-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

    अध्ययन स्तराचा २ रा टप्पाअध्ययन टप्यावर आधारित विद्यार्थी निहाय कृती आराखडा


    अध्ययन स्तराचा २ रा टप्पा आपण आताच पूर्ण केला त्यानुसार अध्ययन टप्यावर आधारित विद्यार्थी निहाय कृती आराखडा आपणास देण्याचा प्रयत्न हे माझ्या वैयक्तिक नियोजनावर आधारित आराखडे आहेत आपण आपल्या शाळेतील वातावरण विद्यार्थ्यांची बौद्धिक कुशलता उपक्रम शीलता विचारात घेऊन आपण आपल्या स्तरावर नियोजन करू शकता.
    प्रत्येक इयत्तेचे ३ नमुने आराखडे तयार करण्यात आले आहेत.




    रविवार, २७ मे, २०१८

    डिजिटल तंत्रज्ञानात एक पाऊल पुढे

    डिजिटल तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर
    विषय भाषा व गणित साठी १००% अध्ययन स्तर गाठण्यासाठी परिपूर्ण अभ्यास सरावसाठी मुलांच्या वयोगटाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेले app आपणास देतांना अत्यानंद होत आहे.






    अ.नं.
    विषय
    app चे नाव
    play stoar डाऊनलोड लिंक
    1
    मराठी
    Digital Marathi Slate
    2
    गणित
    मराठी माध्यम
    Digital Fun Math part 1


    3
    Digital Fun Math part  -2



    4
    गणित
    मराठी माध्यम
    Digital Fun Math semi English part 1


    5
    Digital Fun Math semi English part 2





    शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

    चंद्र आहे हा साक्षीला

    *चंद्र आहे हा साक्षीला*

    हर्ष उल्हास प्रेमाचा
    सण आला आनंदाचा ।
    नभात आज खुलला
    पूर्ण चंद्र पुनवेचा ।।1।।

    मंद झुळूकाचा वात
    चेतना भरी रोमात ।
    आज  ही प्रीतीची रात
    रंग बदली क्षणात ।।2।।

    चांदण्या रातीत खुले
    कांती तुझी ही तेजाची ।
    मोह आवरता होई
    चलबिचल या मनाची ।।3।।

     बहरले मन तुझे
     अंत नसावे प्रेमाला ।
    प्रीतीचा क्षण फुलण्या
    चंद्र आहे हा साक्षीला ।।4।।

    *प्रकाश चव्हाण*
    *बोरस्तेवस्ती नाशिक*

    शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

    करूया सुरवात नवयुगाची

    करूया सुरवात नवयुगाची

    पृथ्वीच्या गाभ्यातून उजळली
    पहाट सुंदर सोनेरी |
    शुभंकरोती  म्हणून करूया
    स्वागत पुष्प उधळत सत्वरी || १ ||
    आनंदाचा दिन हा उगवला
    हर्ष उल्हास वाढवाया |
    मनामनातील नाती घटट करण्या
    शुभ संदेश आपण देऊया || २ ||
    आपट्याचे पानेही आज
    सोन्याचे रूपे घेती |
    आबालवृद्ध एकत्र येऊन
    सुखाची देवाणघेवाण करती|| ३ ||
    मनामनातील दुरावे विसरून
    सोडा मौन अबोलाची
    देऊन प्रेरणा एकमेकांना
    करूया सुरवात नवयुगाची || ४ ||

     


    सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

    का हिणावती मला अबालवृद्ध ?

    का हिणावती मला अबालवृद्ध ?

    अपार कष्ट सहन करत 
    तुझ्या मायावी जगात मी आले |
    श्वास घेण्या पुर्वीच मात्र
    प्राण इंक्युबीटर मध्ये अडकले ||१||

    भ्रूण रुपा पासून होतोय
    माझ्या वर अन्याय |
    भ्रुण रूपातच  गोठून प्राण 
    आई बापच शोधती पर्याय ||२||

    जन्माला आल्याबरोबर
    वाडवडील कुलक्षण वदती |
    मुलाचा अट्टाहास पायी
    जन्मल्याबरोबर जिवंत पुरती ||३||

     आईवडील जरी  लक्ष्मी
    म्हणून मला स्विकारती |
    वयात येण्याअगोदच दृष्टांच्या
    नजरा माझ्या वर खिळती. ||४||

    वयाबरोबरच जन्म दात्याची
    वाढत जाते चिंता |
    राक्षस नराधमांच्या वागण्याने
    आयुष्याचा होतोय गुंता ||५||

    शाळा घर आप्तेष्टांमध्येही 
    वाटत नाही सुरक्षितता |
    जन्माला घालून विधात्या मला तू
     जन्म दात्याची नष्ट केलीस रे शांतता ||६||

    प्रत्येक क्षेत्रात मी माझ्या 
    कर्तृत्वाने स्वतः ला केले सिद्ध |
    मुलगी म्हणून अजूनही का
    हिणवती मला अबालव्रुद्ध ||७||