-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

    आठवण

    आठवण

    शांत  बसुनी विचार करतो
    कोण आहे आपल्या संगती ?
    भूतकाळात मन गुंतविता
    आठवणीच आपल्यास खरे सांगती || ||

    इतरांच्या चुका शोधता शोधता
    आपल्याच स्वभावाचे दोष  समजती
    नियतीचा हा सारा  खेळ उभा करती
    आठवणीच आपणास खरे सांगती ||||

    मनात  विविध आशा कल्पना जागती
    कधी विजय कधी पराभव होती
    जिंकणे हरण्याच्या  हिशोब मांडती
    आठवणीच आपल्याला खरे सागती || ||

    पराभवाच्या अनुभवातून
    जिंकण्याची नव उर्मी देती
    आयुष्याचे पूर्ण सार  कथन करती
    आठवणीच आपणास खरे सांगती || ||

    जगाच्या  प्रगतीच्या  वाटेवर
    नंबर पहिला माझा हे सदा वदती
    नेहमीच पुढे सर्सावण्याचा धडपडी
    आठवणीच आपल्याला खरे सांगती|| ||

    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि...शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि. नाशिक
    9960125981

    chavanprakash001.blogspot.com


    शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

    येरे बाप्पा आमच्या घरी मुषकावर होऊन स्वारी

    येरे बाप्पा आमच्या घरी मुषकावर होऊन स्वारी

    अबाल वृद्धांना नवचेतना
    देणारा सण आनंदाचा आला |
    गुलाल उधळत वाजत गाजत
    गणराज घराघरात विसावला ||१||
    बुद्धीचा देवता तो देई
    सर्वा सुख आणि समृद्धी |
    चिंतन करी जो मानवा होई
    ज्ञान आत्मविश्वासात वृद्धी ||२||
    विघ्नहर्ता तू सुखाचा दाता
    नष्ट करी सर्व चिंता |
    स्मरण करता त्वरित सोडावी
    आयुष्याच्या तू  गुंता ||३||
    देवाचा तू  ईशागण
    प्रथम मान तुझ्या  पूजेला |
    माता पिता सर्व श्रेष्ठ देवता
    शिकवण देई तू या जगाला ||४||
    आगमनाने तुझ्या  सर्वांच्या
    आनंदाला येई भरती |
    भक्ती भावाने भाविक जास्वंद,दुर्वा
    तुझ्या माथ्यावर वाहती ||५||
    निसर्गही स्वागत करण्या बाप्पाच्या
    असतो नेहमी नेहमी तत्पर |
    विविध रंगी पुष्प फुलावी
    झाडाझाडांवर सत्वर ||६||
    बालगोपालांचा तू  सखा
    तरुणांचा तू नायक |
    अबलांचा तू सदैव रक्षक
    वृद्धांचा वरद विनायक ||७||
    स्वागत करण्या तुझ्या भार्या करी
    गोड धोड मोदक भारी |
    येरे बाप्पा आमच्या घरी
    मुषकावर होऊन स्वारी ||८||
    गणराज तू विश्वंबर
    उत्साह आनंदाचा तू साधक |
    शुभंकर,कपील, चिंतामणी तुला  
    देतो नैवेद्याला मी मोदक ||९||



    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि.प.शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि. नाशिक
    ९९६०१२५९८१
    माझा छंद माझ्या कविता वाचा

    chavanprakash001blogspot.com 


    सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

    छंद

    प्रत्येकालाच असावा
    एक छंद
    ज्यातून मिळतो
    स्वनिर्मितीचा आनंद ||१||

    आपल्या कलागुणांना
    मिळतो वाव
    समाजात निर्माण
    होतो आपला भाव ||२||
    आपल्या विचारांना
    मिळते एक दिशा
    इतरांनी चांगले म्हणावे
    याची नसते भाबड आशा ||३||
    आपल्या व्यक्तिमत्वाचा
    उलगळतो पैलू एक एक
    समविचारी मित्र
    मिळत जातात अनेक ||४||
    वेळेचे भान छंद
    जोपासतांना उरतच नाही
    स्वत:साठीच वेळ दिल्याने
    मानव समाधानी राही ||५||
     नवनिर्मितीचा ध्यास
    असतो व्यक्तिला
    प्रेरणा मिळते आपल्या
    नवविचाराला ||६||
    निर्माण होते
    एक एक संधी
    मानव राहतो
    व्यस्त आणि आनंदी  ||७||
    विना छंद
    भरकटते जीवन
    सतत चिडचिड
     करते मन  ||८||
    छंदामुळे उलगडतात
    आपल्या मनातील भाव
    एक तरी छंद
    तुम्हाला असुद्या राव  ||९||

    x

    बैलपोळा

    माझी कैफियत 
    शेतात वर्षभर राबवून तू
    साजरा करतोस पोळा सण
    सततच्या शिव्याशापातून
    एक दिवस देतो मान ।।१।।
    शेताच्या बांधावरचे गवत
    कोरडे कडबा आमचे खाद्य
    आज मात्र आमच्या साठी
    घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य।।२।।
    सालभर चिखलात हाकलून
    आज आंघोळ माझी करतो
    चाकुब आरीने सुजवलेले अंग
    आज रंगीत झालराने झाकतो ।।३।।
    वाजत गाजत चौकाचौकातून
    मिरवणूक आज काढतोस
    माझ्यावरील दररोजच्या
    अमानुष छळाला तू विसरतोस ||४|
    शेतीच्या शोधापासून मी
    आहे तुमच्या सोबती
    यंत्राच्या जमान्यात मात्र
    माझी गरज नाही का कोणती?।।५।।
    निसर्गाच्या लहरीपणाचा
    बळी पडतो तू माझा धनी
    कुटुंबा सोबत आमचेही
    विसरून प्रेम अंतरमनी ।।६।।
    जगाचा पोशिंदा तुझ्याकडून
    आज मागतो  एक वचन
    निसर्ग कोपला, शासन झोपले तरी
    नाही संपवणार तू जीवन ।।७।।
    सावकार बँकेच्या कर्जाच्या पाशातून
    मुक्त हो तू हेच माझे मागणे
    सण एकदिवसाचा असला तरी 
    साजरा करुया आनंदाने ।।८।।
    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि.प.शाळा-बोरस्तेवस्ती,
                         ता.निफाड जि.नाशिक 

    रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

    *"HAPPY COUPLES DAY SPECIAL"*.

    *"HAPPY COUPLES DAY SPECIAL"*
    💝💝💝💝💝💝💝
    *"तुझ्या प्रितीसाठी ग सखे ठेवेन चंद्र सूर्य तारे सोबतीला "*

    🌃🌅🌠🎠🎠🎠🎠

    *वास्तवाच्या जगात जगूया जीवन*
    *हीच ठेवते तू अपेक्षा*
    *वचन तुला ग सखे  माझे*
    *कधीच होणार नाही उपेक्षा ||१||*

    *आई बापाच्या लाडात*
     *प्रेमात तू वाढलीस*
    *भूतकाळ तूझा विसरून तू**
    *संसारात माझ्या रमलीस ||२||*

    *कुटुंबातील सर्वांना देते तू*
    *नेहमी बळ आणि प्रेरणा*
    *नाही  केलीस कधी तक्रार तू*
    *ना बघीतला कंटाळा  मी जीवना ||३||*

    *तु सोबत असल्यावर*
    *मी मलाच विसरतो*
    *तू नेहमी प्रसन्नतेनं सोबत रहा*
    *सखे आज वचन मी मागतो||४||*

    *मनातल्या इच्छा आकांक्षा*
    *आज सांग ना तु मला*
    *तुझ्या प्रितीसाठी ग सखे*
     *ठेवेन चंद्र सूर्य तारे सोबतीला||५||*

    *श्री. प्रकाश लोटन चव्हाण*
    *प्राथमिक शिक्षक*
    *जि.प.शाळा बोरस्तेवस्ती*
    *ता.निफाड जि.नाशिक*
    9960125981
    👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧