-->
  • Home
  • महत्वाच्या PDF-1
  • महत्वाच्या PDF-२
  • मराठी जगत-१
  • इ.३ रीसाठी साहित्य
  • हस्तकलेचीपुस्तके
  • मराठी जगत-२
  • खानाखजिना
  • स्वनिर्मित App
  • वाचनीय
  • दिवाळी अभ्यासिका
  • बोलक्या भिंती PDF
  • डिजिटल खेळातून FLN समुद्दी
  • महत्वाचे तंत्रज्ञान
  • स्वनिर्मित व्हिडीओ
  • PPT Games
  • १ ते ८ वर्गाच्या नोंदी
  • KBC गेम Apps
  • इतर
  • ब्लॉग तयार करणे शिका
  • Smart Education Workshees
  • इ.४ थी साठी साहित्य
  • महत्वाची सूचना - हा ब्लॉग स्वनिर्मित साहित्य संग्रह व वेब जगतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या माहितीच्या देवाणघेवाणसाठी तयार करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर संग्रहित वेब मध्ये व लिंक मध्ये छेडछाड झाल्यास अथवा हॅक झाल्यास मी प्रकाश चव्हाण ब्लॉगर त्यास जबाबदार राहणार नाही.

    बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

    󾍛ज्ञानरचनावादी उपक्रम 󾍛
    उपक्रम :  " गळ टाकूया मासे पकडूया "

    कृती :
    󾮜 प्रथम पातळ कार्डशिट वर माश्याच्या प्रतिमेचे सारखे २ कटआउट तयार करणे.
    󾮜दोघांच्या मध्ये ब्लेड टाकून फेव्हीकालने ते चिटकवणे...
    󾮜 एक लोहचुंबकला दोरा बांधणे..
    󾮜 फरशीवर शब्द,संख्या लेखन करणे.
    󾮜   त्यावर माश्याच्या तयार केलेल्या प्रतिमा ठेवणे.
    󾮜एका विद्यार्थीलादोरा बांधलेला लोहचुंबक देणे.
    󾮜 एक-एक विद्यार्थीला मासा गळाला लागल्यानंतर त्याखालील शब्द,संख्या वाचायला लावणे.
    󾮜 अचूकपणे शब्द,संख्या वाचल्यावर सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
    󾮜 १० मासे गळाला लागल्यावर दूस-या विद्यार्थ्याला संधी देणे  .
    󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾮚󾮚
    उपक्रमांची यशास्विता.....
     खेळातून ज्ञानाची निर्मिती होते..
    󾮜 विद्यार्थी स्वतः एकएक मासा गळाला लावून शब्द,अंक,संख्या वाचन करेल.
    󾮜 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
    󾮜 एक विद्यार्थी शब्द,अंक,संख्या वाचन करत असेल तेव्हा ते इतरांना वहीत लेखन करायला सांगितल्यास लेखनाचा सराव करता येईल.
    󾮜 अक्षर,शब्द,संख्या यांचे  संबोध विशेष खेळाच्या अनुभवातुन कायम होतील.
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    श्री प्रकाश चव्हाण
    बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    उपक्रमाचा फोटो
    󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚


    मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

    󾍛ज्ञानरचनावादी उपक्रम 󾍛



    󾍛ज्ञानरचनावादी उपक्रम 󾍛
    उपक्रम :  " अनुभवातुन शिकुया -नाणी नोटा"

    कृती :
    󾮜 प्रथम 50 पैसे ते 1000 किमतीचे नाणी नोटा प्रतिमा व माउट  बोर्ड वर प्रतिमेचे कटआउट तयार करणे.
    󾮜वर्ग रचना दुकानासारखी करणे ..
    󾮜 पेन, पेन्सिल, खोडरबर, खेळाचे साहित्य, चाॅकलेट, वह्या, पुस्तके,इ. वस्तू विक्रीला ठेवणे.
    󾮜 प्रत्येक वस्तुला विशिष्ट किंमती देणे.
    󾮜एका विद्यार्थीला दुकानदार पद देणे.
    󾮜 अन्य विद्यार्थीकडे नाणी नोटा प्रतिमा देणे.
    󾮜 एक-एक विद्यार्थीला वस्तू खरेदी करायला लावणे.
    󾮜 वस्तू विकत घेतांना मुद्दाम 100,500,1000 ची नोट द्यायला लावणे .
    󾮜 दुकानदार विद्यार्थी वस्तू देईल व योग्य रक्कम परत करेल
    󾮜 अचूकपणे सुटे परत केल्यावर
    सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
    󾮜चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
    󾮜 पुन्हा चुकल्यास दुकानदार होण्याची संधी तो विद्यार्थी त्या दिवसापुरती गमावले.
    󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾮚󾮚
    उपक्रमांची यशास्विता.....
    󾮜  नाणी नोटाची अचूक  किंमत सांगता येईल.
    󾮜 विद्यार्थी स्वतः विविध किमतीच्या वस्तु खरेदी करेल व किमतीच्या तुलना करेल.
    󾮜 कमी अधिक किमतीच्या नोटा तुलना करून  सांगेल .
    󾮜 नाणी नोटा घटकाच्या ज्ञानचे अनुभवातुन दृढी:करण होईल .
    󾮜 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
    󾮜 मोठ्या किमतीच्या नोटाचे अचुक सुटे करता येतील.
    󾮜 नाणी नोटाचे मनातल्या मनात बेरीज वजाबाकी करण्याची सवय विद्यार्थीना लागेल.
    󾮜 खरेदी विक्री संबोध अनुभवातुन कायम होतील.
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    श्री प्रकाश चव्हाण
    बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    उपक्रमाचा फोटो
    󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚





    ज्ञानरचनावादी उपक्रम

    🙏
     ज्ञानरचनावादी उपक्रम 
    माझी शाळा माझे उपक्रम भाग- 5
    उपक्रम :  " जादूई पेटारा ज्ञान कुंभ"

    कृती : 
    󾮜 प्रथम रिकामा खडूचा बाॅक्स घेणे.
    󾮜 त्याला रंगीत गिप्ट पेपरचे आवरण चिटकून आकर्षक करणे..
    󾮜त्यात विविध नकला, प्राणी पक्षीचे आवाज , वस्तू दाखवा, वस्तू आणा, गाणी , गोष्टी , कविता , पाठ्यपुस्तकातील चित्र वर्णन, प्रश्न, अनुभव कथन इ. चिठ्ठ्या तयार करून टाकणे. 
    󾮜एक एक  विद्यार्थीला पुढे बोलवून बाॅक्स मधून चिठ्ठी काढायला सांगणे 
    󾮜 चिठ्ठी सर्वांना दाखवून त्यातील मजकूर वाचायला सांगणे.
    󾮜 मजकूरात लिहिल्याप्रमाणे कृती करायला लावणे. 
    󾮜ज्या विद्यार्थीला कृती करता आली नाही तो विद्यार्थी त्या दिवसापुरता खेळातून बाद होईल याची कल्पना विद्यार्थीना देणे. 
    󾮜 प्रत्येक  विद्यार्थी ला संधी मिळावी याकडे लक्ष ठेवणे . 
    󾮜 हा उपक्रम दररोज 4.30 नंतर घेतल्यास 
    दिवसभराच्या अभ्यासक्रमातील उपक्रमाच्या क्षिणातून मुक्त होऊन विद्यार्थी प्रसन्न मनाने घरी जातो.
    󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾮚󾮚
    उपक्रमांची यशास्विता.....
    󾮜 विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
    󾮜 विद्यार्थी आवड जोपासायला मदत होते . 
    󾮜 विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील कला समजतो.
    󾮜 मनोरंजनातुन ज्ञानाची निर्मिती सहज शक्य होते .
    󾮜 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो. 
    󾮜 दिवसभराच्या अभ्यासाचा क्षीण घालवता येतो..
    󾮜 अभिनय,संवाद, वाचन,आकलन,कृती युक्त सादरीकरण,समय सुचकता इ.गुणांची खेळातून पडताळणी करता येते .
    󾮜 प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले अनुभव चिरकाल स्मरणात राहतात . 
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    श्री प्रकाश चव्हाण 
    बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक 
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    उपक्रमाचा फोटो 
    󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚

    Add caption

    मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

    🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
    उपक्रम :रिंग मास्टर "गणित खेळ "
    कृती :
    👉फरशीवर फलक रेखाटन करणे.
    👉कार्ड शिटवर संख्या प्रतिके काढणे..
    👉 हजार,शतक,दशक,एकक.
    👉मुलांना बागडी/रिंग देणे .
    👉एक गटप्रमुख नेमणे.
    👉गटप्रमुख एक -एक विद्यार्थ्यांना बागडी/रिंग टाकायला सांगेल.
    👉 ज्या विद्यार्थीला बागडी/रिंग टाकायला सागितले असेल तोच विद्यार्थी प्रतिकावरून तयार झालेली संख्या सागेल.
    👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
    👉 अचूकपणे संख्या सागितल्यावर
    सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
    👉चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
    👉संधी देवून पुन्हा चुकल्यास तो विद्यार्थी गणित खेळातून बाद होईल.
    👉 या प्रमाणे शेवटच्या विद्यार्थी पर्यंत खेळ घ्यावा.
    🌷🌷🌷🌷🌷🌷👇👇
    उपक्रमांची यशास्विता.....
    👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.
    👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
    👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते.
    👉 प्रतिकावरून संख्या तयार करण्याचा सराव होतो.
    👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
    👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    श्री प्रकाश चव्हाण
    बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    उपक्रमाचा फोटो
    👇👇👇👇👇👇👇


    सोमवार, ७ डिसेंबर, २०१५


    󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚

    󾍛ज्ञानरचनावादी उपक्रम 󾍛
    उपक्रम :घड्याळात वेळ दाखवणे.
    कृती :
    󾮜फरशीवर घड्याळ रेखाटन केले.
    󾮜मुलांना खडू दिले.
    󾮜एक  गटप्रमुख नेमला.
    󾮜गटप्रमुख एक -एक विद्यार्थ्यांना वेळ  सांगेल.
    󾮜 ज्या विद्यार्थीला वेळ सागितला असेल तो खडूने घड्याळात वेळ दाखवणार.
    󾮜 अचूकपणे वेळ दाखविल्यावर
    सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
    󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾮚󾮚
    उपक्रमांची यशास्विता.....
    󾮜 वेळ अचूक वाचता येते.
    󾮜 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
    󾮜 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    श्री प्रकाश चव्हाण
    बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    उपक्रमाचा फोटो




    󾍛ज्ञानरचनावादी उपक्रम 󾍛
    उपक्रम :अंकज्ञानाचे दृढी:करण.
    कृती :
    󾮜फरशीवर अंकवाचन लेखन फलक रेखाटन केले.
    󾮜मुलांना अंककार्ड दिले.
    󾮜laptops वर एक ते शंभर अंकाचा video तयार केला.
    󾮜एक एका  ओळीचे अंक videoतील अंक व आवाजनुसार रिकाम्या रकाण्यात मांडणी करायला लावले.
    󾮜 विद्यार्थी अंक ठेवत असतांना इतर विद्यार्थी videoतील आवाजाप्रमाणे अंकाचे उच्चारणात करतील .
    󾮜 अंक वाचन सरानंतर .....
    󾮜 विद्यार्थी कडे खडू देवून video आवाजानुसार लेखन करून घेणे.
    󾮜 अचूकपणे अंक लेखन केल्यावर
    सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
    󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾀽󾮚󾮚
    उपक्रमांची यशास्विता.....
    󾮜 अंक वाचन सराव होतो.
    󾮜 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. अंक लेखन करताना चुका झाल्यावर अन्य विद्यार्थी त्याला मदत करतात
    󾮜 विद्यार्थी मध्ये अंक वाचन लेखनाबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो.
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    श्री प्रकाश चव्हाण
    बोरस्तेवस्ती ता.निफाड जि. नाशिक
    󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛󾍛
    उपक्रमाचा फोटो
    󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚󾮚