-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

    बैलपोळा

    माझी कैफियत 
    शेतात वर्षभर राबवून तू
    साजरा करतोस पोळा सण
    सततच्या शिव्याशापातून
    एक दिवस देतो मान ।।१।।
    शेताच्या बांधावरचे गवत
    कोरडे कडबा आमचे खाद्य
    आज मात्र आमच्या साठी
    घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य।।२।।
    सालभर चिखलात हाकलून
    आज आंघोळ माझी करतो
    चाकुब आरीने सुजवलेले अंग
    आज रंगीत झालराने झाकतो ।।३।।
    वाजत गाजत चौकाचौकातून
    मिरवणूक आज काढतोस
    माझ्यावरील दररोजच्या
    अमानुष छळाला तू विसरतोस ||४|
    शेतीच्या शोधापासून मी
    आहे तुमच्या सोबती
    यंत्राच्या जमान्यात मात्र
    माझी गरज नाही का कोणती?।।५।।
    निसर्गाच्या लहरीपणाचा
    बळी पडतो तू माझा धनी
    कुटुंबा सोबत आमचेही
    विसरून प्रेम अंतरमनी ।।६।।
    जगाचा पोशिंदा तुझ्याकडून
    आज मागतो  एक वचन
    निसर्ग कोपला, शासन झोपले तरी
    नाही संपवणार तू जीवन ।।७।।
    सावकार बँकेच्या कर्जाच्या पाशातून
    मुक्त हो तू हेच माझे मागणे
    सण एकदिवसाचा असला तरी 
    साजरा करुया आनंदाने ।।८।।
    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि.प.शाळा-बोरस्तेवस्ती,
                         ता.निफाड जि.नाशिक 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा