🙏
ज्ञानरचनावादी उपक्रम
माझी शाळा माझे उपक्रम भाग- 5
उपक्रम : " जादूई पेटारा ज्ञान कुंभ"
कृती :
प्रथम रिकामा खडूचा बाॅक्स घेणे.
त्याला रंगीत गिप्ट पेपरचे आवरण चिटकून आकर्षक करणे..
त्यात विविध नकला, प्राणी पक्षीचे आवाज , वस्तू दाखवा, वस्तू आणा, गाणी , गोष्टी , कविता , पाठ्यपुस्तकातील चित्र वर्णन, प्रश्न, अनुभव कथन इ. चिठ्ठ्या तयार करून टाकणे.
एक एक विद्यार्थीला पुढे बोलवून बाॅक्स मधून चिठ्ठी काढायला सांगणे
चिठ्ठी सर्वांना दाखवून त्यातील मजकूर वाचायला सांगणे.
मजकूरात लिहिल्याप्रमाणे कृती करायला लावणे.
ज्या विद्यार्थीला कृती करता आली नाही तो विद्यार्थी त्या दिवसापुरता खेळातून बाद होईल याची कल्पना विद्यार्थीना देणे.
प्रत्येक विद्यार्थी ला संधी मिळावी याकडे लक्ष ठेवणे .
हा उपक्रम दररोज 4.30 नंतर घेतल्यास
दिवसभराच्या अभ्यासक्रमातील उपक्रमाच्या क्षिणातून मुक्त होऊन विद्यार्थी प्रसन्न मनाने घरी जातो.
उपक्रमांची यशास्विता.....
विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
विद्यार्थी आवड जोपासायला मदत होते .
विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील कला समजतो.
मनोरंजनातुन ज्ञानाची निर्मिती सहज शक्य होते .
विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
दिवसभराच्या अभ्यासाचा क्षीण घालवता येतो..
अभिनय,संवाद, वाचन,आकलन,कृती युक्त सादरीकरण,समय सुचकता इ.गुणांची खेळातून पडताळणी करता येते .
प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले अनुभव चिरकाल स्मरणात राहतात .
श्री प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
उपक्रमाचा फोटो
Add caption |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा