-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

    आठवण

    आठवण

    शांत  बसुनी विचार करतो
    कोण आहे आपल्या संगती ?
    भूतकाळात मन गुंतविता
    आठवणीच आपल्यास खरे सांगती || ||

    इतरांच्या चुका शोधता शोधता
    आपल्याच स्वभावाचे दोष  समजती
    नियतीचा हा सारा  खेळ उभा करती
    आठवणीच आपणास खरे सांगती ||||

    मनात  विविध आशा कल्पना जागती
    कधी विजय कधी पराभव होती
    जिंकणे हरण्याच्या  हिशोब मांडती
    आठवणीच आपल्याला खरे सागती || ||

    पराभवाच्या अनुभवातून
    जिंकण्याची नव उर्मी देती
    आयुष्याचे पूर्ण सार  कथन करती
    आठवणीच आपणास खरे सांगती || ||

    जगाच्या  प्रगतीच्या  वाटेवर
    नंबर पहिला माझा हे सदा वदती
    नेहमीच पुढे सर्सावण्याचा धडपडी
    आठवणीच आपल्याला खरे सांगती|| ||

    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि...शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि. नाशिक
    9960125981

    chavanprakash001.blogspot.com


    शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

    येरे बाप्पा आमच्या घरी मुषकावर होऊन स्वारी

    येरे बाप्पा आमच्या घरी मुषकावर होऊन स्वारी

    अबाल वृद्धांना नवचेतना
    देणारा सण आनंदाचा आला |
    गुलाल उधळत वाजत गाजत
    गणराज घराघरात विसावला ||१||
    बुद्धीचा देवता तो देई
    सर्वा सुख आणि समृद्धी |
    चिंतन करी जो मानवा होई
    ज्ञान आत्मविश्वासात वृद्धी ||२||
    विघ्नहर्ता तू सुखाचा दाता
    नष्ट करी सर्व चिंता |
    स्मरण करता त्वरित सोडावी
    आयुष्याच्या तू  गुंता ||३||
    देवाचा तू  ईशागण
    प्रथम मान तुझ्या  पूजेला |
    माता पिता सर्व श्रेष्ठ देवता
    शिकवण देई तू या जगाला ||४||
    आगमनाने तुझ्या  सर्वांच्या
    आनंदाला येई भरती |
    भक्ती भावाने भाविक जास्वंद,दुर्वा
    तुझ्या माथ्यावर वाहती ||५||
    निसर्गही स्वागत करण्या बाप्पाच्या
    असतो नेहमी नेहमी तत्पर |
    विविध रंगी पुष्प फुलावी
    झाडाझाडांवर सत्वर ||६||
    बालगोपालांचा तू  सखा
    तरुणांचा तू नायक |
    अबलांचा तू सदैव रक्षक
    वृद्धांचा वरद विनायक ||७||
    स्वागत करण्या तुझ्या भार्या करी
    गोड धोड मोदक भारी |
    येरे बाप्पा आमच्या घरी
    मुषकावर होऊन स्वारी ||८||
    गणराज तू विश्वंबर
    उत्साह आनंदाचा तू साधक |
    शुभंकर,कपील, चिंतामणी तुला  
    देतो नैवेद्याला मी मोदक ||९||



    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि.प.शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि. नाशिक
    ९९६०१२५९८१
    माझा छंद माझ्या कविता वाचा

    chavanprakash001blogspot.com 


    सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

    छंद

    प्रत्येकालाच असावा
    एक छंद
    ज्यातून मिळतो
    स्वनिर्मितीचा आनंद ||१||

    आपल्या कलागुणांना
    मिळतो वाव
    समाजात निर्माण
    होतो आपला भाव ||२||
    आपल्या विचारांना
    मिळते एक दिशा
    इतरांनी चांगले म्हणावे
    याची नसते भाबड आशा ||३||
    आपल्या व्यक्तिमत्वाचा
    उलगळतो पैलू एक एक
    समविचारी मित्र
    मिळत जातात अनेक ||४||
    वेळेचे भान छंद
    जोपासतांना उरतच नाही
    स्वत:साठीच वेळ दिल्याने
    मानव समाधानी राही ||५||
     नवनिर्मितीचा ध्यास
    असतो व्यक्तिला
    प्रेरणा मिळते आपल्या
    नवविचाराला ||६||
    निर्माण होते
    एक एक संधी
    मानव राहतो
    व्यस्त आणि आनंदी  ||७||
    विना छंद
    भरकटते जीवन
    सतत चिडचिड
     करते मन  ||८||
    छंदामुळे उलगडतात
    आपल्या मनातील भाव
    एक तरी छंद
    तुम्हाला असुद्या राव  ||९||

    x

    बैलपोळा

    माझी कैफियत 
    शेतात वर्षभर राबवून तू
    साजरा करतोस पोळा सण
    सततच्या शिव्याशापातून
    एक दिवस देतो मान ।।१।।
    शेताच्या बांधावरचे गवत
    कोरडे कडबा आमचे खाद्य
    आज मात्र आमच्या साठी
    घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य।।२।।
    सालभर चिखलात हाकलून
    आज आंघोळ माझी करतो
    चाकुब आरीने सुजवलेले अंग
    आज रंगीत झालराने झाकतो ।।३।।
    वाजत गाजत चौकाचौकातून
    मिरवणूक आज काढतोस
    माझ्यावरील दररोजच्या
    अमानुष छळाला तू विसरतोस ||४|
    शेतीच्या शोधापासून मी
    आहे तुमच्या सोबती
    यंत्राच्या जमान्यात मात्र
    माझी गरज नाही का कोणती?।।५।।
    निसर्गाच्या लहरीपणाचा
    बळी पडतो तू माझा धनी
    कुटुंबा सोबत आमचेही
    विसरून प्रेम अंतरमनी ।।६।।
    जगाचा पोशिंदा तुझ्याकडून
    आज मागतो  एक वचन
    निसर्ग कोपला, शासन झोपले तरी
    नाही संपवणार तू जीवन ।।७।।
    सावकार बँकेच्या कर्जाच्या पाशातून
    मुक्त हो तू हेच माझे मागणे
    सण एकदिवसाचा असला तरी 
    साजरा करुया आनंदाने ।।८।।
    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि.प.शाळा-बोरस्तेवस्ती,
                         ता.निफाड जि.नाशिक 

    रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

    *"HAPPY COUPLES DAY SPECIAL"*.

    *"HAPPY COUPLES DAY SPECIAL"*
    💝💝💝💝💝💝💝
    *"तुझ्या प्रितीसाठी ग सखे ठेवेन चंद्र सूर्य तारे सोबतीला "*

    🌃🌅🌠🎠🎠🎠🎠

    *वास्तवाच्या जगात जगूया जीवन*
    *हीच ठेवते तू अपेक्षा*
    *वचन तुला ग सखे  माझे*
    *कधीच होणार नाही उपेक्षा ||१||*

    *आई बापाच्या लाडात*
     *प्रेमात तू वाढलीस*
    *भूतकाळ तूझा विसरून तू**
    *संसारात माझ्या रमलीस ||२||*

    *कुटुंबातील सर्वांना देते तू*
    *नेहमी बळ आणि प्रेरणा*
    *नाही  केलीस कधी तक्रार तू*
    *ना बघीतला कंटाळा  मी जीवना ||३||*

    *तु सोबत असल्यावर*
    *मी मलाच विसरतो*
    *तू नेहमी प्रसन्नतेनं सोबत रहा*
    *सखे आज वचन मी मागतो||४||*

    *मनातल्या इच्छा आकांक्षा*
    *आज सांग ना तु मला*
    *तुझ्या प्रितीसाठी ग सखे*
     *ठेवेन चंद्र सूर्य तारे सोबतीला||५||*

    *श्री. प्रकाश लोटन चव्हाण*
    *प्राथमिक शिक्षक*
    *जि.प.शाळा बोरस्तेवस्ती*
    *ता.निफाड जि.नाशिक*
    9960125981
    👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧

    शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

    गुरुजी आम्ही नवयुगातले भारी...

    आज सगळीकडे डिजिटल क्रांतीचा बोलबाला सुरु आहे.
    प्रत्येकाच्या हाती डिजिटल गॅजेट आले असून अशिक्षित माणसेही त्याचा वापर लीलायाने करतांना दिसत आहेत. बदणा-या युगाबरोबर शिक्षण पद्धतीही बदलत आहे.
    नवयुगाची उत्क्रांती ग्रामीण भागातील शाळा शाळांमधून घडत आहे.
    ग्रामीण भागातील प्रत्येक गुरुजी आपले १००% योगदान शाळेला देण्यासाठी धडपडत आहे.
    शिक्षणक्षेत्रात नवक्रांती घडवू इच्छिणा-या गुरुजीबाद्दलची माझी रचना
    गुरुजी आम्ही नवयुगातले भारी........................
    नवनिर्मितीचे जनक आम्ही
    तंत्रज्ञानाची धरली कास
    डिजिटल शाळा करण्यासाठी
    करतो प्रयत्नांची पराकाष्टा खास || १||
    रुपडे शाळेचे बदलण्या साठी
    क्लुप्त्या शोधतो आम्ही विविध
    स्वनिर्मितीचा डंका वाजवतो
    उपक्रम राबवतो नानाविध || २ ||
    चिमुकल्यांना लावण्या अध्ययनाची गोडी
    निर्माण करतो साहित्य भारी
    कधी स्वत:च रूप बदलून
    बालपणच आपल्या अंगात अवतारी || ३ ||
    प्रयत्न अपुरे न पडो मुले घडवाया
    निर्माण करतो स्वत:ची वाट
    स्वत:चे तयार करून विविध अॅप
    गुरुजी दाखवी आपला थाट || ४ ||
    पुस्तकाची जागा टॅबला देऊनी
    एका क्लिकवर जग जवळ करी
    प्रत्येक मुलाला शाळेचे वेड लावी
    गुरुजी आम्ही नवयुगातले भारी || ५ ||

    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि.नाशिक


    बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

    निसर्ग कविता

     श्रावण म्हटला कि निसर्गाचे विविध पैलू आपणास पहावयास मिळतात.
    काही क्षण सतत डोळ्यात भरून ठेवावेत असेच असतात.
    या किमयागार निसर्गाचे मी शब्द बद्ध केलेली रचना

    "जीवनाचा खरा आनंद देण्या श्रावण आला"

    सृष्टीचे सौंदर्य खुलवण्या
    आनंदाचा  मास हा आला
    निसर्गाचे अलोक दर्शन जगाला
     घडवाया विस्मयकारी श्रावण आला || १||

    पावसाच्या सतत धारा
    कधी ऊन तर कधी मंद झुळूक वारा
    माळरानावर फुलले हिरवे गालीचे
    फुलवी त्यात रान फुलांचे बगीचे || २ ||

    बागेत उडती रंगीबेरंगी फुलपाखरे
    हळूच धरावया जाता चकवती लाजरे
    विविध पशु पक्षी त्यांच्या सोबती
    आनंदाने निसर्गाचे गीतते गाती || ३||

    पाखरांची येथे शाळा भरते
    सृष्टी रंग बदलत नाच नाचते
    नदी नाले खळखळ वाहती
    कधीच थांबु नका मानवास संदेश देती  || ४ ||

    इंद्रधनुच्या विशाल कमानी
    अंतरंगातील रंग फुलवी मनी
    विविध सण उत्सव सोबत घेऊन आला
    जीवनाचा खरा आनंद देण्या श्रावण आला.|| ५ ||

    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक – शाळा बोरस्तेवस्तीता.निफाड , जि. नाशिक 


    मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

    "पुन्हा बिरसा जन्म घेरे करण्या आमचे रक्षण"

    ९ ऑगष्ट हा आदिवासी दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जात आहे
    त्यानिमित्ताने सहज सुचलेली माझी रचना

    "पुन्हा बिरसा जन्म घेरे करण्या आमचे रक्षण"

    सृष्टी निर्मितीचे पूर्वज आम्ही
    आदिवासी आमची जमात
    रानमेवा खातच वाढलो
    पशु पक्षी मित्र आमचे रानात ||1||
    मोलमजुरी व्यवसाय आमचा
    निसर्ग आमची देवता
    बिरसा मुंडा जननायक आमचा
    त्यानेच शिकवली खरी मानवता ||२||
    पारतंत्र्यात शोषणा विरूद्ध
    लढला तो बनावान
    वन कायद्याला तिलांजली देत
    इंग्रजांविरुद्ध पेटवले त्याने रान ||३||
    हजारीबागच्या तुरुंगात त्याने
    केला एक संकल्प
    इंग्रज सरकार उलथून पाडण्यासाठी
    उलगुलानचा दिला होता आम्हा विकल्प ||४||
    ब्रिटीश आणि जहागीराविरुद्ध
    बिरसा तू पुकारालेस बंड
    शोषणा विरुद्ध लढण्याचे बळ देऊन
    सर्वांना सोबत घेत लढत राहिला अखंड ||५||
    मानवाच्या अतिक्रमणाने जंगल
    डोंगर झाले माळरान
    सिमेंटच्या जंगलात बुडून मानव
    विसरत चालला जगण्याचे भान ||६||
    आज स्वातंत्र्याचे शतक गाठतोय
    तरीही होतच आहे आमचे शोषण
    पुन्हा बिरसा जन्म घेरे
    करण्या आमचे रक्षण ||७||

     श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक 
    जि.प. शाळा-बोरस्ते वस्ती
    ता.निफाड जि. नाशिक 
    मोबा.9960125981

    भाव पूर्ण श्रद्धांजली

    काल आमच्या कोकणगाव केंद्रातील मोठ्या भगिनी नुकतेच ६ महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांचे दु:खद निधन झाले.
    रक्षा बंधनाच्या दिवशी अचानक निरोप घेणे काळजाला चटका लावणारेच होते.
    त्यांचा विषयी शब्द बध्द केलेली माझी रचना 

    "तुझ्या कार्याचे स्मरण हृदयातआमचे सतत राहील".

    शांत संयमी स्वभाव तुझा 
    कधीही न राग चेह-यावर
    सतत कामात व्यस्त राहिलीस 
    कधी तक्रार न केली कुणाच्या नावावर
    आज रक्षाबंधनाच्या दिवशी 
    रेशीम धागा तुटला गं
    अचानक तुझे एक्झिट होणं
    काळजाला चटका बसला गं
    कामावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व तुझे 
    आम्हाला सतत देतसे प्रेरणा बळ
    प्रामाणिक काम करण्याचे का 
    देव देतो असेच फळ? 
    हजारोंचे साहित्य दिले तू 
    आमच्या चिमुकल्यांना 
    भावना मोकळ्या न करता 
    पोरकं केला तू आम्हा सहका-यांना
    सन्मान तुझा करण्यासाठी 
    सज्ज होतो आम्ही ९ तारखेला 
    सर्व काही मनातच घेऊन गेलीस 
    सुख दु:ख न सांगता आम्हाला 
    तुझ्या साहित्याकडे लक्ष जाता 
    डोळे आमचे पाणावतील
    सांगना गं ताई कसे त्याला 
    स्पर्श करण्यास हात आमचे धजावतील
    आठवणीच्या हिंदोळ्यावर 
    मन हे झोके घेतच राहील 
    तुझ्या कार्याचे स्मरण हृदयात
    आमचे सतत राहील. 

    भावपूर्ण श्रद्धांजली
    प्रकाश चव्हाण & परिवार all Kokanagaon Cluster Members

    रक्षा बंधन

    "मिळो सुख तुला या सृष्टीचे" 


    दूर देशी असलो तरी
    आठवण असते काळजात.
    आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटल्यावर
    आनंद मावेना गगनात.
    लहानपणी तुझा बोट धरुनी
    चालायला शिकलो मी
    तुझ्याच मुखातून निघणा-या गोड बोलांनी
    बोबडे बोलायला शिकलो मी.
    नव्हती परिस्थिती पोटभर जेवण
    मिळण्याची तेव्हा
    कळतही नव्हते काही
    तुझ्या मुखाचा घास मला
    भरवत होतीस जेव्हा
    तुझ्या आनंदाला उरच नाही.
    लहान असूनही तू मला दरवर्षी
    रेशीम बंध बांधतेस
    आयुष्यभर माझे रक्षण करत आलीस
    तरीही माझ्या कडून रक्षणाची आस धरतेस?
    तुझ्याच रेशमी धाग्याने
    बळ मिळते जीवनात नवनिर्मितीचे
    विनंती करतो आज देवाला
                                                                                              सुख मिळो तुला या सृष्टीचे!