क्लीनअप ऑप्शनवर क्लिक करा.

    जे काम जीमेलद्वारे करू इच्छिता, त्यासाठी Add new वर क्लिक करा. इथे एक विशेष ईमेल आयडी नवा नियम म्हणून चिन्हांकित करू शकता.

    या प्रक्रियेत तुम्ही जीमेलला एका महिन्याच्या किंवा आठवड्याच्या आत विशिष्ट ईमेल आयडीवरुन प्राप्त झालेले सर्व ईमेल कायमचे हटवण्याचे आदेश देऊ शकता.

    त्यानंतर Save वर क्लिक करा. आता बॅकग्राउंडमध्ये ईमेल स्टूडिओ लाँच होईल आणि तुम्ही सेट केलेले नियम लागू करुन Gmail तुमच्या आयडीवरील मेल आपोआप हटवेल.

    Published by:Karishma
    First published:January 03, 2022, 12:54 IST