महर्षींचा
वसा चालवणारे
शिक्षकी
पेशात कधीच नाही कमी |
मुलांप्रती
मित्रत्वाचे नाते आमचे
आंम्ही देतो गुणवत्तापूर्ण
शिक्षणाची हमी || १ ||
विविध
क्लुप्त्या आणि उपक्रम
सदैव आमच्या
सोबती |
विद्यार्थी विकास साधतो आम्ही
वर्तनवाद,ज्ञानराचानावाद
आमच्या संगती || २ ||
ग्रामीण
भागाचे रुपडे बदलण्याची
आहे इच्छा
आमच्या मनामनातून |
भारताचे
भविष्य आकार घेत आहे
आमच्या
ग्रामीण शाळा शाळांतून || ३ ||
विद्यार्थ्यांशी
नाते जुळले आमचे
सहानुभूतीचे
प्रेमाचे |
प्रत्येक मुल
प्रगत व्हावे
हेच ध्येय
धोरण आमचे || ४ ||
प्रत्येक काम
करतो
आम्ही
शर्थीने कर्तव्यनिष्ठतेने |
विद्यार्थी
हिताची कास धरून
प्रगतीच्या
वाट शोधतो तन मन धनाने || ५ ||
भावी इतिहास
घडवण्याची
आहे आमच्यात
क्षमता |
संस्कारमय
पिढी घडावी
यासाठी सतत
घेतो दक्षता || ६ ||
चाकोरीबाद्द
जीवन जगणे
आहे आमची
कमजोरी |
याच ठिकाणी
होते आमची
टिंगल टवाळखोरी
|| ७ ||
सामाजिक
संस्कृतीचे भान जपणारे
आम्ही आहोत
उपासक |
राष्ट्रीय संपती
संवर्धनासाठी आम्ही
असतो आजन्म
अभ्यासक || ८ ||
ज्ञानप्रसारक,सहशोधक
आम्ही सदैव प्रशिक्षक |
आम्हीच
समुपदेशक प्रबोधक
आणि मूल्य
संवर्धक || ९ ||
संशोधक,
साहित्य लेखक परीक्षक
आणि गुणवत्ता समीक्षक ज्ञानदाता |
विद्यार्थ्यांचा कौशल्य दाता ,संस्कारदाता
नवनिर्मितीचा गुरुजीच आहे स्फुर्तीदाता || १० ||
श्री.प्रकाश लोटन चव्हाण
प्राथमिक शिक्षक
जि.प.शाळा –बोरस्तेवस्ती ता. निफाड जि. नाशिक
Chavanprakash001.blogspot.com