-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

    󾍛ज्ञानरचनावादी उपक्रम 󾍛



    󾍛ज्ञानरचनावादी उपक्रम 󾍛
    उपक्रम :  " अनुभवातुन शिकुया -नाणी नोटा"

    कृती :
    󾮜 प्रथम 50 पैसे ते 1000 किमतीचे नाणी नोटा प्रतिमा व माउट  बोर्ड वर प्रतिमेचे कटआउट तयार करणे.
    󾮜वर्ग रचना दुकानासारखी करणे ..
    󾮜 पेन, पेन्सिल, खोडरबर, खेळाचे साहित्य, चाॅकलेट, वह्या, पुस्तके,इ. वस्तू विक्रीला ठेवणे.
    󾮜 प्रत्येक वस्तुला विशिष्ट किंमती देणे.
    󾮜एका विद्यार्थीला दुकानदार पद देणे.
    󾮜 अन्य विद्यार्थीकडे नाणी नोटा प्रतिमा देणे.
    󾮜 एक-एक विद्यार्थीला वस्तू खरेदी करायला लावणे.
    󾮜 वस्तू विकत घेतांना मुद्दाम 100,500,1000 ची नोट द्यायला लावणे .
    󾮜 दुकानदार विद्यार्थी वस्तू देईल व योग्य रक्कम परत करेल
    󾮜 अचूकपणे सुटे परत केल्यावर
    सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
    󾮜चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
    󾮜 पुन्हा चुकल्यास दुकानदार होण्याची संधी तो विद्यार्थी त्या दिवसापुरती गमावले.
    󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾮚󾮚
    उपक्रमांची यशास्विता.....
    󾮜  नाणी नोटाची अचूक  किंमत सांगता येईल.
    󾮜 विद्यार्थी स्वतः विविध किमतीच्या वस्तु खरेदी करेल व किमतीच्या तुलना करेल.
    󾮜 कमी अधिक किमतीच्या नोटा तुलना करून  सांगेल .
    󾮜 नाणी नोटा घटकाच्या ज्ञानचे अनुभवातुन दृढी:करण होईल .
    󾮜 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
    󾮜 मोठ्या किमतीच्या नोटाचे अचुक सुटे करता येतील.
    󾮜 नाणी नोटाचे मनातल्या मनात बेरीज वजाबाकी करण्याची सवय विद्यार्थीना लागेल.
    󾮜 खरेदी विक्री संबोध अनुभवातुन कायम होतील.
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    श्री प्रकाश चव्हाण
    बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    उपक्रमाचा फोटो
    󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚





    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा