-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

    चंद्र आहे हा साक्षीला

    *चंद्र आहे हा साक्षीला*

    हर्ष उल्हास प्रेमाचा
    सण आला आनंदाचा ।
    नभात आज खुलला
    पूर्ण चंद्र पुनवेचा ।।1।।

    मंद झुळूकाचा वात
    चेतना भरी रोमात ।
    आज  ही प्रीतीची रात
    रंग बदली क्षणात ।।2।।

    चांदण्या रातीत खुले
    कांती तुझी ही तेजाची ।
    मोह आवरता होई
    चलबिचल या मनाची ।।3।।

     बहरले मन तुझे
     अंत नसावे प्रेमाला ।
    प्रीतीचा क्षण फुलण्या
    चंद्र आहे हा साक्षीला ।।4।।

    *प्रकाश चव्हाण*
    *बोरस्तेवस्ती नाशिक*

    शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

    करूया सुरवात नवयुगाची

    करूया सुरवात नवयुगाची

    पृथ्वीच्या गाभ्यातून उजळली
    पहाट सुंदर सोनेरी |
    शुभंकरोती  म्हणून करूया
    स्वागत पुष्प उधळत सत्वरी || ||
    आनंदाचा दिन हा उगवला
    हर्ष उल्हास वाढवाया |
    मनामनातील नाती घटट करण्या
    शुभ संदेश आपण देऊया || ||
    आपट्याचे पानेही आज
    सोन्याचे रूपे घेती |
    आबालवृद्ध एकत्र येऊन
    सुखाची देवाणघेवाण करती|| ||
    मनामनातील दुरावे विसरून
    सोडा मौन अबोलाची
    देऊन प्रेरणा एकमेकांना
    करूया सुरवात नवयुगाची || ||

     


    सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

    का हिणावती मला अबालवृद्ध ?

    का हिणावती मला अबालवृद्ध ?

    अपार कष्ट सहन करत 
    तुझ्या मायावी जगात मी आले |
    श्वास घेण्या पुर्वीच मात्र
    प्राण इंक्युबीटर मध्ये अडकले ||१||

    भ्रूण रुपा पासून होतोय
    माझ्या वर अन्याय |
    भ्रुण रूपातच  गोठून प्राण 
    आई बापच शोधती पर्याय ||२||

    जन्माला आल्याबरोबर
    वाडवडील कुलक्षण वदती |
    मुलाचा अट्टाहास पायी
    जन्मल्याबरोबर जिवंत पुरती ||३||

     आईवडील जरी  लक्ष्मी
    म्हणून मला स्विकारती |
    वयात येण्याअगोदच दृष्टांच्या
    नजरा माझ्या वर खिळती. ||४||

    वयाबरोबरच जन्म दात्याची
    वाढत जाते चिंता |
    राक्षस नराधमांच्या वागण्याने
    आयुष्याचा होतोय गुंता ||५||

    शाळा घर आप्तेष्टांमध्येही 
    वाटत नाही सुरक्षितता |
    जन्माला घालून विधात्या मला तू
     जन्म दात्याची नष्ट केलीस रे शांतता ||६||

    प्रत्येक क्षेत्रात मी माझ्या 
    कर्तृत्वाने स्वतः ला केले सिद्ध |
    मुलगी म्हणून अजूनही का
    हिणवती मला अबालव्रुद्ध ||७||





    मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

    नवनिर्मितीचा गुरुजीच आहे स्फुर्तीदाता!!!

    महर्षींचा वसा चालवणारे              
    शिक्षकी पेशात  कधीच नाही कमी |
    मुलांप्रती मित्रत्वाचे नाते आमचे
    आंम्ही देतो गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी || १ ||

    विविध क्लुप्त्या आणि उपक्रम
    सदैव आमच्या सोबती |
    विद्यार्थी  विकास साधतो आम्ही
    वर्तनवाद,ज्ञानराचानावाद आमच्या संगती || २ ||

    ग्रामीण भागाचे रुपडे बदलण्याची
    आहे इच्छा आमच्या मनामनातून |
    भारताचे भविष्य आकार घेत आहे
    आमच्या ग्रामीण शाळा शाळांतून || ३ ||

    विद्यार्थ्यांशी नाते जुळले आमचे
    सहानुभूतीचे प्रेमाचे |
    प्रत्येक मुल प्रगत व्हावे
    हेच ध्येय धोरण आमचे || ४ ||

    प्रत्येक काम करतो
    आम्ही शर्थीने  कर्तव्यनिष्ठतेने |
    विद्यार्थी हिताची कास धरून
    प्रगतीच्या वाट शोधतो तन मन धनाने || ५ ||

    भावी इतिहास घडवण्याची
    आहे आमच्यात क्षमता |
    संस्कारमय पिढी घडावी
    यासाठी सतत घेतो  दक्षता || ६ ||

    चाकोरीबाद्द जीवन जगणे
    आहे आमची कमजोरी |
    याच ठिकाणी होते आमची
    टिंगल टवाळखोरी || ७ ||
    सामाजिक संस्कृतीचे भान जपणारे
    आम्ही आहोत उपासक |
    राष्ट्रीय संपती संवर्धनासाठी आम्ही
    असतो आजन्म अभ्यासक || ८ ||

    ज्ञानप्रसारक,सहशोधक
    आम्ही सदैव  प्रशिक्षक |
    आम्हीच समुपदेशक प्रबोधक
    आणि मूल्य संवर्धक || ९ ||

    संशोधक, साहित्य लेखक परीक्षक
    आणि गुणवत्ता समीक्षक ज्ञानदाता |
    विद्यार्थ्यांचा कौशल्य दाता ,संस्कारदाता
    नवनिर्मितीचा  गुरुजीच आहे  स्फुर्तीदाता || १० ||

    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि.प.शाळा –बोरस्तेवस्ती ता. निफाड जि. नाशिक
    Chavanprakash001.blogspot.com

     




    शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

    सांग ना गं सखे

    सांग ना गं सखे

    आयुष्यभर सोबत राहण्याचे  
    वचन दिले आपण   एकमेकांना
    सांग ना गं सखे
    कसे तोंड देशील तू आपल्या 
     दारिद्र्यातील संकटांना || 1 ||

     दुष्काळातील चातकासारखा  
    आसुसलेला मी सुखाच्या  थेंबांना
    सुखाच्या सागरात राहणारी सखे
    सांग कसे वाटेल तुला
    खच खळग्यात जीवन जगतांना || २ ||

    आपल्या संसारात फुललेली फुले
    आनंदाने खेळता डोलतांना
    सांग ना गं सखे
    कसे लाड पुरवशील त्यांचे
    फाटकी झोळी शिवातांना  || ३ ||

    शहरी जीवन सुख समृद्धी दिसेल  
    तुला हिंडता फिरतांना
    सांग ना गं सखे
    पश्चाताप तर होणार नाहीना तुला
    माझे जीवन सावरतांना || ४ || 

    संसाराची स्वप्न रंगवले असतील तू
    तारुण्यात पाऊल ठेवतांना
    सांग ना गं सखे
    स्वप्न भंग तर होत नाहीना तुझे
    सोबत माझ्या राहतांना || ५ ||

    आनंदी समाधानी दिसतेस तू
    माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतांना
    सांग ना गं सखे
    खरचं स्वप्न पुर्ती आहे तुझी कि
     आवर घालायला शिकलीस भावनांना || ६ || 

    तुझ्या आशा आकांक्षा कधी
    व्यक्त केल्याच  नाही तू
    माझे समाधान करतांना
    सांग नागं सखे
    कसे समजतील मला त्या खुणा

    आपले आयुष्य सावरतांना  || ७ || 


    गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

    आठवण

    आठवण

    शांत  बसुनी विचार करतो
    कोण आहे आपल्या संगती ?
    भूतकाळात मन गुंतविता
    आठवणीच आपल्यास खरे सांगती || ||

    इतरांच्या चुका शोधता शोधता
    आपल्याच स्वभावाचे दोष  समजती
    नियतीचा हा सारा  खेळ उभा करती
    आठवणीच आपणास खरे सांगती ||||

    मनात  विविध आशा कल्पना जागती
    कधी विजय कधी पराभव होती
    जिंकणे हरण्याच्या  हिशोब मांडती
    आठवणीच आपल्याला खरे सागती || ||

    पराभवाच्या अनुभवातून
    जिंकण्याची नव उर्मी देती
    आयुष्याचे पूर्ण सार  कथन करती
    आठवणीच आपणास खरे सांगती || ||

    जगाच्या  प्रगतीच्या  वाटेवर
    नंबर पहिला माझा हे सदा वदती
    नेहमीच पुढे सर्सावण्याचा धडपडी
    आठवणीच आपल्याला खरे सांगती|| ||

    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि...शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि. नाशिक
    9960125981

    chavanprakash001.blogspot.com


    शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

    येरे बाप्पा आमच्या घरी मुषकावर होऊन स्वारी

    येरे बाप्पा आमच्या घरी मुषकावर होऊन स्वारी

    अबाल वृद्धांना नवचेतना
    देणारा सण आनंदाचा आला |
    गुलाल उधळत वाजत गाजत
    गणराज घराघरात विसावला ||१||
    बुद्धीचा देवता तो देई
    सर्वा सुख आणि समृद्धी |
    चिंतन करी जो मानवा होई
    ज्ञान आत्मविश्वासात वृद्धी ||२||
    विघ्नहर्ता तू सुखाचा दाता
    नष्ट करी सर्व चिंता |
    स्मरण करता त्वरित सोडावी
    आयुष्याच्या तू  गुंता ||३||
    देवाचा तू  ईशागण
    प्रथम मान तुझ्या  पूजेला |
    माता पिता सर्व श्रेष्ठ देवता
    शिकवण देई तू या जगाला ||४||
    आगमनाने तुझ्या  सर्वांच्या
    आनंदाला येई भरती |
    भक्ती भावाने भाविक जास्वंद,दुर्वा
    तुझ्या माथ्यावर वाहती ||५||
    निसर्गही स्वागत करण्या बाप्पाच्या
    असतो नेहमी नेहमी तत्पर |
    विविध रंगी पुष्प फुलावी
    झाडाझाडांवर सत्वर ||६||
    बालगोपालांचा तू  सखा
    तरुणांचा तू नायक |
    अबलांचा तू सदैव रक्षक
    वृद्धांचा वरद विनायक ||७||
    स्वागत करण्या तुझ्या भार्या करी
    गोड धोड मोदक भारी |
    येरे बाप्पा आमच्या घरी
    मुषकावर होऊन स्वारी ||८||
    गणराज तू विश्वंबर
    उत्साह आनंदाचा तू साधक |
    शुभंकर,कपील, चिंतामणी तुला  
    देतो नैवेद्याला मी मोदक ||९||



    श्री.प्रकाश लोटन चव्हाण
    प्राथमिक शिक्षक
    जि.प.शाळा बोरस्तेवस्ती
    ता.निफाड जि. नाशिक
    ९९६०१२५९८१
    माझा छंद माझ्या कविता वाचा

    chavanprakash001blogspot.com